Home शहरं पुणे करोना व्हायरस: कर्करोगाशी लढताना करोनावरही मात! - cancer patient overcome from coronavirus

करोना व्हायरस: कर्करोगाशी लढताना करोनावरही मात! – cancer patient overcome from coronavirus


म. टा. प्रतिनिधी, पुणे

वयाच्या पासष्ठाव्या वर्षी एकाकी जीवन जगताना ‘त्या’ महिलेला गर्भाशयाच्या पिशवीच्या तोंडाचा कर्करोग जडला. उपचारादरम्यान रुग्णालयात या ज्येष्ठ महिलेला करोनाचाही संसर्ग झाला. उपचारानंतरही तीनदा करोना चाचणी पॉझिटिव्ह येऊनही ही महिला घाबरली नव्हती. मात्र, इच्छाशक्तीमुळे आणि तज्ज्ञ डॉक्टरांच्या उपचारामुळे ही महिला अखेर करोनामुक्त झाली. त्यांना एकटे सोडून गेलेल्या मुला-मुलींचा शोधही ससूनच्या वैद्यकीय सामाजिक कार्यकर्त्यांनी लावला आणि पुढील उपचारासाठी महिलेला त्यांच्याकडे सोपविले.

…ही कहाणी सिनेमातील नसून ससून रुग्णालयात दाखल झालेल्या एका ज्येष्ठ महिलेची आहे. ससूनच्या अद्ययावत उपचारांवर या घटनेमुळे पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे. गीता (नाव बदलले आहे) या वयाच्या ६५ व्या वर्षी एकट्याच राहत होत्या. त्यांचे मानसिक आणि शारीरिक आरोग्य बिघडलेले होते. त्यात गर्भाशयाच्या पिशवीच्या तोंडाचा कर्करोगाच्या शेवटच्या टप्प्यात असल्याने त्या त्याच्याशी लढा देत होत्या. त्या अवस्थेत शेजारच्या रहिवाशांनी त्यांना ससून रुग्णालयात आणले. त्यांचे कोणीही नातेवाइक सोबत नव्हते.

स्त्री रोग व प्रसूतिशास्त्र विभागाच्या सहयोगी प्राध्पक डॉ. उमा वानखेडे, डॉ. अरुण अंबडकर यांच्या नेतृत्वाखाली उपचार सुरू झाले. त्यांना दोन युनिट रक्त चढविण्यात आले. डॉक्टरांचे उपचार, परिचारिकांच्या आपुलकीमुळे त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत गेली. त्या कंटेन्मेंट झोनमध्ये राहत असल्याने त्यांची करोनाची चाचणी करण्यात आली. त्यांना करोनाची लागण झाल्याचे निदान झाले. मग ससून रुग्णालयाच्या करोना वॉर्डात डॉ. शशिकला सांगळे, डॉ. रोहिदास बोरसे या तज्ज्ञांनी त्यांच्यावर उपचार सुरू केले. त्यादरम्यान त्यांची करोनाची चाचणी तीनदा पॉझिटिव्ह आली. तरीही त्या घाबरल्या नाहीत, की डगमगल्या नाहीत. करोनाच्या आजारालाही त्या तोंड देत राहिल्या. चौथ्यांदा त्यांची चाचणी झाल्यानंतर त्या करोनामुक्त झाल्याचे निदान झाले.

एकीकडे, अनेक करोनाग्रस्त आजाराशी दोन हात करण्याऐवजी भयभीत झाल्याचे चित्र दिसत आहे. त्याच वेळी या ज्येष्ठ महिलेची इच्छाशक्ती मात्र चांगली असल्याने त्या करोनामुक्त होऊ शकल्या. रुग्णालयातून जाताना गीताबाई या अखेर रुग्णालयातील डॉक्टरांचे आभार मानायला विसरल्या नाहीत.

अपत्यांकडे केले सुपूर्द

करोनामुक्त झाल्यावर संबंधित ज्येष्ठ महिलेला डॉ. चकोर व्होरा यांच्या सल्ल्यानुसार कर्करोगाच्या पुढील उपचारांसाठी सिप्ला केअर सेंटरमध्ये पाठविण्याचा निर्णय़ घेण्यात आला. मात्र, त्या ठिकाणी तांत्रिक अडचणी आल्या. अखेर रुग्णालयाच्या सामाजिक कार्यकर्त्यांनी त्या ज्येष्ठ महिलेच्या अपत्यांचा शोध घेतला. त्यांच्याशी संपर्क साधून त्यांना बोलावून घेतले आणि या महिलेला त्यांच्या ताब्यात देण्यात आले.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Rishabh Pant Is Recover From Injury And He Will Be Play In Todays Match Against Kings Eleven Punjab – IPL2020: दिल्लीसाठी गूड न्यूज, पंजाबविरुद्धचा...

दुबई : पंजाबबरोबरचा सामना सुरु होण्यापूर्वी दिल्ली कॅपिटल्सच्या संघाला एक आनंदाची बातमी मिळाली आहे. दिल्लीच्या संघात एका धडाकेबाज खेळाडूचे आज पुनरागमन होऊ शकते,...

Farmers agitation: जिल्हाधिकारी कार्यालयात उधळला भाजीपाला – aurangabad farmers agitation for announce wet drought and compensation

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबादसातत्याने होत असलेली अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील खरीप हंगामातील उभे पिकांचे मोठे नुकसान झाले असून, नुकसान भरपाई तातडीने द्यावी; तसेच जिल्ह्यात ओला...

Recent Comments