Home ताज्या बातम्या कोरोनाचं धुमशान! आणखीन एका राज्यात नाईट कर्फ्यू, मास्क न घालणाऱ्यांसाठी दंड covid-19...

कोरोनाचं धुमशान! आणखीन एका राज्यात नाईट कर्फ्यू, मास्क न घालणाऱ्यांसाठी दंड covid-19 after delhi and mp rajasthan imposes-night-curfew in 8 districts due to corona mhkk | National


रात्री 8 वाजल्यापासून सकाळी 6 वाजेपर्यंत हा नाईट कर्फ्यू लावण्यात आला आहे. तर मास्क न घालणाऱ्यांसाठी 200 ते 500 रुपये दंड आकारण्यात येणार आहे.

जयपूर, 22 नोव्हेंबर : कोरोनाचा प्रकोर दिवसेंदिवस वाढत आहे. रिकव्हरी रेट जरी वाढत असला तरीही नवीन कोरोनाची लागण होणाऱ्यांची संख्या दिवाळीनंतर मोठ्या प्रमाणात वाढली आहे. दिवाळीतल्या फटकांमुळे वाढलेलं प्रदूषण, थंडी आणि बदलणारं हवामान त्यात होणारा कोरोनाचा कहर ही स्थिती चिंताजनक असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे. फेब्रुवारीपर्यंत कोरोना आणखीन भयंकर रुप घेईल त्यामुळे सतर्क राहाणं आणि काळजी घेणं गरजेचं असल्याचंही सांगण्यात आलं आहे.

दुसरीकडे कोरोनाचा संसर्ग आणि मृत्यूदर काही राज्यांमध्ये वेगानं वाढल्यामुळे पुन्हा एकदा कर्फ्यू आणि दंड अशा दोन पातळीवर प्रशासनानं कारवाई सुरू केली आहे. दिल्ली, मध्य प्रदेश आणि त्यानंतर आता राजस्थानमध्ये देखील नाईट कर्फ्यू लावण्यात आला आहे. तर मास्क न घातल्यास 500 रुपयांचा दंड आकारण्यात येईल अशी सक्त ताकीद देण्यात आली आहे.

मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत या संदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. त्याअंतर्गत राज्यातील जास्तीत जास्त आठ जिल्ह्या – जयपूर, जोधपूर, कोटा, बीकानेर, उदयपूर, अजमेर आणि भिलवारा या राज्यांमध्ये जास्तीत जास्त आठ जिल्ह्यांमध्ये 20 डिसेंबरपर्यंत रात्रीचा कर्फ्यू लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रात्री 8 वाजल्यापासून सकाळी 6 वाजेपर्यंत हा नाईट कर्फ्यू लावण्यात आला आहे. तर मास्क न घालणाऱ्यांसाठी 200 ते 500 रुपये दंड आकारण्यात येणार आहे.


Published by:
Kranti Kanetkar


First published:
November 22, 2020, 7:57 AM ISTSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

proposal to allow corporate house to set up banks: कॉर्पोरेट्सचा बँकिंग प्रवेश – rajiv madhav joshi article on proposal to allow corporate houses to...

राजीव माधव जोशी आपली बँकिंग सिस्टीम सक्षम व्हावी म्हणून अलीकडेच सादर केलेल्या अहवालानुसार पतसंस्था व बिगर बँकिंग कंपन्यांना नवीन बँक स्थापन करण्याची मुभा...

trp case: टीआरपीप्रकरणी मीडिया ट्रायल नको – bombay high court has directed news channel should not media trial in trp case

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई'टीआरपी घोटाळ्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी न्यायालयात आरोपपत्र दाखल केलेले असताना, या खटल्यावर प्रभाव टाकणारे मीडिया ट्रायल वाहिन्यांकडून होऊ नये. त्यादृष्टीने...

Sourav Ganguly Announced 5 T 20 Match – करोना काळात हा संघ येणार भारत दौऱ्यावर; BCCIकडून घोषणा

नवी दिल्ली: भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरून परतल्यानंतर इंग्लंडविरुद्ध कसोटी,वनडे आणि टी-२० मालिका खेळणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुलीने...

Recent Comments