Home ताज्या बातम्या कोरोनाबाधित वृद्धेचा मृतदेह सापडल्याने खळबळ, आंदोलन करणाऱ्या भाजप आमदाराविरुद्ध गुन्हा, Filed a...

कोरोनाबाधित वृद्धेचा मृतदेह सापडल्याने खळबळ, आंदोलन करणाऱ्या भाजप आमदाराविरुद्ध गुन्हा, Filed a case against a BJP MLA who was protesting against the administration for neglecting Corona patients mhak | Coronavirus-latest-news


भुसावळ येथील एका 82 वर्षीय कोरोनाबाधित बेपत्ता वृद्धेचा मृतदेह आठवडाभरानंतर कोविड रुग्णालयाच्या वॉर्ड क्रमांक 7 मधील स्वच्छतागृहात आढळून आला होता. त्या विरोधात आंदोलन करण्यात आलं होतं.

जळगाव 11 जून: भुसावळ येथील एका 82 वर्षीय कोरोनाबाधित बेपत्ता वृद्धेचा मृतदेह आठवडाभरानंतर कोविड रुग्णालयाच्या वॉर्ड क्रमांक 7 मधील स्वच्छतागृहात आढळून आला होता. या विरोधात जळगाव शहरचे भाजप आमदार सुरेश भोळे, महापौर भारती सोनवणे यांनी कार्यकर्त्यांसह आंदोलन केले. जळगाव कोविड रुग्णालयातील भोंगळ कारभाराविरुद्ध आंदोलन करताना जमावबंदी आणि साथरोग नियंत्रण कायद्याचे उल्लंघन झाले. आमदार सुरेश भोळे, महापौर भारती सोनवणे यांच्यासह 22 जणांविरुद्ध जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोविड रुग्णालयात केलेले आंदोलन या सर्वांच्या अंगलट आले आहे. या घटनेमुळे रुग्णालय प्रशासनाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला. त्यानंतर सर्वच स्तरातून रुग्णालय प्रशासन आणि जिल्हाधिकाऱ्यांविषयी रोष व्यक्त केला गेला. भाजप आमदार सुरेश भोळे आणि महापौर भारती सोनवणे यांच्या नेतृत्त्वात भाजप नगरसेवक व कार्यकर्त्यांनी रुग्णालय अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे यांचे दालन गाठून निवेदन दिले.

त्यानंतर या सर्वांनी रुग्णालयातच आंदोलन केले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विना परवानगी गर्दी व आंदोलन करू नये, असे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश असतानाही आंदोलकांनी कोणतीही परवानगी न घेता आंदोलन केले. त्यामुळे त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

लॉकडाऊनचं उल्लघन, काँग्रेस नगरसेवकावर गुन्हा दाखल; मुलाच्या लग्नाची पार्टी भोवली

यांच्याविरुद्ध दाखल झाला गुन्हा-आमदार सुरेश भोळे, महापौर भारती सोनवणे, नगरसेवक कैलास सोनवणे, स्थायी समिती सभापती अ‍ॅड. शुचिता हाडा, मनपातील भाजप गटनेते भगत बालाणी, मनोज आहुजा, माजी नगरसेवक अतुल हाडा, नगरसेवक सुनील खडके, भाजप महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी, महानगर सरचिटणीस डॉ. राधेश्याम चौधरी, अरविंद देशमुख, पितांबर भावसार व इतर ८ ते १० जणांविरुद्ध जमावबंदी आदेश उल्लंघन, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा व साथ रोग प्रतिबंधक कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.

COVID-19: भारताने ब्रिटनला टाकलं मागे, मुंबई, दिल्ली सर्वात धोकादायक!

दरम्यान, जळगाव सिव्हिल हॉस्पीटलमधील महिलेच्या मृत्यू प्रकरणी अखेर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. भास्करराव खैरे यांच्यासह पाच जणांना निलंबीत करण्यात आले असून याचे आदेश आज देण्यात आले आहेत.

 

 

 

First Published: Jun 11, 2020 11:52 PM IST

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

MAH MCA CET 2020: MAH MCA CET 2020 चे हॉलतिकीट जारी – mah mca cet 2020 admit card released, download here

MAH MCA CET 2020 Admit Card: राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने बुधवारी २१ ऑक्टोबर रोजी MAH MCA CET 2020 चं हॉलतिकिट म्हणजेच अॅडमिट...

love jihad: महाराष्ट्र-उत्तर प्रदेशात ‘लव्ह जिहाद’चा वाद, पण हा शब्द आला कुठून? – love jihad origin controversy explained in bareilly and after tanishq advertisement

'लव्ह जिहाद' या शब्दावरून देशात काही ठिकाणी वाद सुरू आहे. राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष रेखा शर्मा यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची...

coronavirus in maharashtra: राज्यात करोनामुक्त होणाऱ्यांच्या संख्येत वाढ; रिकव्हरी रेटही वाढला – maharashtra reports 8,142 new covid 19 cases and 23,371 discharges in the...

मुंबईः राज्यात आज १८० करोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, आज तब्बल २३ हजार ३७१ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर, राज्यातील...

Recent Comments