Home शहरं नाशिक करोना व्हायरस: करोनाने पोलिसाचा मृत्यू; शहरातील पहिलाचा बळी - due to coronavirus...

करोना व्हायरस: करोनाने पोलिसाचा मृत्यू; शहरातील पहिलाचा बळी – due to coronavirus one police dies the first victim in the city


म. टा. वृत्तसेवा, इंदिरानगर

प्रतिबंधित क्षेत्रात कर्तव्य बजावणाऱ्या इंदिरानगर येथील पोलिस कर्मचाऱ्याला करोनाची लागण झाली होती. उपचार घेत असताना, या पोलिस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. पोलिस हवालदार अरुण वामन टोंगारे (वय ५२, रा. वासननगर) असे या मृत्यू झालेल्या करोनायोद्ध्याचे नाव आहे.

करोनाबाधित आढळून आल्यानंतर तीन आठवड्यांपूर्वी अरुण टोंगारे यांना नाशिकच्या एका खासगी उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. लॉकडाउनमध्ये प्रतिबंधित क्षेत्रात टोंगारे यांनी कर्तव्य बजावले होते. सुमारे वीस दिवसांपूर्वी त्यांची तब्येत बिघडली म्हणून ते रजेवर गेले होते. करोनाबाधित झाल्याचे लक्षात येताच त्यांना एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यांची पत्नी आणि दोघे मुलेदेखील बाधित झाली होती. मात्र उपचारानंतर ते बरे झाले.

पाच ते सहा दिवसांपूर्वी टोंगारे यांची तब्येत बिघडल्याने त्यांना मुंबई येथे हलवण्यात आले होते. दुर्दैवाने त्यांचा मंगळवार (दि. १) रात्री उपचारादरम्यान मृत्यू झाला. अरुण टांगोरे हे मूळचे खेरवाडी (निफाड) येथील होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, मुलगा असा परिवार आहे.

टोंगारे यांचे निधन झाल्याचे समजल्यानंतर बुधवारी इंदिरानगर पोलिस ठाण्यात वरिष्ठ निरीक्षक नीलेश माईनकर यांच्यासह अधिकारी व कर्मचाऱ्यांनी श्रद्धांजली अर्पण केली.

जिल्ह्यात आतापर्यंत चार पोलिसांचा मृत्यू

करोनाने जिल्ह्यात आतापर्यंत चार पोलिसांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये तीन ग्रामीण भागातील पोलिस कर्मचाऱ्यांचा समावेश असून, शहरात एका पोलिस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Gupkar Declaration: काश्मिरात हालचालींना वेग; मेहबूबा मुफ्तीच्या निवासस्थानी आज मोठी बैठक – gupkar declaration peoples alliance for declaration meeting at mehbooba mufti residence

श्रीनगर: जम्मू आणि काश्मीरच्या (Jammu and Kashmir) माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती (Mehbooba Mufti) यांच्या निवासस्थानी पीपल्स अलायन्स फॉर डिक्लरेशची (PAD) आज बैठक होत...

Devendra Fadnavis Corona Positive: देवेंद्र फडणवीस यांना करोनाची लागण; केलं ‘हे’ आवाहन – opposition leader devendra fadnavis tests positive for covid 19

मुंबई: करोना काळात राज्यभर दौरे करणारे व लोकांना भेडसावणारे प्रश्न राज्य सरकारकडे मांडणारे राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना करोनाची लागण झाली आहे....

Recent Comments