Home ताज्या बातम्या कारनं अचानक घेतला पेट आणि...पाहा मुंबईतील बर्निंग कारचा थरारक VIDEO Mumbai car...

कारनं अचानक घेतला पेट आणि…पाहा मुंबईतील बर्निंग कारचा थरारक VIDEO Mumbai car suddenly caught fire in Andheri video mhkk | News


आठवड्याभरापूर्वी नाशिक जिल्ह्यातील चांदवडजवळ मुंबई-आग्रा महामार्गावर असाच बर्निंग कारचा थरार पाहायला मिळाला होता.

मुंबई, 18 ऑक्टोबर : अंधेरी परिसरात रात्री उशिरा एका कारनं अचानक पेट घेतला. भररस्त्यात कारमध्ये अग्नितांडव पाहायला मिळाला. हा बर्निंग कारचा थरार पाहून रस्त्यावर गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. स्थानिकांनी अग्निशमन दलाला याची माहिती दिली. दरम्यान या दुर्घटनेदरम्यान कार चालक थोडक्यात बचावल्याची माहिती मिळाली आहे. कारनं पेट घेताक्षणी कार चालकाला आपला जीव वाचवण्यात यश आलं आहे.

आगीची माहिती तातडीनं अग्निशमन दलाला मिळाल्यानंतर घटनास्थळी दाखल झाले मात्र तोपर्यंत संपूर्ण कार आगीच्या भक्ष्यस्थानी होती. आगीत कार जळून खाक झाली आहे. शनिवारी रात्री उशिरा अंधेरीतल्या रस्त्यावर बर्निंग कारचा हा थरार पाहायला मिळाला. ही आग नेमकी कशामुळे लागली या संदर्भात अद्याप कोणतीही माहिती मिळू शकली नाही.

हे वाचा-थेट JCB ला म्हणाला, ‘मला पाठ खाजवून दे’; Viral Video पाहून हातच जोडाल

आठवड्याभरापूर्वी नाशिक जिल्ह्यातील चांदवडजवळ मुंबई-आग्रा महामार्गावर असाच बर्निंग कारचा थरार पाहायला मिळाला. या कारमध्ये नेत्याचा होरपळून मृत्यू झाला होता. त्यानंतर मुंबईत शनिवारी रात्री उशिरा बर्निंग कारचा पुन्हा थरार पाहायला मिळाला आहे. ही आग नेमकी कशामुळे लागली याबाबत अद्याप माहिती मिळू शकली नाही. या आगीत गाडी जळून खाक झाली आहे.


First published:
October 18, 2020, 7:23 AM ISTSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

nashik corona update: जिल्ह्यात ५०२ रुग्ण; अकरा जणांचा मृत्यू – nagpur reported 502 new corona cases and 11 deaths in yesterday

म. टा. प्रतिनिधी, नाशिक गेल्या सात महिन्यांपासून करोनाने जिल्ह्यात घातलेले थैमान आता कुठे उतरणीला लागत असल्याची आशा काही दिवसांपासून करोना रुग्णांच्या घटत्या संख्यावारीमुळे...

Imrati Devi Used Word Item For Kamal nath Mother And Sister, Video Goes Viral – कमलनाथांच्या आई-बहिणीला ‘आयटम’ म्हणणाऱ्या इमरती देवी व्हायरल

भोपाळ : काँग्रेसचे नेते आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी एका महिलेसाठी 'आयटम' हा शब्द वापरल्यानंतर मोठा गदारोळ उडाला. मध्य प्रदेशातही या...

Recent Comments