Home शहरं कोल्हापूर कळंबा परिसरात वाहिला माणुसकीचा ओघ

कळंबा परिसरात वाहिला माणुसकीचा ओघ


म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

करोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक संस्था, संघटनांकडून गरीब, गरजूंना मदत सुरू आहे. यामध्ये करवीर पोलिस ठाण्याचे अधिकारी, कर्मचाऱ्यांनी गरजूंना मदत केली आहे. विजापूरमधून आलेली रस्त्यावर काम करणाऱ्या कामगारांची कुटुंबे, कळंबा गावातील कुटुंबाना मदत करण्यात आली. अप्पर पोलिस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या हस्ते गरजूंना किटचे वाटप करण्यात आले.

कर्नाटक राज्यातील विजापूरमधून रस्ते कामासाठी आलेल्या कामगारांची ३३ कुटुंबे गेले महिनाभर अत्यंत हलाखीच्या परिस्थितीमध्ये कळंब्यातील रिक्षा कॉलनीत राहत असल्याचे करवीर पोलिसांच्या निदर्शनास आले. लॉकडाउनमुळे रोजगार मिळत नसल्याने या कुटुंबांचा जगण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यावेळी करवीर पोलिस ठाण्याचे हवालदार राजाराम नारायण बरगे यांनी त्यांना मदत करण्याचे ठरविले. जिवबा नाना जाधव पार्कातील काही रहिवासी आणि सोशल मीडियावर मदतीचे आवाहन केले.

करवीरच्या शिक्षण विभागाचे शिक्षण विस्तार अधिकारी विश्वास सुतार यांनी संजय सुतार यांच्याकडून माहिती घेऊन दहा हजार रुपयांची मदत जाहीर केली. त्यासह जिवबा नाना जाधव पार्क फेज थ्रीमधील रहिवाशांनी मदत गोळा करुन सुमारे वीस हजार पाचशे रुपयांची मदत जाहीर केली.

त्यासह करवीर पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या कळंबा पोलिस चौकीतर्फे कळंबा गावातील १४ गरजू कुटुंबाना अप्पर पोलिस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या हस्ते जीवनावश्यक वस्तूंचे कीट वाटप करण्यात आले. प्रभारी अधिकारी पोलिस निरीक्षक सुनील पाटील, सहाय्यक निरीक्षक अरविंद कांबळे, उपनिरीक्षक अभिजित भोसले, हवालदार आर. एन. बरगे, हवालदार प्रमिला माने, पोलिस नाईक दीपक घोरपडे, कॉन्स्टेबल सातपुते, कळंबा गावचे पोलिसपाटील अनिता तिवले आदींनी संयोजन केले. उपक्रमाला उमेश भवड, अजित तिवले, मुधाले ट्रेडर्सचे मालक सुनील मुधाळे, पोलिस मित्र सचिन कदम यांचे सहकार्य लाभले.

फुलेवाडी रिंगरोड पेट्रोल पंपाजवळील नंदिवाले समाजाच्या वीस कुटुंबांना एक किलो खाद्यतेल, एक किलो तूरडाळ, एक किलो साखर, एक किलो रवा, वॉशिंग पावडर, साबण व प्रत्येक कुटुंबाला रुपये पन्नास रुपये देण्यात आले. जनावरांसाठी एक पोते पशुखाद्य देण्यात आले. या उपक्रमात प्राथमिक शिक्षक बँकेचे संचालक बाजारीव कांबळे, संचालिका लक्ष्मी पाटील, अशोक नायकवडी, धनाजी तडोळे, दिगंबर कुइंगडे, आशिष कांबळे यांचे सहकार्य लाभले.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

vaccine production site: Coronavaccine: …तोपर्यंत लसीविषयीचे दावे विश्वासार्ह मानता येणार नाहीत! – now essential to maintain cold chain from the vaccine production site to...

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई करोनास प्रतिबंध करणाऱ्या लसीच्या उपयुक्तता आणि क्षमतेविषयी सातत्याने दावे केले जात आहेत. मात्र तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या यशस्वी झाल्याखेरीज...

Recent Comments