Home शहरं औरंगाबाद करोना व्हायरस: घाटीत औषध घोटाळा, चौकशीची करण्यात आली मागणी - coronavirus drug...

करोना व्हायरस: घाटीत औषध घोटाळा, चौकशीची करण्यात आली मागणी – coronavirus drug scandal in ghati hospital


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये आपण घाटीत सर्वसामान्य लोकांना औषधी मिळत नसल्याची तक्रार केली. तेव्हा मुख्यमंत्र्यांनी औषधी असल्याचेही स्पष्ट केले. मात्र, अजूनही घाटीत सर्वसामान्य रुग्णांच्या नातेवाईकांकडूनच औषधी मागविण्यात येते. घाटीत मोठ्या प्रमाणात औषधी घोटाळा सुरू असून याप्रकरणी रुग्णालयाच्या अधिष्ठातांवर तत्काळ निलिंबनाची कारवाई करावी’, अशी मागणी खासदार इम्तियाज जलील यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केली.

पत्रकार परिषदेत खासदार जलील म्हणाले, ‘औरंगाबादमध्ये करोना रुग्ण वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर काही दिवसांपासून सर्व लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत बैठका घेण्यात येत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये घाटीतील औषधी तुटवड्याबाबत विषय मांडण्यात आला. मुख्यमंत्र्यांनी औषधी कमी नसल्याचे स्पष्ट केले.

विभागीय आयुक्तांसोबत झालेल्या बैठकीतही या विषयावर चर्चा करण्यात आली. त्यावेळी घाटी अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी घाटीत मुबलक औषधसाठा असल्याचे स्पष्ट केले. त्यांना गंगाखेडहून आलेल्या एका व्यक्तीला तिच्या पत्नीसाठी औषधी आणण्यासाठी संबंधित विभागाचे कर्मचारी सांगत असल्याची माहिती दिली. त्यानंतर अधिष्ठातांनी असा कोणताही रुग्ण नसल्याचा दावा केला. मात्र, गंगाखेडच्या या रुग्णाच्या नातेवाईकाला बोलावून त्याच्याजवळील कागदपत्रे जिल्हाधिकारी उदय चौधरी यांच्यासमोर हजर केली.

या रुग्णाच्या नातेवाईकाला वारंवार औषधी आणण्याबाबत सांगितल्याचे त्या नातेवाईकाने जिल्हाधिकाऱ्यांसमोर सांगितले. तशी तक्रारही दिली. जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी या प्रकरणात चौकशीचे आदेश दिले. हे प्रकरण समोर आल्याने घाटीत अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांना संबंधित लोक चुकीची माहिती देत आहेत. सरकारतर्फे घाटीला कोट्यवधींचा औषधपुरवठा झाल्यानंतरही सर्वसामान्य रुग्णाच्या नातेवाईकांना बाहेरून औषधी आणावी लागत आहे. हा मोठा घोटाळा असून याची चौकशी करावी. अधिष्ठातांना निलिंबित करावे’, अशी मागणी यावेळी खासदारांनी केली.

मुख्यमंत्र्यांची दिशाभूल

‘महात्मा फुले जीवनदायी योजनेत करोना उपचार करावे, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे व्हीसीदरम्यान केली. एका सचिवाने या योजनेतंर्गत उपचार सुरू असल्याची माहिती दिली. खासगी रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत याबाबत चर्चा झाली. त्यातही महात्मा फुले योजनेत उपचार केले जात नसल्याचे स्पष्ट झाले. उपचाराची सुविधा देऊन नागरिकांना दिलासा देण्याचा निर्णय शासनाने घेतला. मात्र, ही योजना सामान्यांपर्यंत पोहोचत नाही. काही अधिकारी मुख्यमंत्र्यांची दिशाभूल करित आहेत’, असा आरोप खासदारांनी केला.

विभागीय आयुक्तांवर भडकले

करोना रोगावर नियंत्रण आणण्यासाठी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीतही खासदार आणि विभागीय आयुक्त यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. विभागीय आयुक्तांनी ‘तुमचे लोक?’ असा शब्द प्रयोग करताच खासदार इम्तियाज जलील प्रचंड चिडले. ते म्हणाले, ‘लोकप्रतिनिधी कोणत्याही एका समाजाचे किंवा समूहाचे नसतात. त्यामुळे तुमचे लोक असे म्हणून तुम्ही लोकप्रतिनिधींचा अपमान करीत आहा’, अशा शब्दांत केंद्रेकरांना सुनावल्याची माहिती समोर आली आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Ramchandra Guha Criticize N. Srinivasan And Sourav Ganguli’s Role In Indian Cricket – अमित शहा यांच्याबरोबर कोण चालवंतय बीसीसीआय, रामचंद्र गुहा यांनी केला गंभीर...

मुंबई : राजकारण आणि क्रिकेट यांचा संबंध फार वर्षांपासून येत आला आहे. पण सध्याच्या घडीला भारताचे गृह मंत्री अमित शहा हे बीसीसीआय चालवत...

Recent Comments