Home शहरं नाशिक करोना व्हायरस: करोना व्हायरस- मालेगावी करोनाचे रुग्ण हजारापार - in malegaon cornavirus...

करोना व्हायरस: करोना व्हायरस- मालेगावी करोनाचे रुग्ण हजारापार – in malegaon cornavirus patient count more than one thousand


म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

नाशिक जिल्ह्यात मार्चमध्ये करोना शिरकाव झाल्यानंतर एप्रिलमध्ये मालेगाव करोनाचे हॉटस्पॉट म्हणून पुढे आले होते. त्यानंतर शासन व प्रशासनाकडून करण्यात आलेल्या उपाययोजनानंतर परिस्थती नियंत्रणात आली. परंतु, गेल्या आठवडाभरापासून शहर व तालुक्यात करोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढल्याने करोनाची दुसरी लाट मालेगावात सुरू झाली का, असा प्रश्न उपस्थित होतो आहे. शनिवारी (दि. २७) मालेगावातील करोना रुग्णसंख्येने हजाराचा टप्पा पार केला. अवघ्या २४ तासांत तब्बल ३५ करोना रुग्ण आढळले असून, चिंताजनक बाब म्हणजे तालुक्यातील ग्रामीण भागात करोना शिरकाव मोठ्या प्रमाणात झाल्याचे चित्र आहे.

शहर व तालुक्यात शुक्रवारी (दि. २६) रात्री उशिरा व शनिवारी (दि. २७) दिवसभरात एकूण ३५ रुग्ण आढळून आलेत. गुरुवारी रात्री ११ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. यात तालुक्याबाहेरील धुळे, मनमाड, नामपूर येथे प्रत्येकी एक रुग्ण आहे, तर शहरातील मामलेदार गल्ली, आयेशानगर, द्याने, महफुज नगर, आदर्शनगर, गायत्रीनगर व गणेशवाडी भागात प्रत्येकी एक रुग्ण आहेत. शनिवारी सायंकाळी ३४ पुन्हा करोना रुग्णांचे अहवाल प्राप्त झालेत. यात तालुक्याबाहेरील सटाणा, लखमापूर येथील प्रत्येकी एक रुग्ण आहेत.

चिंताजनक बाब म्हणजे चोरीच्या प्रकरणी मुंबईत आरोपींना अटक करण्यासाठी गेलेल्या तालुका पोलिस ठाण्यातील तीन कर्मचारी व त्या चार आरोपींना करोनाची लागण झाली आहे. यासह शहरातील संगमेश्वर भागात सर्वाधिक ६, कॅम्प ५, कलेक्टर पट्टा भागात २ तर सोयगाव, गुरुवारवार्ड, आझादनगर, आदमनगर, देवीमळा, बिस्मिलानगर, अहमदपुरा येथे प्रत्येकी एक रुग्ण आढळला आहे.

ग्रामीण भागात वेगाने फैलाव

प्रारंभी शहरासह ग्रामीण भागात दाभाडी, सवंदगाव, लोणवाडे या गावांमध्ये करोनाने शिरकाव केला होता. आता मात्र ग्रामीण भागात वेगाने करोनाचा फैलाव होत आहे. नव्याने आढळून आलेल्या रुग्णांमध्ये जळकु येथे दोन तर झोडगे, चंदनपुरी, मुंगसे या गावांमध्येदेखील करोनाने शिरकाव केला असून, याठिकाणी प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला आहे. लॉकडाउनमध्ये शिथिलता मिळाल्याने नागरिक मोठ्या प्रमाणात बाहेर पडू लागले, मात्र त्यामुळे करोनाचा नियंत्रणात आलेला प्रसार आता पुन्हा डोके वर काढू लागल्याने चिंता वाढली आहे.

करेाना आकडेवारी

मालेगावचे रुग्ण …. १,०१७

बरे झालेल्यांची संख्या …. ७९३

प्रत्यक्षात उपचार घेणारे …. १५१

एकूण मृत्यू …. ७३Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

jameel shaikh murder: Jameel Shaikh Murder: जमील शेख हत्या: शूटर्सना ‘त्याने’ कारमधून मालेगावात सोडले आणि… – jameel shaikh death shooters went to malegaon in...

ठाणे: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राबोडी प्रभाग अध्यक्ष जमील शेख यांची गोळी झाडून हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी शाहिद लायक शेख (३१) या आरोपीला...

Recent Comments