Home शहरं मुंबई कारोनाग्रस्त नर्सचा फोटो व्हायरल; कुटुंबाला मनस्ताप

कारोनाग्रस्त नर्सचा फोटो व्हायरल; कुटुंबाला मनस्ताप


म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई

करोनाच्या वाढत्या संसर्गामध्ये प्रत्येक रुग्णाला वैद्यकीय सेवा मिळावी म्हणून आम्ही जीव धोक्यात घालतो, स्वतःच्या जिवाचीही, कुटुंबाचीही पर्वा करत नाही पण जेव्हा आम्हाला संसर्ग होतो तेव्हा काय पद्धतीची वागणूक मिळते, कुटुंबाला किती आधार मिळतो, असा अस्वस्थ प्रश्न केईएम रुग्णालयातील परिचारिकेने उपस्थित केला आहे.

करोनाचा संसर्ग झाल्यानंतर विक्रोळीमध्ये राहणाऱ्या या परिचारिकेचे फोटो आणि तिला संसर्ग झाल्याची माहिती व्हॉटस्अॅपवर व्हायरल करण्यात आली. त्यामुळे त्यांना व त्यांच्या कुटुंबीयांनी किती मनस्ताप झाला, हे सांगताना त्यांच्या डोळ्यातील पाणी थांबत नव्हते. विक्रोळीला राहणाऱ्या या परिचारिकेचे फोटो, माहिती व संपर्क क्रमांक दिल्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांना मनस्ताप होत आहे.

‘आम्ही रुग्णसेवा देतो, ज्यांना शक्य आहे त्यांनी घरीच थांबा, बाहेर पडू नका, असेही आवर्जून सांगतो. या मोबदल्यात कृतज्ञतेचीही अपेक्षा करत नाही. कारण रुग्णसेवा हे व्रत आहे. पण रुग्णसेवा देत असताना आम्हाला संसर्ग होतो, त्यात आमची काय चूक? उपचार घेत असताना या व्हायरल मेसेजमुळे कुटुंबीयांचे काय हाल होत असतील, दोन लहान मुलांना किती त्रास होत असेल, या कल्पनेनेही डोळ्यात पाणी येते,’ असे या परिचारिकेने उद्विग्नपणे सांगितले. त्यांच्या कुटुंबीयांचेही विलगीकरण केल्यामुळे बाहेर जाता येत नाही. त्यांचे नातेवाईक धान्य, खायच्या वस्तू घेऊन सोसायटीमध्ये आले होते. पण त्यांना तिथे प्रवेश मिळावा म्हणून खूप झगडावे लागले. यापूर्वीही अनेक रुग्णालयांतील परिचारिकांना या प्रकारचे अनुभव आले आहेत.

फोटो पाहून धक्का

काही वर्षांपूर्वी विक्रोळीमध्ये राहणाऱ्या या परिचारिकेच्या घरातल्या छताचा भाग रात्री कुटुंब झोपेत असताना पडला होते. त्यात त्यांच्या मुलींना गंभीर दुखापत झाली. त्यावेळी मुलीशेजारी बसलेल्या असताना कुणीतरी काढलेला फोटो या व्हॉटसअॅप मेसेजमध्ये वापरण्यात आला आहे. अशा प्रकारे पॉझिटीव्ह व्यक्तींचे फोटो व्हायरल करण्याच्या प्रकाराची सायबर सेलने गांभीर्याने दखल घ्यायला हवी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

India vs Australia: Brisbane Weather Day 5: पाचव्या दिवशी कसे असेल पिच आणि हवामान; कोण होणार विजेता, जाणून घ्या – aus Vs Ind 4th...

ब्रिस्बेन: aus vs ind 4th test Brisbane Weather भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर-गावस्कर मालिकेतील चौथा आणि अखेरचा कसोटी सामना ब्रिस्बेन येथे सुरू आहे....

आम्हाला कमी लेखू नका! हॉलिवूडवर वरचढ ठरायला आले बॉलिवूडचे 'सुपरहिरो'

मुंबई- मनोरंजनविश्वात काही आगामी बिग बजेट सिनेमांची चर्चा आतापासूनच रंगू लागली आहे. एरवी 'सुपरहिरो'चे चित्रपट म्हटल्यावर सर्वप्रथम हॉलिवूडपटांचीच चर्चा होते. पण, आता लवकरच...

अर्णब गोस्वामींची अडचण वाढणार; गृहमंत्री अनिल देशमुखांनी केले मोठे वक्तव्य – arnab goswami chat how arnab knows sensitive things like balakot and pulwama says...

नाशिक: रिपब्लिक टीव्हीचे (Republic TV) मुख्य संपादक अर्णब गोस्वामी (Arnab Goswami) यांच्या कथित व्हॉट्सअॅप चॅट (Whatsapp Chat) उघड झाल्यानंतर त्यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली...

Recent Comments