Home शहरं नागपूर करोना व्हायरस: कोव्हिड रुग्णालयात बाधितांच्या जेवणात अळी! - larvae in the food...

करोना व्हायरस: कोव्हिड रुग्णालयात बाधितांच्या जेवणात अळी! – larvae in the food of coronavirus patient in nagpur hospital


म. टा. प्रतिनिधी, नागपूर

मेडिकलच्या ट्रॉमा केअर युनिटला कोव्हिड हॉस्पिटलमध्ये रूपांतरित करण्यात आले आहे. इथे उपचार घेणाऱ्या बाधितांच्या जेवणात अळ्या निघाल्याची तक्रार रविवारी पुढे आली. त्यामुळे रुग्णांमध्ये संताप पसरला असून, अन्नही उशिराने येत असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. प्रशासनाने मात्र ही बाब फेटाळली आहे.

या हॉस्पिटलमध्ये सध्या शहरातील बाधितांवर उपचार सुरू आहेत. उपचाराने करोनामुक्त होणाऱ्या येथील रुग्णांची संख्याही राज्यातील अन्य रुग्णालयांच्या तुलनेत अधिक असल्याने एकीकडे येथील कोव्हिड योद्ध्यांची प्रशंसाही होत आहे. मात्र, रुग्णांना जेवण आणि नाश्ता विलंबाने मिळत असल्याची तक्रार पुढे आली आहे. सकाळी ८ वाजताचा नाश्ता ११ तर दुपारी १२ ते १ वाजताचे जेवण २ वाजता मिळत असल्याची व्यथा रुग्णांनी तक्रारीतून मांडली.

त्यात शनिवारी दुपारी जेवण देण्यासाठी कर्मचाऱ्यांनी आवाज दिला. त्यात चवळीच्या शेंगा, पोळी, भाताचा समावेश होता. जेवण करताना एकाला भाजीच्या तेलामध्ये अळी तरंगताना आढळली. त्यानंतर रुग्ण संतापले. त्यांनी येथील अधिकाऱ्यांकडे याची तक्रार केली. त्यानंतर पाहणी केली असता त्यांना अळी आढळली नाही.

माहिती घेऊनच बोलणे योग्य…

या विषयावर अधिष्ठात्यांसह अन्य अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून संपर्क साधला असता, ‘असा प्रकार घडलेला नाही. माहिती घेऊनच यावर बोलणे योग्य होईल’, असे त्यांनी स्पष्ट केले.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments