Home शहरं मुंबई कल्याण- डोंबिवली करोना रुग्ण: ठाणे, कल्याण-डोंबिवलीतही वाढती रुग्णसंख्या - coronavirus increasing number...

कल्याण- डोंबिवली करोना रुग्ण: ठाणे, कल्याण-डोंबिवलीतही वाढती रुग्णसंख्या – coronavirus increasing number of patients in thane kalyan dombivali


म. टा. वृत्तसेवा, ठाणे

ठाणे जिल्ह्यातील करोनाबाधितांची वाढती संख्या शनिवारीही कायम राहिली असून दिवसअखेर एकूण रुग्णसंख्या २८ हजार ९४४ इतकी झाली आहे. आतापर्यंत ९४७ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील १४ हजार ४४ रुग्ण करोनामुक्त झाले असून १३ हजार ९५३ जणांवर अद्याप उपचार सुरू आहेत. करोनामुक्त झालेल्या रुग्णांचे प्रमाण ५० टक्क्यांहून अधिक असले, तरी ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई आणि अंबरनाथ येथील झपाट्याने वाढणारी रुग्णसंख्या चिंताजनक आहे.

ठाणे आणि कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात शनिवारी अनुक्रमे ३७१ आणि ४३६ इतक्या विक्रमी रुग्णांची नोंद झाली. ठाणे महापालिका क्षेत्रात शनिवारी १४ रुग्ण करोनामुळे दगावले, तर कल्याण-डोंबिवलीत पाच जणांचा मृत्यू झाला. गेले काही दिवस झपाट्याने रुग्णसंख्या वाढत असलेल्या अंबरनाथमध्येही शनिवार संध्याकाळपर्यंत १४० नव्या रुग्णांची भर पडली असून एकूण रुग्णसंख्या १६३६ इतकी झाली आहे. उल्हानगरमध्ये ६०, तर बदलापूरमध्ये २६ रुग्णांची नोंद झाली आहे. नवी मुंबई शहरातही शनिवारी दिवसभरात १५० नवे करोना रुग्ण आढळून आले आहेत.

ग्रामीण भागात ५१८ रोगमुक्त

ठाण्याच्या ग्रामीण भागात आतापर्यंत ७७३ रुग्ण आढळले असून ५१८ जण बरे झाले आहेत. ग्रामीण भागात ३९ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Nitin Bhalerao Martyr: छत्तीसगडमधील नक्षली हल्ल्यात नाशिकचे जवान नितीन भालेराव यांना वीरमरण – assistant commandant of crpf nitin bhalerao martyred, 9 injured in naxal...

नाशिक: छत्तीसगडमध्ये सुकमा येथे नक्षलवाद्यांनी घडवून आलेल्या स्फोटात सीआरपीएफचे जवान नितीन भालेराव शहीद झाले आहेत. या स्फोटात एका अधिकाऱ्यासह ९ जवान जखमी झाले...

Corona Crisis: शाळा उघडली, तरीही… – sujata patil article on corona crisis impact on education system

सुजाता पाटीलकरोनाच्या विषाणूमुळे अविश्वसनीयरीत्या सगळ्या जगाचा कारभार बंद पडला. जगण्याच्या प्रत्येक क्षेत्रावर करोनाचा परिणाम झाला असून, शिक्षण क्षेत्राला तर समूळ हादरा बसला.मार्च महिन्यापासून...

BSF Jawan in Honey Trap: बीएसएफ जवानांच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये ‘त्याने’ पाकिस्तानी महिलेला अॅड केले! – bsf jawan from ahmednagar honey-trapped by pakistani agent

अहमदनगर: नगर शहरापासून जवळच असलेल्या ससेवाडी येथील प्रकाश काळे हा सीमा सुरक्षा दलातील (बीएसएफ) जवान पाकिस्तानी महिला एजंटाच्या हनी ट्रॅपमध्ये अडकला. पंजाबमध्ये पाक...

Recent Comments