Home ताज्या बातम्या 'कुडमुड्या ज्योतिषी' म्हणत शरद पवारांनी उडवली रावसाहेब दानवेंची खिल्ली NCP chief Sharad...

‘कुडमुड्या ज्योतिषी’ म्हणत शरद पवारांनी उडवली रावसाहेब दानवेंची खिल्ली NCP chief Sharad Pawar slams BJP minister Raosaheb Danve on The government will fall in two months mhss | Mumbai


‘रावसाहेब दानवे यांनी विधिमंडळात अनेक वर्ष काम केले आहे. त्यांना आम्ही काम करताना पाहिले आहे. पण ठीक आहे. त्यांचा हा गुण मला माहिती नव्हता’

मुंबई, 24 नोव्हेंबर : ‘सामन्य माणसं जर आपल्या सोबत असतील कुडमुड्या ज्योतिष्याचे काही चालत नाही’ असं म्हणत राष्ट्रवादीचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad pawar) यांनी भाजपचे केंद्रीय नेते रावसाहेब दानवे (raosaheb danve) यांना चांगलेच फटकारून काढले.

‘येत्या दोन ते तीन महिन्यात महाविकास आघाडीचे सरकार पडेल आणि आपले सरकार येईल’ असं भाकीतच भाजपचे नेते रावसाहेब दानवे यांनी वर्तवलं होतं. त्यांच्या वक्तव्याचा शरद पवार यांनी आपल्या शैलीत समाचार घेतला.

पत्नी माहेरी गेली म्हणून पतीने गळा दाबून केली हत्या; दुष्कृत्यानंतर म्हणाला…

‘रावसाहेब दानवे यांनी विधिमंडळात अनेक वर्ष काम केले आहे. त्यांना आम्ही काम करताना पाहिले आहे.  पण ठीक आहे. त्यांचा हा गुण मला माहिती नव्हता. खेड्यापाड्यातून आलेला नेता म्हणून मी त्यांच्याकडे पाहत होतो. त्यांची ज्योतिष्य अभ्यासाची तयारी मला माहिती नव्हती. ज्योतिष्य शास्त्राचा जानकार म्हणून त्यांचा परिचय नव्हता, तो आता झाला आहे. पण, सामन्य माणसं जर आपल्या सोबत असतील कुडमुड्या ज्योतिष्याचे काही चालत नाही’ असा सणसणीत टोला पवारांनी दानवेंना लगावला.

‘देवेंद्र फडणवीस यांचा त्रास समजू शकतो’

‘हे सरकार बेईमानीने आले आहे अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली होती, असा सवाल विचारला असता पवार म्हणाले की, ‘सत्ता गेल्याच्या नंतर त्रास होत असतो.  ते मी समजू शकतो. त्या त्रासाच्या, उद्वेगाच्या पोटी लोकं अशी शब्दं वापरत असतील. त्याचे इतके गांभीर्याने घेण्याची गरज नाही. त्यांची सत्ता गेली ही अस्वस्थता आहे.’

‘निगेटिव्ह सेल्फ टॉक’ मानसिक आरोग्यासाठी धोकादायक; यातून कसं मुक्त व्हाल

तसंच, ‘साहजिक माणसाने काही आशा, अपेक्षा ठेवावी. त्याबद्दल काही वाद नाही. कारण त्यांनी मागेही सांगितले होते, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, पण त्यामुळे कालही ते असंच काही बोलले होते. पण, ठीक आहे, लोकं त्याच्याकडे बारकाईने लक्ष देतात. ती अतिभावना असेल तर आपण खबरदारी घेतली पाहिजे, हे लोकांच्या अधिक लक्षात येईल, असं टोलाही पवारांनी लगावला.

‘दिल्लीत वेगळं राज्य असेल तर राज्य चालवणं कठीण असतं. लोकांची कामं करत असताना मदत करण्याऐवजी‌ केंद्र सरकार विरोधी पक्षाला नाउमेद करत आहे. त्याचे उदाहरण आज‌ पाहण्यास मिळाले आहे. दिल्लीच्या सत्तेचा वापर लोकांचा प्रश्न सोडवण्याऐवजी विरोधकांना आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे, आज हे बघायला मिळेल’ असं म्हणत शरद पवार यांनी शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्यावरील कारवाईवरून केंद्र सरकारवर टीका केली.


Published by:
sachin Salve


First published:
November 24, 2020, 5:13 PM IST

Tags:Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Joe Biden: Joe Biden बायडन पहिल्याच दिवशी भारतीयांना देणार ‘ही’ मोठी भेट! – joe biden to propose 8-year citizenship path for immigrants indians will...

वॉशिंग्टन: अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची सुत्रे हाती घेतल्यानंतर पहिल्याच दिवशी जो बायडन मोठा निर्णय घेणार आहे. अमेरिकेत असलेल्या एक कोटी दहा लाख स्थलांतरितांना देशात कायदेशीर...

doorstep banking become popular: ‘बँक आपल्या दारी’; या बँकांकडून मिळेत तुम्हाला घरीच बँंकिंग सेवा – bank at doorstep become popular

वृत्तसंस्था, नवी दिल्ली : सरकारी बँकांनी ग्राहक टिकवून ठेवण्यासाठी, तसेच अधिकाधिक ग्राहक आकर्षून घेण्यासाठी सप्टेंबर २०२०मध्ये एकत्र येत 'बँक आपल्या दारी' हा उपक्रम...

maharashtra jobs latest news: Maharashtra Jobs: लॉकडाऊन काळात दोन लाख नोकऱ्या!; ठाकरे सरकारने केला ‘हा’ दावा – two lakh jobs given during lockdown says...

मुंबई: रोजगाराच्या क्षेत्रात राज्य सरकारने मोठे काम केले आहे. २०२० या संपूर्ण वर्षाच्या कालावधीत राज्यातील तब्बल १ लाख ९९ हजार ४८६ बेरोजगारांना रोजगार...

Udayanraje Bhosale: मी सुद्धा भरपूर खाज असलेला खासदार आहे; उदयनराजेंचा रोख कोणाकडे? – udayanraje bhosale inaugration at grade separator in satara

साताराः 'शहरातील पोवई नाका परिसरातील मागील पावणेतीन वर्ष अव्याहत सुरू असलेले ग्रेड सेपरेटर चे काम पूर्णत्वाला जाऊन त्याचे उद्घाटन आम्ही केले आता ग्रेट...

Recent Comments