Home ताज्या बातम्या कोरोनाच्या नावाखाली भ्रष्टाचार! ...तर रस्त्यावर उतरुन चोप देऊ, मनसेचा सज्जड इशारा |...

कोरोनाच्या नावाखाली भ्रष्टाचार! …तर रस्त्यावर उतरुन चोप देऊ, मनसेचा सज्जड इशारा | Coronavirus-latest-news


कोरोनाचं संकट आल्यापासून मुंबई मनपानं वाट्टेल त्या दरात सामान खरेदी केलं आहे. कोरोनाच्या नावाखाली निविदा न काढता ठराविक कंत्राटदारांना काम दिलं जात आहे. मोठा भ्रष्टाचार केला जात आहे.

मुंबई, 26 जून: कोरोनाचं संकट आल्यापासून मुंबई मनपानं वाट्टेल त्या दरात सामान खरेदी केलं आहे. कोरोनाच्या नावाखाली निविदा न काढता ठराविक कंत्राटदारांना काम दिलं जात आहे. मोठा भ्रष्टाचार केला जात आहे, असा घणाघाती आरोप मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केला आहे.

या सगळ्या प्रकाराची सखोल चौकशी करुन दोषींवरुन कारवाई करावी, अशी मागणी संदीप देशपांडे यांनी केली आहे. अथवा संबंधित अधिकाऱ्यांना रस्त्यावर उतरुन चोप देऊ, असा सज्जड इशारा संदीप देशपांडे यांनी दिला आहे.

हेही वाचा…शिवसेनेनं सत्ता समिकरण पाहून 27 गावांचे केलं तुकडे, भाजप नेत्याचा घणाघाती आरोप 

संदीप देशपांडे यांनी सांगितलं की, शवपिशव्यांच्या खरेदीत सुद्धा चांगल्या दर्जाच्या पिशव्या पुरवणाऱ्या औरंगाबादच्या वेदांत इन्नोटेक कंपनींचं कंत्राट इथल्या कंत्राटदारांना दिलं जात आहे. कारण इथल्या कंत्राटदारांच्या गॅंगला बाहेरचा माणूस नको असतो, असा आरोपही देशपांडे यांनी केला आहे. या सगळ्या प्रकाराची चौकशी करुन दोषींवरुन कारवाई करावी अथवा संबंधित अधिकाऱ्यांना रस्त्यावर उतरुन चोप देऊ असंही देशपांडे यावेळी म्हणाले.

First Published: Jun 26, 2020 02:37 PM IST





Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Cyber insurance: सायबर गुन्ह्यांचे शिकार झालात; काळजी करु नका, लवकरच त्यावर मिळणार भरपाई – irda bats for cyber insurance

वृत्तसंस्था, नवी दिल्ली : वैयक्तिक तसेच व्यावसायिक स्तरावर वाढत चाललेल्या सायबर गुन्ह्यांची गंभीर दखल अशा गुन्ह्यांपासून व्यक्ती आणि व्यवसाय यांना वाचवण्यासाठी तसेच यामुळे...

Ram Shinde slams Khadse: खडसेंना पश्चाताप झाल्याशिवाय राहणार नाही; माजी मंत्र्याची टीका – eknath khadse will repent for leaving bjp, says former minister ram...

अहमदनगर: 'भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजपचा राजीनामा दिलाय. ते राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचे समजते. मात्र खडसे यांना ज्येष्ठ नेते म्हणून भाजपमध्येजी...

Raosaheb Danve: चोरून लग्न तुम्ही करता आणि बापाला संसार चालवायला सांगता?; दानवेंची फटकेबाजी – bjp leader raosaheb danve taunt cm uddhav thackeray over farmers...

सुरेश कुलकर्णी । जालना'तुम्ही चोरून लग्न लावलं अन् बापानं संसार चालवावा अशी कशी अपेक्षा करता?,' अशा शब्दांत केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केंद्र...

Recent Comments