Home ताज्या बातम्या कोरोनाची भीती असताना असे शुट होणार Intimate scene, समोर आला पहिला Bold...

कोरोनाची भीती असताना असे शुट होणार Intimate scene, समोर आला पहिला Bold Photo, Bollywood star aparshakti-khurana-told-how-intimate-scene-will-be-shot-after -coronavirus-outbreak mhak | News


शुटिंगच्या काळात इंटीमेट सीन Intimate scene करताना सगळ्यात जास्त अडचण येणार असून नियमांचं पालन करत दोघांनाही जास्त जवळ जाऊ न देता कसं शुटिंग करायचं असा प्रश्न निर्मात्यांना पडला आहे.

मुंबई 27 जून: लॉकडाऊनच्या (Lockdown) काळात सगळेच व्यवहार ठप्प होते. कोरोनाचा प्रसार (Coronavirus) होण्याची भीती असल्याने बॉलिवूडमधलं शुटिंगही बंदच होतं. आता अनलॉकची (Unlock) प्रक्रिया सुरू झाल्यानंतर काही अटींवर शुटिंगला परवानगी देण्यात येत आहे. त्यात सोशल डिस्टन्सिंगचं पालन करण्याची मुख्य अट घालण्यात आली आहे. त्यामुळे निर्मात्यांची शुटिंग करताना कसरत लागत आहे. या शुटिंगच्या काळात इंटीमेट सीन Intimate scene करताना सगळ्यात जास्त अडचण येणार असून नियमांचं पालन करत दोघांनाही जास्त जवळ जाऊ न देता कसं शुटिंग करायचं असा प्रश्न निर्मात्यांना पडला आहे. अपारशक्ती खुरानाने (Aparshakti Khurana) Instagramवर एक फोटो शेअर करत त्याचा खुलासा केला आहे.

अपारशक्तीचा नवा चित्रपट हेल्मेट रिलीज होण्याच्या तयारीत आहे. या चित्रपटात अभिनेता मोहनीश बहल यांची मुलगी प्रनुतन बहलही असणार आहे. अपारशक्तीने जो फोटो शेअर केला त्यात प्रनुतनही असणार आहे. त्याने दोन फोटो शेअर केले असून त्यात पहिला फोटो रोमँटिक सीनचा आहे. तर दुसऱ्या फोटोत दोघांच्याही चेहेऱ्यावर फेस शिल्ड लावण्यात आले आहेत.

आता यापुढे असे सीन अशा प्रकारे शुट केले जाऊ शकतात असे संकेतच त्याने दिले आहेत. पण आपल्या चित्रपटाबद्दल तो निश्चिंत आहे. कारण त्याचा हा सीन लॉकडाऊन आधीच शुट झाला आहे. आता जर असा सीन शुट करायचा असेल तर असेच फेस शिल्ड लावावे लागतील असं त्याने म्हटलं आहे.

अपारशक्ती खुराना, प्रनूतन बहल, आशीष वर्मा आणि अभिषेक बनर्जी असे स्टार असलेल्या ‘हेलमेट’ चे निर्माते सतराम रमानी हे आहेत.

First Published: Jun 27, 2020 05:42 PM IST

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

MNS morcha: पुणे: वाढीव वीजबिलाविरोधात मनसेचा मोर्चा, शहरप्रमुखांसह कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात – mns morcha on electricity bill pune city chief ajay shinde and...

पुणे: वाढीव वीजबिलाविरोधात मनसेच्या आंदोलनाआधीच पोलिसांनी शहरप्रमुख अजय शिंदे यांच्यासह ५०-६० कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. फरासखाना पोलीस ठाण्यात त्यांना घेऊन गेले. त्यामुळे आक्रमक झालेल्या...

corona infection from food: अन्नातून करोना संसर्ग; ठोस पुराव्यांचा अभाव – corona infection from food but lack of concrete evidence says infectious diseases clinic...

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबादकरोनाचा संसर्ग अन्नातून किंवा खाद्य पदार्थातून होण्याविषयी आतापर्यंत कोणताही ठोस पुरावा समोर आलेला नाही. गरम पाणी पिणे किंवा बाहेरून घरी...

Recent Comments