Home शहरं नाशिक कर्जाला विरोध, म्हणजे असंमजसपणा

कर्जाला विरोध, म्हणजे असंमजसपणा


म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

भाजपच्या विकासकामांसाठीच्या तीनशे कोटींच्या कर्जयोजनाला विरोध करणाऱ्या शिवसेनेवर महापौर यांनी जोरदार पलटवार केला आहे. आपल्या प्रभागात कामे करायची नसतील तर शिवसेनेच्या नगरसेवकांनी लेखी पत्र द्यावे, अशी खोचक सूचना करीत महापौरांनी कर्ज काढण्यास होणारा विरोध म्हणजे असमंजपणा ठरविला आहे.

निवडणुकीच्या तोंडावर विकासकामांसाठी सत्ताधारी भाजपने तीनशे कोटींचे कर्ज काढण्याची तयारी केली आहे. परंतु, या कर्ज उभारणीस शिवसेनेचे विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी विरोध करीत ‘दत्तक पित्याने आधी निधी का दिला नाही’ असा सवाल केला. त्यावर महापौर कुलकर्णी यांनी शनिवारी शिवसेनेला उत्तर दिले. सध्या महापालिकेवर कुठलेच दायित्त्व नसल्याने विकासकामे मार्गी लावण्यासाठी कर्ज काढणे गैर नाही. करोनामुळे वैद्यकीय कारणास्तव निधी खर्च झाला. पुढील वर्षी निवडणुकीला सामोरे जावे लागणार असल्याने विकासकामे होणे गरजेचे आहे. विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी महापालिकेला कर्जाच्या खाईत लोटणे योग्य नसल्याचे म्हटले आहे. परंतु, ही बाब वस्तू स्थितीला धरून नाही. वास्तविक विकासकामे सर्वचं नगरसेवकांच्या प्रभागात होणार आहे. शिवसेनेच्या नगरसेवकांना त्यांच्या प्रभागात कामे करायची नसतील तर त्यांनी लेखी पत्र द्यावे अशी खोचक सूचना कुलकर्णी यांनी केली आहे.

महसूल वाढीसाठी नागरिकांवर वसुलीसाठी सक्ती करणे कितपत योग्य होणार याचे उत्तर बोरस्ते यांनी द्यावे. यापूर्वीही महापालिकेने कर्ज घेतले व परतफेड देखील झाली. उत्पन्न वाढीसाठी बीओटी तत्त्वावर प्रकल्प होणार असून महापालिकेला कुठलाही खर्च येणार नाही. उलट उत्पन्न वाढणार आहे. तसेच दत्तक पित्याने नाशिकसाठी काय केले, हे निओ मेट्रो प्रकल्प व पीपीपी तत्त्वावरील शिवाजी स्टेडियम येथील वाहनतळाबाबतचा प्रकल्प वर्षभरापासून जाणीवपूर्वक रखडवून ठेवणाऱ्यांना काय समजणार, असा सूचक इशाराही महापौरांनी दिला आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

nashik corona update: Coronavirus : नाशिक जिल्ह्यात ३२४ नवे रुग्ण; तिघांचा मृत्यू – nashik reported 324 new corona cases and 3 deaths in yesterday

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिकजिल्ह्यात करोना संशयितांची संख्याही वाढत असून, तब्बल १,२४८ अहवाल प्रलंबित म्हणजेच रांगेत आहेत. शुक्रवारी ३२४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले...

coronavirus in aurangabad: जेवणास विलंबामुळे करोनाबाधित रस्त्यावर – corona patients came to road due to they not getting lunch in aurangabad

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबादकोविड केअर सेंटरमध्ये दाखल झालेल्या रुग्णांना महापालिकेतर्फे चहा-नाष्टा व जेवण दिले जाते. किलेअर्क येथील कोविड केअर सेंटरमध्ये शुक्रवारी दुपारचे जेवण...

ipl 2021: IPLचे आयोजन होणार का? या गोष्टीमुळे बीसीसीआयचे टेन्शन वाढले – after spike in corona virus cases bcci in tension over organising indian...

हायलाइट्स:करोना व्हायरसचे रुग्ण वाढले, आता मुंबईत २०२१चे सामने होण्याची शक्यता कमीकरोनामुळे गेल्या वर्षी आयपीएल युएईमध्ये झाले होतेआयपीएलचा १४वा हंगाम एप्रिल-मे महिन्यात होण्याची शक्यात...

Recent Comments