Home देश करोना संक्रमण: अजब-गजब : व्हेन्टिलेटर हटवून कूलर सुरू केला, रुग्णाचा मृत्यू! -...

करोना संक्रमण: अजब-गजब : व्हेन्टिलेटर हटवून कूलर सुरू केला, रुग्णाचा मृत्यू! – patient dies after unplug ventilator to plug in cooler hospital in kota


कोटा, राजस्थान : राजस्थानात एक अविश्वसनीय घटना घडलीय. कोटा जिल्ह्यात एका व्यक्तीचा मृत्यू अजब कारणानं झाल्याचं समोर येतंय. सरकारी रुग्णालयात करोना संक्रमणावर उपचार घेणाऱ्या या व्यक्तीच्या नातेवाईकानं कूलर चालवण्यासाठी चक्क व्हेन्टिलेटरचा प्लग काढला. त्यामुळे या व्यक्तीचा मृत्यू झाला. उल्लेखनीय म्हणजे, मृत्यूनंतर या व्यक्तीचा करोना मात्र निगेटिव्ह आला.

वृत्तसंस्था पीटीआयनं दिलेल्या बातमीनुसार, १३ जून रोजी एका व्यक्तीला करोना संक्रमण असल्याच्या संशयानं रुग्णालयात दाखल करण्यात आलं. कोटाच्या महाराव भीम सिंह (एमबीएस) रुग्णालयात या ४० वर्षीय व्यक्तीवर उपचार सुरू होते.

याच दरम्यान या व्यक्तीला १५ जून रोजी वेगळ्या वॉर्डमध्ये हलवण्यात आलं. या दुसऱ्या वॉर्डमध्ये उकाड्यानं हैराण झालेल्या रुग्णाच्या नातेवाईकांनी इथं कूलर लावला.

कूलर लावण्यासाठी कोणताही सॉकेट न मिळाल्यानं रुग्णाच्याच एका नातेवाईईकानं व्हेन्टिलेटरचा प्लग काढला आणि तिथं कूलरचा प्लग लावला.

वाचा :दिल्लीचे आरोग्य मंत्री व्हेंटिलेटरवर, करोनाने न्युमोनिया वाढला
वाचा :करोनावर प्रभावी इंजेक्शन ‘रेमडेसिविर’ लवकरच बाजारात

जवळपास अर्धा तासाभरात व्हेन्टिलेटरची वीज संपुष्टात आली. डॉक्टरांना याची तत्काळ सूचना देण्यात आली. डॉक्टरांनी रुग्णाची परिस्थिती पाहता त्याच्यावर सीपीआर (Cardiopulmonary resuscitation) चा वापर करून पाहिला परंतु एव्हाना या व्यक्तीचा मृत्यू झाला होता.

रुग्णालाच्या कर्मचाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, रुग्णाच्या नातेवाईकांनी कूलर लावण्यासाठी रुग्णालयाकडून कोणतीही परवानगी घेतली नव्हती. उलट रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर नातेवाईकांनी ड्युटीवर असणाऱ्या डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांसोबत गैरवर्तन केलं.

या घटनेननंतर रुग्णालयात एकच खळबळ उडाली. रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. नवीन सक्सेना यांनी या प्रकरणाची दखल घेत तीन सदस्यीय समिती चौकशीसाठी नेमलीय. या समितीत रुग्णालयाचे उपाधीक्षक, नर्सिंग अधीक्षक आणि मुख्य आरोग्य अधिकारी यांचा समावेश आहे.

वाचा :‘माझ्याबद्दल तक्रार नाही?’, लॉकडाऊनमध्ये स्थलांतरीत महिलेला पंतप्रधानांचा प्रश्न
वाचा :Karnataka Pattern : केंद्राने ज्यासाठी आदेश काढले तो कर्नाटक पॅटर्न काय आहे?Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Eknath Khadse: Eknath Khadse: खडसे उद्या करणार मोठा धमाका!; ‘हा’ दावा भाजपची झोप उडवणारा – 15 to 16 former mlas with me says eknath...

जळगाव: माझ्यासोबत १५ ते १६ माजी आमदार आहेत. ते माझ्यासोबत उद्या मुंबईत येणार आहेत. काही विद्यमान आमदारही माझ्यासोबत आहेत, पण पक्षांतर बंदी कायद्यामुळे...

rr vs srh: RR vs SRH: राजस्थान विरुद्ध हैदराबाद- पराभव होणार संघ IPL 2020 बाहेर – rr vs srh ipl 2020 rajasthan royals vs...

दुबई: आयपीएलचा १३व्या हंगामातील अर्ध्याहून अधिक सामने झाले आहेत. पण अद्याप कोणताही संघ प्ले ऑफच्या शर्यतीतून बाहेर पडलेला नाही. स्पर्धेतील या पुढील एक...

प्रीति झिंटा: किंग्ज इलेव्हन पंजाबसाठी प्रीति झिंटाही राहिली बायो बबलमध्ये, जाणून घ्या हा प्रकार – preity zinta went through 20th covid bio bubble test...

मुंबई- अभिनेत्री प्रिती झिंटा सध्या दुबईत आहे. तिथे राहून ती तिच्या किंग्ज इलेव्हन पंजाब या आयपीएल टीमला पाठिंबा देत आहे. करोनाच्या प्रादुर्भावामुळे यंदाचा...

Recent Comments