Home देश काँग्रेस महासचिव प्रियांका गांधी: शहिदांच्या कुटुंबाचं दु:ख अनुभवातून चांगलंच समजू शकते :...

काँग्रेस महासचिव प्रियांका गांधी: शहिदांच्या कुटुंबाचं दु:ख अनुभवातून चांगलंच समजू शकते : प्रियांका गांधी – what kind of friendship the pm has with china, priyanka gandhi attack on modi government


नवी दिल्ली : भारत चीन तणावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वक्तव्यावरून विरोधी पक्षानं केंद्रातील सरकारला चारही बाजुंनी घेरण्याचा प्रयत्न केलाय. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यानंतर काँग्रेस महासचिव प्रियांका गांधी यांनीही सोशल मीडियावर एका व्हिडिओद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर काही प्रश्न उपस्थित केलेत.

‘देशाच्या लष्कराचे सैनिक देशाच्या अखंडतेसाठी आणि देशाच्या संरक्षणासाठी हुतात्मा झाले. त्यांचं बलिदान व्यर्थ जाता कामा नये. देशाची एक इंच जमीनही जाऊ देणार नाही. देशाला सत्य ऐकायचंय’ असं आपल्या व्हिडिओ पोस्टमध्ये प्रियांका गांधी यांनी म्हटलंय.

वाचा :एक नाही तर तीन ठिकाणी चीननं भारतीय जमीन बळकावली : राहुल गांधी
वाचा :चीनने घुसखोरी केली की नाही?; सोनिया गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल

‘चीननं भारताच्या २० जवानांची निर्घृण हत्या केली. आपले वीर जवान निशस्त्र शहीद झाले. त्यांनी देशासाठी, आपल्या सुरक्षेसाठी, आपल्या अखंडतेसाठी हौतात्म्य पत्करलं. त्यांच्या हौतात्म्याचा घाव त्यांच्या कुटुंबीयांना आयुष्यभर सहन करावा लागणार आहे. हे एक असं दु:ख आहे जे मी माझ्या अनुभवातून खूप चांगल्या पद्धतीने समजू शकते’ असं म्हणतानाच प्रियांका गांधी यानी देशाच्या नागरिकांनी हे बलिदान व्यर्थ होऊ देऊ नये, असं आवाहन केलं.

वाचा :india-china clash: चीनची कुरघोडी सुरूच; ‘वाय’ नाल्याचा मार्ग केला ब्लॉक
वाचा :सीमेवरील तणाव आणि गलवान हिंसेला चीन जबाबदार, भारताने सुनावले

‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वक्तव्यानंतर अनेक प्रश्न समोर येतात. हे प्रश्न उपस्थित करणं हे आपलं सर्वांचं कर्तव्य आहे. कारण देशाला हे जाणून घ्यायचंय की जेव्हा पंतप्रधान चिनी नेत्यांसोबत मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करत होते तेव्हा काय करार करण्यात आले होते. काय चर्चा झाली की चिनी आपल्या जमिनीवर ताबा मिळवू शकले. चिनी सैनिकांचा सामना करण्यासाठी भारतीय जवानांना निशस्त्र का पाठवण्यात आलं? हे देशाच्या जनतेला जाणून घ्यायचंय’ असं म्हणत प्रियांका गांधी यांनी मोदी सरकारवर ताशेरे ओढलेत.

ज्या धरतीवर जवान शहीद झाले ती भारताची धरती आपली माता आहे. तुम्ही ही धरती चीनच्या हवाली करू शकत नाही, आम्ही हे होऊ देणार नाहही. आपल्या देशाच्या जमिनीवर चीनला येण्याची परवानगी कुणी दिली? याचं उत्तर देशाला हवंय, असंही काँग्रेस महासचिवांनी म्हटलंय.

सैनिकांच्या हौतात्म्याचं राजकारण करणं पाप आहे, हे पाप आम्ही होऊ देणार नाही. पंतप्रधानांना जवानांच्या बलिदानाचा निरादर करू देणार नाही, असंही त्यांनी म्हटलंय.

वाचा :प्रियांका गांधी भडकल्या; यूपी सरकारला केले ‘हे’ आव्हान
वाचा :मोदींनी अप्रत्यक्षपणे साधला ‘या’ काँग्रेस नेत्यावर निशाणा; म्हणाले…Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Nitish Kumar Returns On Adds With PM Narendra Modi – वादानंतर भाजपच्या जाहिरातींत पुन्हा अवतरले नितीश कुमार!

पाटणा :बिहार विधानसभा निवडणूक २०२० च्या पहिल्या टप्प्यासाठी आज मतदान पार पडतंय. याच दरम्यान दुसरीकडे, बिहारचे मुख्यमंत्री हे पंतप्रधान नरेंद्र मोंदीसोबत जाहिरातींत पुन्हा...

Mumbai Local Train Update: लोकल सर्वांसाठी कधी सुरू होणार? ‘या’ मंत्र्याने दिले मोठे संकेत – We Will Take Decision On Starting Local Train Services...

मुंबईः करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्यात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली होती. राज्यात लॉकडाऊन लागू झाल्यापासून मुंबई लोकलही सर्वसामान्यांसाठी बंद आहे. लॉकाऊनचे निर्बंध शिथील होत...

शिवसेना-भाजपला मिळाले सभापतीपद

म. टा. वृत्तसेवा, येथील महानगरपालिकेच्या स्थायी व महिला बालकल्याण समिती सभापती व उपसभापती पदाची निवडणूक प्रक्रिया मंगळवारी ( दि २७ ) ऑनलाइन पद्धतीने...

Recent Comments