Home शहरं नागपूर कुणी पुसते गाडी, कुणी विकतेय खेळणी

कुणी पुसते गाडी, कुणी विकतेय खेळणी(आज बालकामगार विरोधीदिन)

प्रशासनाच्या लेखी मात्र बालकामगार नाही

pravin.lonkar@timesgroup.com

नागपूर : सिग्नलवर गाडी थांबली की चिमुकली मुले हातात कापड घेऊन गाडीची काच पुसताना दिसतो, कुणी खेळणी घेऊन ‘साहब ले लो’ अशी याचना करत असतो… तर कुणी हात पसरवून भीक मागत असतो.… या मुलांकडून भीक मागवून घेणारे आजूबाजूला कुठेतरी भटकत असतात. चिमुकल्या हातांना राबवून घेणारी यंत्रणा सक्रिय असताना शासन मात्र यांना बालकामगारांच्या व्याख्येतच मोडत नाही. प्रशासकीय यंत्रणेला चार वर्षांत केवळ एकच बालकामगार सापडला असल्याचे धक्कादायक वास्तव आहे.

बालकांना कामावर ठेवणाऱ्यांच्या विरोधात कठोर कायदे करण्यात आले असल्याचे शासनाकडून सांगितले जाते, हे खरेही आहे. कुणी बालकांकडून काम करवून घेत असतील तर त्यांना ५० हजार रुपयांचा दंड आणि ५ वर्षांची शिक्षा होऊ शकते. मात्र, बालकामगार कुणाला म्हणावे यावरून प्रशासनाच्या नजरेत बालकामगार येतच नसल्याचे वास्तव आहे. रस्त्यांवर राबणारी चिमुकली मुले या बालकामगाराच्या व्याख्येतच येत नसल्याचे प्रशासकीय अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

विभागात केवळ एकच?

बालकामगार निर्मूलन प्रतिबंधक अधिनियम १९८६ अंतर्गत १४ वर्षांखालील मुलांना दुकानात, हॉटेल्समध्ये, कारखान्यात कामवार ठेवले जात असेल तरच त्यांना बालकामगार असे म्हटले जाते. कामगार आयुक्तांकडून याची चाचपणी करण्यासाठी धाडी टाकण्यात येतात. २०१७ ते २०२० या चार वर्षांत कामगार आयुक्त कार्यालयाकडून २७ छापे टाकण्यात आले. ६२४ आस्थापनांना भेटी दिल्यानंतर केवळ एकच बालकामगार सापडला असल्याचे सहायक कामगार आयुक्त राजदीप धुर्वे यांनी सांगितले. कुणी बालकामगार ठेऊ नये, यासाठी जनजागृती करण्यात येत असल्याचे धुर्वे यांचे म्हणणे आहे.

कायदे कुणासाठी?

बालकांचे भविष्य सुरक्षित राहावे, प्रत्येक बालकाला शिक्षणाचा अधिकार मिळावा अशा व्यापक अर्थाने कायदे बनविण्यात येतात. मात्र, कायद्याच्या चौकटी पाडून अनेक वंचितांना लाभ मिळत नसल्याचेही धक्कादायक वास्तव आहे. बालकामगार निर्मूलन प्रतिबंध अधिनियम १९८६मध्ये दुकानात, हॉटेल्समध्ये, कारखान्यात काम करणारी मुले येतात. १५ वर्षांच्या खालील मुले कारखान्यात काम करताना आढळली तर फॅक्टरी अॅक्टमध्ये येतात. यावर देखरेख ठेवण्यासाठी कामगार आयुक्त कार्यालयाची सुरक्षा विंग आहे. १८ वर्षांखालील मुलांची सुरक्षा धोक्यात असेल तर ते जेजे (ज्युवेनाइल जस्टिस केअर अॅक्ट प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन) अंतर्गत येतात. पोलिसांकडून ही कारवाई केली जाते.

आरोग्य धोक्यात

बालकांना पाहिजे तसा आकार देता येतो, असे म्हटले जाते. मात्र, रस्त्यांवर राबत असलेल्या बालकांना आकार देण्यासाठी कोणतीच प्रशासकीय यंत्रणा नाही का, असा संतप्त सवाल आता विचारला जाऊ लागला आहे. मुलांनी धोकादायक ठिकाणी काम करू नये, असे कायदा सांगतो, मात्र रस्त्यांवर वाहनांच्या प्रदूषणात भीक मागणारी, खेळणी विकणाऱ्या मुलांच्या आरोग्यावर याचे गंभीर परिणाम होत असताना शासन प्रशासन डोळेझाक करीत असल्याचे वास्तव आहे.

या मुलांनाही हवी संरक्षणाची गरज

कायद्याने संरक्षण दिले असतानाही रस्त्यांवर राबणाऱ्या मुलांकडे दुर्लक्ष होताना दिसते. बालकामगार कायद्यात मोडत नसले तरी रस्त्यांवर राबणारी मुले ही बालकामगारच आहेत. या मुलांना काळजी आणि संरक्षणाची गरज आहे. त्यामुळे या कामगारांची केवळ सुटका करून उपयोग नाही तर त्यांना या कामाला लावणाऱ्यांचेही पुनर्वसन करणारी यंत्रणा सरकारी पातळीवर राबविण्याची गरज असल्याचे मत राष्ट्रीय महिला आयोगाच्या माजी समुपदेशक अंजली विटणकर यांनी व्यक्त केले.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

remdesivir injection price: स्वस्तात मिळणार रेमडिसिवीर – remdesivir will be available at rate of rs. 2360 to patients

म. टा. प्रतिनिधी, नाशिक खासगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या करोना रुग्णांना औषध दुकानांमधून कंपन्यांच्या वेगवेगळ्या किमतीनुसार रेमडिसिवीर विकत घ्यावे लागते. मात्र, आता या रुग्णांनाही...

Kangana Ranaut: वाईटावर चांगल्याचा विजय; कंगनानं पुन्हा राऊतांना डिवचलं – kangana ranaut attacks on cm uddhav thackeray, sanjay raut

मुंबईः बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत नेहमीच तिच्या बेधडक वक्तव्यांमुळं चर्चेत असते. मुंबई पोलिस आणि महाराष्ट्र सरकारवर सातत्याने टीका करणाऱ्या कंगानानं पुन्हा एकदा संजय...

Recent Comments