Home शहरं औरंगाबाद करोना व्हायरस: ‘पॉझिटिव्ह’ रुग्णांना ‘निगेटिव्ह’ ठरवून पाठविले घरी! - corona positive patients...

करोना व्हायरस: ‘पॉझिटिव्ह’ रुग्णांना ‘निगेटिव्ह’ ठरवून पाठविले घरी! – corona positive patients sent home with negative report


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

करोना विषाणूचा संसर्ग तपासणीचा अहवाल ‘पॉझिटिव्ह’ असलेल्या रुग्णांना ‘निगेटिव्ह’ ठरवून त्यांना घरी पाठवण्यात आल्याचा प्रकार मंगळवारी (३० जून) वानखेडेनगर परिसारतील होनाजीनगरमध्ये उघडकीस आली आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. महापालिका प्रशासनाचा निष्काळजीपणा यातून उघड झाल्याचे चर्चा आहे.

भारतीय जनता पक्षाचे माजी नगरसेवक राजगौरव वानखेडे यांनी ही बाब जिल्हाधिकारी आणि महापालिकेचे प्रशासक यांच्या निदर्शनास आणून दिली आहे. याबद्दल त्यांनी या दोन्ही अधिकाऱ्यांना त्यांनी निवेदन दिले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, वाळूज परिसरातील एका कंपनीत काम करणारे एक व्यक्ती आमच्या परिसरात राहतात. त्यांना ‘करोना’ची लागण झाली. त्यामुळे रुग्णाची आई, पत्नी आणि भाऊ या तिघांना विद्यापीठातील रमाई वसतिगृहात दोन दिवसांपूर्वी ‘क्वारंटाइन’ करण्यात आले. तेथे त्यांचे लाळेचे नमुने घेऊन करोना संसर्गची चाचणी करण्यात आली.

घरातील तीन सदस्यांपैकी पत्नी आणि आई यांचा चाचणीचा अहवाल ‘करोना पॉझिटिव्ह’ आला आणि भावाचा अहवाल ‘निगेटिव्ह’ होता, पण अहवाल ‘निगेटिव्ह’ आल्याचे सांगून तिघांनाही घरी पाठवण्यात आले. संबंधित रुग्णाच्या घरातील आणखी दोन व्यक्ती ‘करोना पॉझिटिव्ह’ असल्याचे सकाळी प्राप्त झालेल्या यादी वरून लक्षात आले. त्यामुळे पुन्हा ‘कोविड केअर सेंटर’शी सपर्क साधला. त्यांना झालेली चूक लक्षात आणून दिली. त्यानंतर ‘कोविड सेंटर’च्या कर्मचाऱ्यांनी रुग्णवाहिकेतून ‘पॉझिटिव्ह’ असलेल्या दोन्ही रुग्णांना ‘कोविड केअर सेंटर’मध्ये नेले.

याप्रकरणी प्रशासनावर आरोप करताना राजगौरव वानखेडे यांनी म्हटले आहे की, नागरिकांच्या जीवाशी खेळणे सुरू आहे. प्रशासनाचे एकूण कामकाजावर नियंत्रण राहिलेले नाही, ही बाब आमच्या लक्षात आली आहे. त्यामुळे आम्ही या घटनेची दखल घेतली. अहवाल ‘पॉझिटिव्ह’ असताना ‘निगेटिव्ह’ सांगण्यात आल्याचे आणखी प्रकार घडले असतील याचा विचार न केलेला बरा. अशा घटनांना जबाबदार कोण? नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचा अधिकार त्यांना कुणी दिला, या प्रश्नांची उत्तरे प्रशासनाकडून अपेक्षित आहेत.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Unique Identification Number: पशुधनालाही आता मिळणार ‘आधार’ – now animal to get unique identification numbers

म. टा. प्रतिनिधी, नाशिकयुनिक आयडेंटिटी नंबर (यूआयडी) अर्थात, आधार कार्ड प्रत्येक नागरिकासाठी जितके महत्त्वाचे आहे, तितकेच ते यापुढे पशूंसाठीदेखील महत्त्वाचे ठरणार आहे. जिल्ह्यात...

राज्यपालांची ‘सक्रिय लुडबूड’ संविधानविरोधी!

अ‍ॅड. सुरेश पाकळे संविधानाने स्थापन केलेल्या लोकशाही संस्थांमध्ये, आपसांत संघर्ष होण्याची स्थिती, भारतात अनेक वेळा येत असते. राज्याचे व मुख्यमंत्री यांचे नेमके...

vaccination in aurangabad: करोना लसीकरणासाठी ३७३ ठिकाणे निश्चित – municipal corporation has identified 373 places for vaccination

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबादकरोनावरील आजारावरील लसीकरणासाठी महापालिकेने ३७३ ठिकाणे निश्चित केली आहेत. व्हॅक्सीनेटरची नावे देखील ठरविण्यात आली असून, ही सर्व माहिती पालिकेने शासनाला...

Recent Comments