Home ताज्या बातम्या काय सांगता! माणसाच्या कवटीवर तब्बल 5 हजार वर्षांपूर्वी झाली होती मेंदूची शस्त्रक्रिया...

काय सांगता! माणसाच्या कवटीवर तब्बल 5 हजार वर्षांपूर्वी झाली होती मेंदूची शस्त्रक्रिया russian-scientists-found 5000-year-old-skull-failed-brain-surgery trepanation-patient know what research says gh | Videsh


मेंदूवर शस्त्रक्रिया केलेल्या एखाद्या माणसाची कवटी सापडण्याची ही पहिली वेळ आहे. ही कवटी 5000 वर्ष जुनी आहे.

मॉस्को, 26 ऑक्टोबर : मृत्यू होण्यापूर्वी मेंदूची शस्त्रक्रिया केलेल्या पाच हजार वर्षांपूर्वीच्या माणसाची कवटी रशियन शास्त्रज्ञांना सापडली आहे. पुरातत्वशास्त्रज्ञांना बऱ्याचदा अनेक सांगाडे, कवट्या उत्खनन करताना आढळतात. पण मेंदूवर शस्त्रक्रिया केलेल्या एखाद्या माणसाची कवटी सापडण्याची ही पहिली वेळ आहे. ही कवटी 5000 वर्ष जुनी आहे. रशियाच्या वैज्ञानिकांना ही कवटी क्रिमियामध्ये सापडली आहे.

शस्त्रक्रिया अयशस्वी झाली असावी –

शास्त्रज्ञांचा असा अंदाज आहे की. मेंदूची ही शस्त्रक्रिया यशस्वी झाली नसावी आणि या ऑपरेशनदरम्यान या व्यक्तीचा मृत्यू झाला असावा, अशी शक्यता आहे. संशोधकांनी या कवटीची थ्रीडी छायाचित्रं काढली, ज्यात असं दिसून येतं की, हा माणूस 20 ते 30 वर्षे वयोगटातील होता. त्याच्या कवटीत (trepanation) ट्रेपॅनेशन शस्त्रक्रिया करुन घेण्यात आली होती. या प्रकारच्या शस्त्रक्रियेसाठी, त्या वेळी रुग्णाच्या कवटीत एक छिद्र केलं जात असे.

जखमा भरू शकल्या नाही –

संशोधकांचं म्हणणं आहे की, ही शस्त्रक्रिया यशस्वी झाली नसावी, यामुळे हा माणूस जास्त काळ जगू शकला नाही. कॉन्टेक्चुअल एंथ्रोपोलॉजी लॅबोरेटरीच्या प्रमुख डॉ. मारिया डोब्रोव्होल्स्काया यांच्या म्हणण्यानुसार, हे स्पष्ट आहे की हाडांच्या पृष्ठभागावर trepanation चे संकेत स्पष्ट दिसत होतं.

दगडांच्या उपकारणांद्वारे शस्त्रक्रिया –

डेली मेलच्या अहवालानुसार, इंस्टिट्यूट ऑफ आर्कियोलॉजी ऑफ द रशियन अॅकॅडमी ऑफ सायन्स मॉस्कोच्या पुरातत्त्व संस्थेच्या वैज्ञानिकांनी सांगितलं की, पुरातन डॉक्टरांकडे निश्चितच दगडाची शस्त्रक्रिया उपकरणं असावीत.

फक्त तीन निशाण होते –

डॉ. डोब्रोव्होल्स्काया यांनी सांगितलं की, जुन्या काळात trepanation पासून वाचण्याचं प्रमाण खूप जास्त होतं. तरीही, हा माणूस वाचू शकला नाही. दगड युग पुरातत्त्व संशोधक ओलेस्या उस्पेन्स्काया म्हणतात की, त्या काळातील डॉक्टरांनी शरीरावर तीन प्रकारच्या खुणा केल्या होत्या, ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या दगडांच्या चाकूंनी केलेल्या दिसत होत्या. संशोधकांच्या म्हणण्यानुसार, मेंदूच्या शस्त्रक्रियेचा उपयोग त्यावेळी गंभीर डोकेदुखी, हेमाटोमा (Hematoma), डोक्याच्या जखमा किंवा अपस्मार (Epilepsy)या आजाराच्या उपचारांसाठी केला गेला असेल.

तज्ज्ञांचं मत आहे की, trepanation जुन्या काळामध्ये शस्त्रक्रिया आणि काही विधी म्हणून वापरलं जात होतं. काही प्रकरणांमध्ये, याचा उपयोग मनुष्यांचं वर्तन बदलण्यासाठीही केला जात असे. रशियामधील काही संशोधकांनी, प्रागैतिहासिक काळात अशा तीव्र शस्त्रक्रियांमुळे होणारी वेदना कमी करण्यासाठी भांग, मॅजिक मशरूम आणि अंगारेधुपारे वापरले जात असल्याचं सांगितलं आहे.


Published by:
Karishma Bhurke


First published:
October 26, 2020, 3:08 PM IST

Tags:Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

aurangabad News : ज्येष्ठ नागरिक, दिव्यांगांना घरीच मतदानाची सोय – senior citizens, disabled people can vote at home

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद,पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत असलेले ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग मतदारांना 'मोबाइल पोलिंग बुथ'च्या माध्यमातून त्यांच्या घरीच गोपनीय पद्धतीने मतदान करण्याची सुविधा...

sourav ganguly: India vs Australia : रिषभ पंत आणि वृद्धिमान साहा यांच्यापैकी कोणाला संधी मिळायला हवी, सौरव गांगुली म्हणाले – rishabh pant and wridhiman...

सिडनी, india tour of australia 2020 : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दौऱ्याला २७ नोव्हेंबरपासन सुरुवात होणार आहे. पण भारताच्या संभाव्य संघात रिषभ पंत...

adult woman free to live with anyone anywhere: ‘प्रौढ तरुणी आपल्या मर्जीने कुठेही आणि कोणाबरोबरही राहण्यास स्वतंत्र’ – adult woman free to live with...

नवी दिल्लीः दिल्ली उच्च न्यायालयाने ( delhi high court ) बुधवारी एक महत्त्वपूर्ण निकाल दिला. प्रौढ महिला आपल्या मर्जीने कोणाबरोबरही आणि कुठेही राहण्यास...

Recent Comments