Home ताज्या बातम्या काय आहे सुशांत आणि सिया कक्करच्या आत्महत्येचं कनेक्शन? कुटुंबीयांनी दिली धक्कादायक माहिती...

काय आहे सुशांत आणि सिया कक्करच्या आत्महत्येचं कनेक्शन? कुटुंबीयांनी दिली धक्कादायक माहिती siya kakkar and sushant singh rajput suicide connection know what her parents told to police mhjb | News


अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर अवघ्या काही दिवसातच टिकटॉक स्टार असणाऱ्या सिया कक्कर या 16 वर्षीय तरूणीने देखील आत्महत्या केली. गेल्या आठवडाभरापासून ती नैराश्यात होती.

नवी दिल्ली, 27 जून : अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर अवघ्या काही दिवसातच टिकटॉक स्टार असणाऱ्या सिया कक्कर या 16 वर्षीय तरूणीने देखील आत्महत्या केली. गेल्या आठवडाभरापासून ती नैराश्यात होती. मात्र तिच्या कुटुंबीयांना ती असं टोकाचं पाऊल उचलेल अशी शंका सुद्धा आली नाही. कारण ती या दिवसातही तिची नेहमीची कामं नित्याने करत होती. गीता कॉलनी पोलीस ठाण्यात तिच्या कुटुंबीयांनी ही माहिती दिली आहे. एका मीडिया अहवालानुसार, तिच्या कुटुंबीयांनी अशी माहिती दिली की, लॉकडाऊनमुळे 3 महिन्यांपासून त्यांचा पूर्ण परिवार घरीच होता, मात्र तरीही तिचं नैराश्य आत्महत्येपर्यंत पोहोचेल कुणाला वाटलं नव्हतं. दरम्यान पोलीस तिच्या आत्महत्येचं नेमकं कारण तपासत आहेत.

अमर उजालाने यासंदर्भात वृत्त दिले आहे. दरम्यान पोलिसांच्या हवाल्याने त्यांनी सांगितले आहे की, सियाचे वडील आणि आजोबा डॉक्टर होते, त्यामुळे त्यांना तिच्या नैराश्याबाबत काहीशी शंका होती. पण ते एवढ्या टोकाला जाईल असं कुणाला वाटलं नव्हतं. पोलिसांना अद्याप पोस्टमार्टम अहवाल मिळाला नाही आहे मात्र गळफास घेऊनच तिचा मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. तिच्या शरीरावर कोणत्याही जखमा आढळल्या नाही आहेत. तिला कोणती धमकी मिळाल्याच्या गोष्टींना पोलिसांनी नकार दिला आहे. कुटुंबीयांनी देखील ही गोष्ट  नाकारली आहे.

(हे वाचा-सुशांतलाही मिळाली होती Fairness cream ची जाहिरात; धुडकावली कोट्यवधींची ऑफर)

मीडिया अहवालानुसार सियाने अवघ्या 10 मिनिटांच्या वेळामध्ये तिचं आयुष्य संपवलं. तिने गळफास घेण्याच्या 10 मिनिटं आधी तिच्या आईने तिला घरात वावरताना पाहिले होते. तिची आई स्वयंपाकघरात होती, तर वडील आणि आजोबा खालीच त्यांच्या क्लिनिकमध्ये होते. तिचं 3 खोल्यांचं घर आहे तर तिला एक भाऊ आणि बहिण देखी आहे. बुधवारी साडेआठ वाजता सियाच्या आईने तिला पाहिलं. काही वेळाने तिची आई मागच्या खोलीत गेली तर त्याचं दार बंद होतं.

(हे वाचा-प्रसूनजी आपने सीन गलत समझा! मुलींच्या Sexualizationच्या आरोपाला स्वराचं उत्तर)

तिने हाक मारून पण पाहिलं पण कोणतं उत्तर मिळालं नाही. शेवटी तिने खाली उतरून सियाच्या वडिलांना सर्व हकिगत सांगितली. सियाने ज्या खोलीमध्ये गळफास घेतला त्याचे बाथरूम दोन खोल्यांमध्ये अॅटॅच आहे, दुसऱ्या बाजुने ते खुले होते. तिथून तिचे आई-बाबा आतमध्ये आले, तर त्यांना ओढणीने गळफास घेतलेली सिया दिसली.

First Published: Jun 27, 2020 09:21 AM IST

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

पैशाच्या व्यवस्थापनाचे धडे

जॉन कोलासो तुम्ही श्रीमंत असा की गरीब, हातात असलेल्या कसं करायचं हे जर तुम्हाला समजत नसेल तर तुम्ही अडचणीत सापडणारच! वित्तीय वा आर्थिक...

Raza Academy: रजा अकादमीवर बंदीची मागणी – bjp mla atul bhatkhalkar demands ban on raza academy over spreading communal tension

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईमुंबईतील भेंडीबाजार येथे फ्रान्सच्या पंतप्रधानांचे फोटो रस्त्यांवर लावून निदर्शने करणाऱ्या रजा अकादमीचे हे कृत्य देशद्रोही आहे. दहशतवादाविरोधात बोलणाऱ्या व्यक्तीचा...

आजचं राशीभविष्य… दिनांक ३१ ऑक्टोबर २०२०

आजचं राशीभविष्य... दिनांक ३१ ऑक्टोबर २०२० Source link

Recent Comments