Home ताज्या बातम्या कर्मचाऱ्यांना राज्य सरकारने दिला कडक शब्दांमध्ये इशारा Disciplinary action will be taken...

कर्मचाऱ्यांना राज्य सरकारने दिला कडक शब्दांमध्ये इशारा Disciplinary action will be taken against government and semi-government employees participating in tomorrows strike mhas | News


संपामध्ये राज्य शासकीय-निमशासकीय कर्मचारी सामील होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

मुंबई, 25 नोव्हेंबर : राज्य शासकीय कर्मचारी यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसंदर्भात राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनांनी उद्या 26 नोव्हेंबर रोजी देशव्यापी लाक्षणिक संप करण्याची नोटीस शासनास दिली आहे. त्या अनुषंगाने उद्या होणाऱ्या लाक्षणिक संपात सहभागी होणाऱ्या शासकीय-निमशासकीय कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असे शासनाने प्रसिद्ध केलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे.

या संपात राज्यातील राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, महाराष्ट्र ही संघटना सहभागी आहे. संपामध्ये राज्य शासकीय-निमशासकीय कर्मचारी सामील होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम, 1979 मधील नियम 6 च्या तरतुदीनुसार शासकीय कर्मचाऱ्यास संप करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. त्यामुळे संपात सहभागी होणाऱ्या कर्मचाऱ्यांविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल. केंद्र शासनाचे ‘काम नाही, वेतन नाही’ हे धोरण राज्य शासनही अनुसरत आहे. याबाबत शासनाने 25 नोव्हेंबर, 2020 रोजी परिपत्रक निर्गमित केले आहे. त्याकडे सर्व शासकीय कर्मचाऱ्यांचे लक्ष वेधण्यात येत आहे.

राज्यातील सर्व शासकीय कर्मचाऱ्यांनी आपला संप मागे घ्यावा व जनतेची कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये याकरिता शासकीय कामकाज न थांबवता योग्य मार्गाने आपल्या मागण्या शासनापुढे मांडाव्यात, असे आवाहन शासनाने प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून केले आहे.


Published by:
Akshay Shitole


First published:
November 25, 2020, 9:04 PM IST







Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

jinsi police station aurangabad: सुनेवर अत्याचार; सासऱ्याला अटक – aurangabad police arrested 48 years old man for sexual harassment with daughter in law

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबादघरी कोणी नसल्याची संधी साधत सुनेवर अत्याचाराचा प्रयत्न करणाऱ्या ४८ वर्षांच्या नराधम सासऱ्याला जिन्सी पोलिसांनी रविवारी (१७ जानेवारी) रात्री अटक...

bollywood celebrity on indian victory: भारतीय क्रिकेट संघाचा ऐतिहासिक विजय, बॉलिवूड सेलिब्रिटी म्हणाले … – india vs australia celebrities congratulate indian cricket team for...

मुंबई: अजिंक्य रहाणे याच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघाने ऑस्ट्रेलियात इतिहास घडवला. चौथ्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यात भारताने ०० विकेटनी विजय मिळवत मालिका २-१...

recruitment in ecgc: केंद्र सरकारी नोकरीची संधी; इसीजीसीमध्ये भरती – recruitment in ecgc i.e. export credit guarantee corporation

प्रा. संजय मोरेआजचं युग स्पर्धेचं बनलं आहे. त्यासाठी कठोर परिश्रम आणि योजनाबद्ध प्रयत्न करावे लागतात, याची जाणीव करून देण्याची आवश्यकता वाढली आहे. राज्यात...

health care tips in marathi: Bird Flu Precautions एव्हियन फ्लू म्हणजे काय, सुरक्षित राहण्यासाठी काय करावं? – bird flu precautions tips what is avian...

डॉ. किर्ती सबनीस, संसर्गजन्य रोगतज्ज्ञमागील काही दिवसांत राजस्थान, मध्य प्रदेश, केरळ, महाराष्ट्र आणि हिमाचल प्रदेश येथे बर्ड फ्लू किंवा एव्हियन फ्लू असल्याच्या बातम्या...

Recent Comments