Home देश करोना संक्रमण: विवाहाच्या दुसऱ्या दिवशी वराचा मृत्यू, १११ जणांना करोना संक्रमण -...

करोना संक्रमण: विवाहाच्या दुसऱ्या दिवशी वराचा मृत्यू, १११ जणांना करोना संक्रमण – 111 found corona positive after attending wedding ceremony in bihar


पाटणा : करोना संक्रमण काही थांबण्याचं नाव घेईना. त्यातच नागरिकांचा बेजबाबदारपणा नडतोय. इतकंच नाही तर काहींच्या जीवावर बेततोय. नागरिकांच्या या निष्काळजीपणामुळे प्रशासनही हादरलंय. आरोग्य विभागाच्या चिंतेत दिवसेंदिवस भर पडत चाललीय. बिहारच्या पाटणामधून असंच एक प्रकरण समोर येतंय.

लॉकडाऊनचे नियम बासनात गुंडाळून पाटण्यात एक विवाह पार पडला. धक्कादायक म्हणजे, विवाहाच्या दुसऱ्याच दिवशी वराचा मृत्यू झाला. त्यानंतर या विवाह सोहळ्यात सहभागी झालेल्यांची तपासणी केल्यानंतर १११ जण करोना संक्रमित आढळले आहेत.

जिल्हा प्रशासनानं दिलेल्या माहितीनुसार १५ जून रोजी पाटणाच्या पालीगंजमध्ये हा विवाह पार पडला. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी नवऱ्या मुलाचा मत्यू झाला. पोस्टमॉर्टेम अहवालात नवरा मुलगा करोना पॉझिटिव्ह होता असं सिद्ध झालं. त्यानंतर या विवाह सोहळ्यात सहभागी झालेल्या जवळपास ३६९ जणांची करोना चाचणी घेण्यात आली.

वाचा : डॉक्टरांनी स्पर्शही केला नाही, मुलाच्या मृतदेहाला कवटाळत पित्याचा आक्रोश
वाचा : कोरोनिलवर पतंजलीचा यू-टर्न; नोटिशीला दिले ‘हे’ उत्तर
वाचा : विशेष ट्रेनसाठी आता तत्काळ तिकीटाचीही सुविधा, रेल्वेची माहिती

वराच्या मृत्यूनंतर विवाह सोहळ्याला उपस्थित राहिलेल्या अनेकांमध्ये करोनाची लक्षणं आढळल्याची तक्रारी सुरू झाल्या होत्या. त्यानंतर आरोग्य प्रशासनाकडून विवाह सोहळ्याला उपस्थित राहिलेल्यांचे ग्रुप सॅम्पल घेण्यात आले. यापैंकी ९ जण करोना संक्रमित आढळले. त्यानंतर झालेल्या चाचणीत तब्बल १११ जण करोना संक्रमित सापडलेत.

कुटुंबानं दिलेल्या माहितीनुसार, नवरा मुलाग लग्नासाठी गाडीनं दिल्लीहून बिहारला दाखल झाला होता. बिहार पोहचल्यानंतर तो काही दिवस आयसोलेशनमध्येही होता. लग्नापूर्वी त्याच्यात काही करोना लक्षणं आढळली होती, परंतु त्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं आणि लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी त्याचा मृत्यू झाला.

धक्कादायक म्हणजे, या व्यक्तीच्या अंत्यसंस्कारासाठी उपस्थित राहिलेल्या स्थानिक दुकानदार, फळ विक्रेता तसंच इतरही अनेक जण करोना संक्रमित आढळलेत, त्यामुळे समूह संसर्गाचा धोकाही व्यक्त करण्यात येतोय.

उल्लेखनीय म्हणजे, प्रशासनाकडून विवाहासाठी जास्तीत जास्त ५० नागरिकांच्या उपस्थितीची परवानगी देण्यात आलेली असताना इतक्या मोठ्या संख्येनं नागरिक या लग्नाला उपस्थित कसे राहिले? हा प्रश्न समोर येतोय.

वाचा : भारत महिन्याला ५० लाख पीपीई सूट निर्यात करणार
वाचा : ‘लॉकडाऊन’चा ९८ वा दिवस, पंतप्रधान नरेंद्र मोदी आज काय बोलणार?
वाचा : गुड न्यूज! भारतात करोनावर पहिली लस तयार, जुलैपासून मानवी चाचणीSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

CSK vs KKR: IPL 2020: राणा दा जिंकलंस… नितिशच्या अर्धशतकाच्या जोरावर केकेआरचे चेन्नईपुढे मोठे आव्हान – ipl 2020: kolkata night riders given 173 runs...

आबुधाबी: नितिश राणाने यावेळी धडाकेबाज फलंदाजी करत सर्वांचीच मने जिंकून घेतली. कोलकाता नाइट रायडर्सचे फलंदाज एकामागून एक अपयशी ठरत असताना राणाने झुंजार अर्धशतकी...

India Stands with France: ‘दहशतवादाविरोधातील लढाईत भारत फ्रान्ससोबत, हल्ल्यांचा निषेध’ – india stands with france in the fight against terrorism

नवी दिल्लीः फ्रान्समधील नाइस शहरात झालेल्या दहशतवादी हल्ल्यासह नुकत्याच झालेल्या हल्ल्यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निषेध केला आहे. दहशतवादाविरूद्धच्या लढ्यात भारत फ्रान्ससोबत आहे, असं...

Recent Comments