Home शहरं मुंबई करोना रुग्ण: मालाडमधून बेपत्ता झालेले ४० करोना रुग्ण सापडले - 40 missing...

करोना रुग्ण: मालाडमधून बेपत्ता झालेले ४० करोना रुग्ण सापडले – 40 missing corona infected patients found in malad


म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई

मालाडमधून बेपत्ता असलेल्या ५० करोना रुग्णांपैकी अखेर ४० जणांचा शोध लागला आहे. पोलिस व महापालिकेने घेतलेल्या शोधमोहिमेत ते सापडले असून त्यातील काही खासगी व पालिकेच्या रुग्णालयात दाखल होते. तर काहींना उपचारानंतर डिस्चार्ज मिळाला असल्याचे समोर आले आहे. चुकीचा पत्ता व फोन बंद असल्याने त्यांचा शोध लागत नव्हता.

मालाड परिसरात करोनाचा संसर्ग वाढत असताना हे रुग्ण सापडत नसल्याने चिंता वाढली होती. प्रयोगशाळेत करोनाची चाचणी केल्यानंतर रुग्णाचा मोबाइल नंबर व पत्ता घेतला जातो. अहवाल ‘पॉझिटिव्ह’ आल्यानंतर रूग्णांशी संपर्क साधण्यात आला. मात्र अनेकांचा मोबाइल व पत्ता चुकीचा असल्याने संपर्क होत नव्हता. या परिसरात करोनाचे रुग्ण वाढत असताना या रुग्णांना शोधून काढणे आवश्यक होते. त्यामुळे पालिका व पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली. यातील पोलिसांनी ५० पैकी ३० व पालिकेने दहा जणांना शोधून काढले.

काहीजण खासगी व पालिकेच्या रुग्णालयात उपचार घेत होते. तर काहींना उपचारानंतर डिस्चार्ज मिळाला होता. काहींच्या घरी कोणीच नसल्याने त्यांचा फोन बंद होता. तर पत्ताही चुकीचा असल्याचे समोर आले, अशी माहिती पालिकेचे मालाडच्या पी-उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त संजोग कबरे यांनी दिली. यापुढे असे प्रकार होऊ नयेत यासाठी नियमित ट्रेसिंग प्रोसेस सुरू ठेवली जाईल. तसेच पोलिसांनाही वेळोवेळी कळवून मदत घेतली जाणार असल्याचे कबरे यांनी सांगितले.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

love jihad: महाराष्ट्रातही ‘लव्ह जिहाद’ विरोधाचे सूर; ‘या’ संघटनेचा पुढाकार – rashtriya warkari parishad demands anti love jihad law in maharashtra

अहमदनगर: उत्तर प्रदेश सरकारप्रमाणे महाराष्ट्रात सुद्धा लव्ह जिहाद विरोधी कायदा त्वरित लागू करावा, अशी मागणी राष्ट्रीय वारकरी परिषदेने केली आहे. या संदर्भात त्यांनी...

indian railway special train: Indian Railway : ३१ डिसेंबरपर्यंत सुरू राहणार ‘या’ १३ विशेष रेल्वे – indian railways 13 special train service extended till...

नवी दिल्ली : भारतीय रेल्वेच्या पूर्व - मध्य रेल्वे झोनकडून करोना काळात चालवण्यात येणाऱ्या विशेष रेल्वेच्या संचालन कालावधीत वाढ केल्याचं जाहीर करण्यात आलंय....

Recent Comments