Home शहरं औरंगाबाद करोना व्हायरस: अनलॉक… नियम तोडला; २६ दुकानदारांवर गुन्हे - unlock rule broken...

करोना व्हायरस: अनलॉक… नियम तोडला; २६ दुकानदारांवर गुन्हे – unlock rule broken crimes against 26 shopkeepers


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

राज्यात अनलॉकची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून याबाबतचे नियम तोडणाऱ्या २६ दुकानदारांच्या विरोधात विविध पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

गेल्या तीन महिन्यांपासून शहरात करोनामुळे लॉकडाऊन लावण्यात आले होते. यामुळे छोटे दुकानदार, व्यावसायिकांचे हाल झाले. सध्या शहर अनलॉक करण्यात आलेले आहे. मात्र, करोना रुग्ण वाढू नये, दुकानांवर गर्दी होऊ नये यासाठी सम – विषमचा नियम लावण्यात आला आहे. याशिवाय सायंकाळी पाच वाजेनंतर दुकाने बंद करण्याचेही आदेश देण्यात आले आहेत. मात्र, अनेकजण सम-विषमचा नियम पाळत नाहीत.

सोबतच पाचनंतरही दुकाने उघडी ठेवीत आहेत. त्यामुळे अशांवर गुन्हे दाखल करण्याची कारवाई पोलिसांनी सुरू केली आहे. पाच वाजेनंतर दुकाने उघडी ठेवणाऱ्या पुंडलिकनगर भागातील शेख युनूस शेख निजाम (रा. चिकलठाणा), कय्यूम कासम कुरेशी (रा. न्यायनगर), अमजन हुसैन कुरेशी (रा. साईनगर), मुबीन मुनीर कुरेशी (रा. न्यायनगर), मकसुद आरीफ कुरेशी (रा. शिवाजीनगर) यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

गुन्हे दाखल झालेले व्यावसायिक

सिडको – मुकेश मालवानी, रा. सिंधी कॉलनी.

सिडको – शैलेंद्र विद्याभुषण अवस्थी, रा. सिडको.

सिडको – मोहिम मनोज नाथानी, रा. सिंधी कॉलनी

सिडको – रूपेश कपुरचंद छाबड, रा. हडको.

सिडको – संजय कल्याण सावजी, रा. हडको.

सिडको – मुद्दसिर अहेमद, रा. कैसर कॉलनी.

उस्मानपुरा – गजानन महितोले, रा. उस्मानपुरा.

उस्मानपुरा – नीलेश जैन, रा. पीरबाजार.

उस्मानपुरा – इम्तियाज कलीम कुरेशी, रा. उस्मानपुरा.

उस्मानपुरा – नीलेश भरत पांडे, रा. सिडको.

हर्सूल – अन्सार देशमुख, रा. हर्सूल.

हर्सूल – किसन भागाजी सुरे, रा. धनगर गल्ली.

हर्सूल – शेख मुजीब शेख नशीर, रा. मुल्ला गल्ली.

सातारा – वैभव आबासाहेब जाधव, रा. रेणुका माता मंदिर.

सातारा – सखाराम भिवाजी सानप, रा. सातारा.

सातारा – शेख मुजीब शेख हबीब, रा. चौपाटीजवळ.

जिन्सी – शेख मोहसिन शेख यासीन, रा. रहेमानिया कॉलनी.

जिन्सी – शेख अबेद शेख युसूफ, रा. शरीफ कॉलनी.

जिन्सी – गिरणसिंग बच्चन लाल बघेल, रा. हडको.

जिन्सी – नासेर चाऊस, रा. कटकट गेट.

जिन्सी – तन्नप्पा प्रियस्वामी, रा. एसटी कॉलनी.

जवाहरनगर – श्रावण विष्णूमस जबलाणी, रा. सिंधी कॉलनी.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Shirdi Saibaba Temple: Saibaba Temple: साईचरणी ९ दिवसांत कोट्यवधींचे दान; सहा देशांचे चलनही तिजोरीत! – saibaba temple gets rs 3 crore donations in 9...

नगर: राज्य सरकारच्या आदेशाने शिर्डीचे श्री साईबाबा समाधी मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आल्या पासून (१६ नोव्हेंबर) ते काल, मंगळवारपर्यंत सुमारे ४८ हजार...

aurangabad News : वीज बिल फाडून मनसेचे आंदोलन – mns agitation by tearing up electricity bill

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबादवाढीव वीज बिलाबाबत महावितरण विभागाकडून नागरिकांच्या तक्रारी सोडविण्यासाठी काही उपाय योजना केली जात नाहीत, असा आरोप करून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या...

LIVE : पुन्हा राजकीय ठिणगी पेटणार, उद्धव ठाकरेंची मुलाखत लवकरच होणार प्रसारित

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स Source link

Recent Comments