Home महाराष्ट्र कर्जबाजारी टीव्ही कलाकाराची आत्महत्या

कर्जबाजारी टीव्ही कलाकाराची आत्महत्या



म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबई

लॉकडाउनमुळे आर्थिक अडचणीत आलेल्या, टीव्ही मालिकांमध्ये काम करणाऱ्या एका कलाकाराने खारघर येथील राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. अमरज्योत सिंग ऊर्फ (३२) असे त्याचे नाव असून, त्याने ‘आदत से मजबूर’ आणि ‘कुलदीपक’ यांसारख्या मालिकांमध्ये भूमिका साकारल्या आहेत.

ग्रेवाल हा खारघरच्या सेक्टर-३६मधील स्वप्नपूर्ती सोसायटीत पत्नीसह राहत होता. शुक्रवारी रात्री त्याची पत्नी जेवण बनवत असताना त्याने बेडरूममध्ये तिच्या दुपट्ट्याने गळफास घेतला. बेडरूममधून मोठा आवाज आल्याने ग्रेवालच्या पत्नीने दरवाजा उघडून पाहिल्यानंतर आत तो गळफास घेतलेल्या स्थितीत आढळला. यावेळी तिने शेजाऱ्यांना पतीच्या गळ्यातील दुपट्टा कापण्याची विनंती केली. मात्र करोनासंसर्गाच्या भीतीने कोणीही तिला मदत केली नाही. याबाबत माहिती मिळताच खारघर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व सुरक्षारक्षकाच्या मदतीने ग्रेवालला खाली उतरवून रुग्णालयात नेले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

करोनामुळे दोन महिन्यांपासून व चित्रपटांचे चित्रीकरण थांबवण्यात आले आहे. त्यामुळे या क्षेत्रातील कलाकारांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यातीलच एक असलेला ग्रेवाल अनेक दिवसांपासून आर्थिक अडचणीत होता. त्याने वैयक्तिक आणि व्यावसायिक कामासाठी लाखो रुपयांचे कर्ज घेतले होते. कर्जबाजारी झाल्यामुळे तो खारघर येथे राहात असलेल्या घराचे भाडेदेखील भरू शकत नव्हता. त्यातच लॉकडाउन घोषित झाल्यामुळे त्याचे उत्पन्न पूर्णपणे थांबले. यातून आलेल्या नैराश्येतून ग्रेवालने आत्महत्या केल्याचे पोलिस उपनिरीक्षक अजित कांबळे यांनी सांगितले. याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.



Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Bill Gates: हे कसं घडलं? बिल गेट्स ठरले अमेरिकेतील सर्वात मोठे शेतकरी! – bill gates became americas biggest farmer bought 242,000 acres land

वॉशिंग्टन: मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स हे अमेरिकेतील सर्वात मोठे शेतकरी झाले आहेत. बिल गेट्स यांनी अमेरिेकेतील १८ राज्यांमधील दोन लाख ४२ हजार एकर...

What is Honey Trap?: Explainer: हनी ट्रॅप म्हणजे काय? – what does it mean by honey trap?

मुंबई: सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर रेणू शर्मा या महिलेनं केलेल्या बलात्काराच्या आरोपानंतर राज्यातील राजकारण ढवळून निघालं आहे. मुंडे हे विरोधकांच्या निशाण्यावर आले...

Anna Hazare: अण्णा हजारेंचं आंदोलन रोखण्यासाठी भाजपचे आटोकाट प्रयत्न; उचललं ‘हे’ पाऊल – bjp trying hard to stop anna hazare from agitation

अहमदनगर: ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आपण आंदोलनावर ठाम असल्याचे सांगितल्याने त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी आता भाजपने पुढचे पाऊल टाकले आहे. कोणत्याही परिस्थितीत अण्णांचे...

Recent Comments