Home ताज्या बातम्या काका राज ठाकरेंच्या पावलावर आदित्य यांचे पाऊल, शिवसैनिकांना लिहिले पत्र After Raj...

काका राज ठाकरेंच्या पावलावर आदित्य यांचे पाऊल, शिवसैनिकांना लिहिले पत्र After Raj Thackeray letter Aditya Thackeray 13 june birthday wrote a letter to shivsena workers mhss | News


राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनीही आपल्या काकांच्या पाऊलावर पाऊल टाकत वाढदिवस साजरा न करण्याचं जाहीर केलं आहे.

मुंबई, 12 जून : राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालला आहे. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे चिंतेचं वातावरण आहे. त्यामुळे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या वाढदिवसाला शुभेच्छा देण्यास येऊ नये, असा आदेश कार्यकर्त्यांना दिला आहे. राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनीही आपल्या काकांच्या पाऊलावर पाऊल टाकत वाढदिवस साजरा न करण्याचं जाहीर केलं आहे.

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचा उद्या म्हणजे 13 जून रोजी वाढदिवस आहे. राज्यात कोरोनाची परिस्थिती पाहता आदित्य ठाकरे यांनी आपला वाढदिवस  साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. आदित्य ठाकरे यांनी एक पत्रक प्रसिद्ध केले आहे.

राज्यावर सध्या कोरोनाचे मोठे संकट आहे. या परिस्थितीशी आपण गेल्या 2-3 महिन्यापासून एकत्रित लढा देत आहोत. माझा 13 जून रोजी वाढदिवस आहे. त्यामुळे या परिस्थितीत वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे, असं आदित्य यांनी स्पष्ट केलं आहे.

आपण  जिथे आहात तिथूनच शुभेच्छा देण्याचं आदित्य यांचं शिवसैनिकांना आवाहन केले आहे. होर्डिंग्ज, हार-तुरे यावर खर्च टाळून तुम्ही कोरोनाच्या संकटात अडकलेल्या लोकांवर किंवा मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी मदत करावी, याच मला आनंद होईल, असं आवाहन आदित्य यांनी केलं.

राज ठाकरे यांचा 14 जूनला वाढदिवस

विशेष म्हणजे, आदित्य यांचा वाढदिवस हा 13 जून रोजी आहे. तर काका आणि  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा वाढदिवस हा 14 जून रोजी आहे.  राज ठाकरे यांनीही   कोरोनाच्या परिस्थतीमुळे यंदा वाढदिवस साजरा करणं अजिबात उचित नाही, असं म्हणत त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना शुभेच्छा द्यायला येऊ नये, असा आदेश दिला आहे. त्याऐवजी आहे  तिथेच जनतेला मदत करा, असा आदेश देणारं जाहीर पत्र कार्यकर्त्यांना उद्देशून राज यांनी लिहिलं आहे.

हेही वाचा –वधूच्या मेकअपसाठी चालल्या होत्या बहिणी, पण वाटेत घडले भीषण…

राज ठाकरे आपल्या पत्रात म्हणाले की, ‘कोरोनामुळे यंदा वेगळी परिस्थिती आहे. सर्वत्र चिंतेचे वातावरण असताना वाढदिवस साजरा करणं अजिबात उचित नाही. महाराष्ट्र सैनिकांना माझ्या सूचनावजा आदेश आहे की, कोणीही मला शुभेच्छा द्यायला येऊ नका. तुम्ही जिथे आहात तिथेच जनतेला मदत करा, दिलासा द्या. ह्याच माझ्यासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा आहेत.’

संपादन – सचिन साळवे

First Published: Jun 12, 2020 12:08 PM IST

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

nashik recovery rate: करोनामुक्तीत नाशिक अव्वल – nashik corona update : nashik recovery rate is 91.10 percent and first ranked in recovery rate in...

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिकप्रशासन, आरोग्य यंत्रणा यांच्या प्रयत्नातून करोनासंदर्भात नागरिकांमध्ये जनजागृती झाल्यामुळे आणि करोनाची भीती दूर झाल्यामुळे नाशिक जिल्ह्यात करोनामुक्तीचा वेग वाढला...

aurangabad smart city: ‘स्मार्ट सिटी’तून बदलेल औरंगाबादचा चेहरा – aurangabad administration has planned to undertake major 4 projects under smart city scheme

म. टा. प्रतिनिधी,औरंगाबादस्मार्ट सिटी योजनेतून एकूण सातशे कोटींचे चार मोठे प्रकल्प हाती घेण्याचे नियोजन प्रशासनाने केले आहे. स्मार्ट सिटी बस, सफारी पार्क, ई-शासन...

Recent Comments