Home मनोरंजन किरण कुमार करोना पॉझिटिव्ह: अभिनेते किरण कुमार करोना पॉझिटिव्ह, १० दिवसांपासून आहेत...

किरण कुमार करोना पॉझिटिव्ह: अभिनेते किरण कुमार करोना पॉझिटिव्ह, १० दिवसांपासून आहेत क्वारन्टीन – bollywood actor kiran kumar test positive for coronavirus


मुंबई- भारतात सतत करोना व्हायरसचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. यातही मुंबईत रुग्ण झपाट्याने वाढण्याचं प्रमाण सर्वात जास्त आहे. बॉलिवूड अभिनेते किरण कुमार करोना पॉझिटिव्ह असल्याचं समोर आलं. स्वतः किरण कुमार यांनी ही माहिती दिली. यानंतर त्यांना घरीच क्वारन्टीन करण्यात आलं असून त्यांची पुढील चाचणी २५ किंवा २६ मे रोजी होणार असल्याचं म्हटलं जात आहे.

लक्षण नसतानाही दिसले करोना पॉझिटिव्ह-

किरण कुमार यांनी सांगितलं की, त्यांना खोकला, सर्दी, ताप, श्वास घ्यायला त्रास अशी कोणत्याही प्रकारची करोनाची लक्षणं दिसली नाही. दरम्यान, त्यांनी वेगळी टेस्ट केली असता ते करोना पॉझिटिव्ह असल्याचं समोर आलं. किरण म्हणाले की, ‘घरात दोन माळे असून पत्नी आणि मुलं पहिल्या मजल्यावर राहतात तर मी स्वतः दुसऱ्या मजल्यावर क्वारन्टीन करून घेतले आहे. कुटुंबासोबत फोनवर बोलतो.’

सकारात्मक विचार करा-

किरण कुमार म्हणाले की, करोनाची लागण झाली म्हणून घाबरण्याची गरज नाही. यापासून वाचायचं आहे आणि पुढे जायचं आहे. मी पूर्ण फिट आहे आणि व्यायामही सुरू आहे. आपल्याला जेवढं सकारात्मक राहता येईल तेवढं राहणं आवश्यक आहे. यासोबतच आपण घरी राहणं आवश्यक आहे. जेणेकरून इतरांना त्याचं संक्रमण होणार नाही. आपल्याला संपूर्ण देशाला यापासून वाचवायचं आहे.

या सेलिब्रिटींना झाली होती करोनाची लागण-

किरण कुमार यांच्याआधी बॉलिवूड गायिका कनिका कपूर, निर्माते करीम मोरानी आणि त्याच्या दोन्ही मुली जोआ मोरानी आणि शाजिया मोरानी करोना पॉझिटिव्ह होते. मात्र योग्य उपचारांनंतर ते करोना मुक्त झाले. याशिवाय अनेक सेलिब्रिटींच्या घरी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही करोनाची लागण झाली आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

India vs Australia: Brisbane Weather Day 5: पाचव्या दिवशी कसे असेल पिच आणि हवामान; कोण होणार विजेता, जाणून घ्या – aus Vs Ind 4th...

ब्रिस्बेन: aus vs ind 4th test Brisbane Weather भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर-गावस्कर मालिकेतील चौथा आणि अखेरचा कसोटी सामना ब्रिस्बेन येथे सुरू आहे....

आम्हाला कमी लेखू नका! हॉलिवूडवर वरचढ ठरायला आले बॉलिवूडचे 'सुपरहिरो'

मुंबई- मनोरंजनविश्वात काही आगामी बिग बजेट सिनेमांची चर्चा आतापासूनच रंगू लागली आहे. एरवी 'सुपरहिरो'चे चित्रपट म्हटल्यावर सर्वप्रथम हॉलिवूडपटांचीच चर्चा होते. पण, आता लवकरच...

अर्णब गोस्वामींची अडचण वाढणार; गृहमंत्री अनिल देशमुखांनी केले मोठे वक्तव्य – arnab goswami chat how arnab knows sensitive things like balakot and pulwama says...

नाशिक: रिपब्लिक टीव्हीचे (Republic TV) मुख्य संपादक अर्णब गोस्वामी (Arnab Goswami) यांच्या कथित व्हॉट्सअॅप चॅट (Whatsapp Chat) उघड झाल्यानंतर त्यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली...

Recent Comments