Home मुंबई नवी मुंबई करोना योद्ध्यांसाठीएक हजाराची मदत

करोना योद्ध्यांसाठीएक हजाराची मदत



म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई

करोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी गावांमध्ये काम करणाऱ्या एकूण दोन लाख ७४ हजार अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा सेविका आणि ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना प्रत्येकी एक हजार रुपये प्रोत्साहनपर रक्कम देण्यात आली आहे. तसेच, सर्व ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी, अंगणवाडी, मिनी अंगणवाडी कार्यकर्त्या, मदतनीस, आशा कार्यकर्त्या, ग्रामपंचायत कर्मचारी, संगणक परिचालक यांना ९० दिवसांसाठी २५ लाख रुपयांचे विमा संरक्षण देण्याचा निर्णयही ग्रामविकास विभागाने घेतला आहे, अशी माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.

‘ग्रामविकास विभागांतंर्गत सर्व यंत्रणा जीवाची पर्वा न करता दिवस-रात्र करोना महामारीच्या संकटाचा मुकाबला करीत आहेत. ग्रामविकास विभागाचे हे कर्मचारी म्हणजे या विषाणूच्या विरुद्ध लढणारे योद्धेच आहेत. या कर्मचाऱ्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना प्रत्येकी एक हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्याप्रमाणे या रकमेचे वितरण करण्यात आले आहे, अशा माहिती मुश्रीफ यांनी दिली.



Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Shirdi Saibaba Temple: Saibaba Temple: साईचरणी ९ दिवसांत कोट्यवधींचे दान; सहा देशांचे चलनही तिजोरीत! – saibaba temple gets rs 3 crore donations in 9...

नगर: राज्य सरकारच्या आदेशाने शिर्डीचे श्री साईबाबा समाधी मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आल्या पासून (१६ नोव्हेंबर) ते काल, मंगळवारपर्यंत सुमारे ४८ हजार...

aurangabad News : वीज बिल फाडून मनसेचे आंदोलन – mns agitation by tearing up electricity bill

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबादवाढीव वीज बिलाबाबत महावितरण विभागाकडून नागरिकांच्या तक्रारी सोडविण्यासाठी काही उपाय योजना केली जात नाहीत, असा आरोप करून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या...

LIVE : पुन्हा राजकीय ठिणगी पेटणार, उद्धव ठाकरेंची मुलाखत लवकरच होणार प्रसारित

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स Source link

Recent Comments