Home शहरं मुंबई करोना- बोरिवलीतील सहा पोलिसांवर गुन्हा दाखल

करोना- बोरिवलीतील सहा पोलिसांवर गुन्हा दाखल


म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई

करोना संकटकाळात कर्तव्य बजावण्यात अग्रभागी असलेल्या मुंबई पोलिस दलात पहिल्यांदाच ड्युटी चुकविणाऱ्या सहा कर्मचाऱ्यांविरोधात बोरीवली पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविला आला आहे.

वारंवार कामावर येण्यासाठी तगादा लावल्यानंतरही सहा पोलिसांनी ड्युटी चुकविली. त्यामुळे अखेरीस आपत्कालीन सेवेत दिरंगाई केल्याबद्दल गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या कारवाईने पोलिस दलातही बरीच चर्चा सुरू झाली आहे. बेस्ट उपक्रमाने सुमारे चार हजार कर्मचाऱ्यांना चार्जशीट आणि १४ कर्मचाऱ्यांना बडतर्फ केल्यानंतर प्रथमच अशी गंभीर कारवाई झाली आहे.

पोलिस दलावर ताण

मुंबईसह राज्यात करोनास रोखण्यासाठी आपत्कालीन सेवेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना सेवेत येण्यास सक्तीचे आहे. आजारपण, वय आदींसह काही अपवादात्मक घटक वगळता सेवा बजाविणे अपेक्षित आहे. या प्रसंगात पोलिस दलावर प्रचंड ताण असतानाच सेवा बजाविण्यात कुचराई दाखविणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे.

बोरीवली पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या सहा कर्मचाऱ्यांनी सेवा न बजाविल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. संपूर्ण राज्यात सरकारने साथीचा रोग १९८७ लागू केला आहे. त्यात पोलिस दलाची सेवा अत्यावश्यक घटकात समाविष्ट आहे. मात्र, ही सेवा बजाविण्यात हलगर्जीपणा करणाऱ्यांविरोधात कारवाई केली जाते.

ड्युटीस टाळाटाळ

बोरीवली पोलिस ठाण्यातील सहा कर्मचाऱ्यांनी ड्युटी बजाविण्यात ढिसाळपणा केल्याचे स्पष्ट झाले. ही बाब कळून येताच बोरीवली पोलिस ठाण्याकडून सहा कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र पोलिस कायदा १९५१ चे कलम १४५ (३) अन्वये नोटीस देण्यात आली. तरीही या पोलिसांकडून ड्युटीवर येण्यास टाळाटाळ झाल्याने अखेरीस कारवाई करण्यात आली आहे. यातील काही कर्मचारी काही दिवस विलगीकरणातही होते. तो कालावधी संपुष्टात आल्यानंतर त्यांनी सेवेत येणे अपेक्षित होते. ते न झाल्याने कारवाईचा कटू निर्णय घेण्यात आला आहे. तर काही कर्मचारी करोना सुरू होण्यापूर्वीपासूनही सेवेत गैरहजर आहेत.

… यांच्यावर कारवाई

या कारवाईत प्रदीप आगवणे हे २ ऑगस्ट, प्रशांत भोसले १४ फेब्रुवारी, हरिशचंद्र भोसले १६ ऑगस्टपासून विश्वनाथ नामदार हे २३ एप्रिलपासून, प्रदीपकुमार बाबर ३१ मार्च ते १० ऑगस्ट असे ७२ दिवस त्यानंतर पुन्हा १६ ऑगस्टपासून, प्रियंका चव्हाण २७ डिसेंबर २०१८ पासून अनुपस्थित आहेत.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Audio clip of Shiv Sena’s BMC corporator: पालिकेत सेना-भाजप संघर्ष – bjp corporators agitation against shivsena over audio clip of shiv sena’s bmc corporator...

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई शिवसेना आणि भाजपमधील संघर्ष दिवसेंदिवस वाढीस लागत असून, मुंबई पालिकेतही त्याचे पडसाद उमटत आहेत. स्थायी समिती अध्यक्ष यशवंत...

Recent Comments