Home ताज्या बातम्या कोरोनाच्या लढ्यात व्यापाऱ्याचं योगदान; कोरोनाग्रस्तांसाठी दिली आपली 19 मजली इमारत malad merchant...

कोरोनाच्या लढ्यात व्यापाऱ्याचं योगदान; कोरोनाग्रस्तांसाठी दिली आपली 19 मजली इमारत malad merchant gave 19 floor building to bmc for coronavirus patient treatment mhpl | Coronavirus-latest-news


मुंबई महापालिकेने या इमारतीला तात्पुरतं कोरोना सेंटर बनवलं आहे.

मुंबई, 19 जून : कोरोना हॉटस्पॉट असलेल्या धारावी, वरळीसारख्या मुंबईच्या शहरी भागातील परिस्थिती आता नियंत्रणात येत होती, तर आता मुंबईच्या उपनगरात कोरोना झपाट्याने पसरू लागला आहे. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी मुंबई पालिका प्रशासन आणि राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत, अशाच इतर नागरिकही आपल्या परीने जी मदत होईल ती करताना दिसत आहेत. मुंबई पश्चिम उपनगरातील कोरोनाचा वाढता वेग पाहता कोरोनाच्या लढ्यात आता एका व्यापाऱ्यानेही आपलं योगदान दिलं आहे.

दैनिक भास्करच्या वृत्तानुसार मालाडमधील स्थानिक व्यापारी मेहुल संघवी यांनी आपली 19 मजली इमारत कोरोनाग्रस्तांसाठी दिली आहे. मुंबई महापालिकेला अस्थायी कोरोना हॉस्पिटल बनवण्यासाठी त्यांनी ही इमारत दिली आहे. महापालिकेनं या इमारतीला कोरोना सेंटर बनवलं आहे.

हे वाचा – राज्यात आज दिवसभरात पुन्हा वाढले 3827 रुग्ण; नवा उच्चांक

पश्चिम उपनगरातील विशेषत: मालाड, कांदिवली, बोरीवली आणि दहिसर परिसरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. या ठिकाणच्या रुग्णालयातही बेड उपलब्ध नाहीत. त्यामुळे उत्तर मुंबईचे खासदार गोपाळ शेट्‌टी यांनी आपल्या क्षेत्रातील बिल्डर्सना इमारती कोरोना सेंटरसाठी देण्याचं आवाहन केलं होतं. त्यानंतर मालाडचे व्यापारी मेहुल संघवी यांनी हा पुढाकार घेतला.

हे वाचा – भारतात कोरोनाग्रस्तांना दिलं जाणार ‘हे’ औषध; शरीरात व्हायरसचं संक्रमण रोखणार

मालाडचे सहाय्यक मनपा आयुक्त संजोग कबरे यांनी सांगितलं, श्रीजी शरण डेव्हलपर्सचे मालक मेहुल संघवी यांनी महापालिकेला 19 मजली इमारत दिली आहे. यात आता 500 रुग्णांचा उपचार सुरू करण्यात आलेत. प्रत्येक फ्लॅटमध्ये चार रुग्णांना ठेवण्यात आले आहे. अशा परिस्थितीत आपली इमारत कोरोनाग्रस्तांच्या उपचारासाठी देणं कौतुकास्पद आहे.

संकलन, संपादन – प्रिया लाड

हे वाचा – धक्कादायक! हॉस्पिटलमध्ये मिळाला नाही बेड, उपचाराअभावी दोन रुग्णांचा मृत्यू

First Published: Jun 19, 2020 10:26 PM IST

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

coronavirus vaccine news: Coronavirus vaccine करोना: ऑक्सफर्डची लस चाचणी अमेरिकेत पुन्हा सुरू होणार – coronavirus vaccine news astrazeneca oxford covid-19 vaccine trial resume in...

वॉशिंग्टन: अमेरिकेत पुन्हा एकदा ऑक्सफर्ड-एस्ट्राजेनकाची लस चाचणी सुरू होणार आहे. अमेरिकेत लस चाचणी सुरू करण्याबाबत नियामक मंडळाने हिरवा झेंडा दाखवला आहे. ब्रिटनमध्ये तिसऱ्या...

leopard spotted in malegaon: कळवाडी परिसरात पुन्हा बिबट्या; दोन दिवसांत २० जनावरांचा फडशा – leopards again spotted in kalwadi area malegaon

म. टा. वृत्तसेवा, मालेगावतालुक्यातील कळवाडी परिसरात जनावरांना पुन्हा एकदा बिबट्याने लक्ष्य केले आहे. गेल्या दोन दिवसांत शेतकऱ्यांच्या तब्बल २० जनावरांचा बिबट्याने फडशा पाडला....

Mumbai Police: मुंबई पोलिसांची बिहार पोलिसांना मदत – mumbai police helps bihar police for solving boy kidnapping case

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबईसुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणावरून मुंबई पोलिस आणि बिहार पोलिसांमधील संबंध ताणले गेले असले, तरी एका गुन्ह्याच्या तपासात मुंबई...

Recent Comments