Home ताज्या बातम्या कोरोनावर 'तो' भयंकर उपचार वापरावाच लागेल, उदयनराजेंचा दावा, पाहा हा VIDEO |...

कोरोनावर ‘तो’ भयंकर उपचार वापरावाच लागेल, उदयनराजेंचा दावा, पाहा हा VIDEO | News


‘कोरोनाची परिस्थिती चिंताजनक आहे, यात वाद नाही. पण, लोकांना जास्तच घाबरवण्यात आलं आहे’

किरण मोहिते, प्रतिनिधी

सातारा, 01 जुलै :  देशभरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. पण असलं तरी आपल्याकडे कोरोनाचा गरजेपेक्षा जास्त बाऊ करण्यात आला आहे. कोरोनापेक्षा जास्त मृत्यू हे रस्ते अपघातात झाले आहे, असं परखड मत भाजपचे नेते आणि माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केलं. तसंच कोरोनावर आपल्याकडे स्वीडनप्रमाणे हर्ड इम्युनिटाचा (herd immunity) वापर करावाच लागणार आहे, असंही उदयनराजे म्हणाले.

उदयनराजे यांनी बंधू आमदार शिवेंद्रराजे भोसले यांची जिल्हा मध्यवर्ती बँकेत जाऊन सदिच्छा भेट घेतली. त्यांनतर प्रसारमाध्यमांशी बोलताना उदयनराजे भोसले यांनी आपल्या शैलीत चौफेर फटकेबाजी केली.

‘कोरोनाची परिस्थिती चिंताजनक आहे, यात वाद नाही. पण, लोकांना जास्तच घाबरवण्यात आलं आहे. याआधीही आपल्याकडे स्वाईन फ्लू सारखे साथीचे आजार येऊन गेले. एवढंच नाहीतर इतर आजारातूनही लोकांच्या मृत्यूचे प्रमाण जास्त आहे. सीमेवर आणि वृद्धावस्थेमुळे लोकांच्या मृत्यूचे प्रमाण जास्त आहे.  त्यापेक्षा दहापटीने अधिक मृत्यू हे तर रस्ते अपघातात झाले आहेत.त्यामुळे कोरोना आहेच हे लक्षात ठेवून लोकांनी परिस्थितीला सामोरं गेलं पाहिजे, असं उदयनराजे म्हणाले.

तसंच, ‘राज्य सरकारानेही सारखे लॉकडाउन करून लोकांना अडकून ठेवू नये. लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे,  त्यामुळे काही कोरोनावर मात करता येणार नाही. योग्य काळजी घेऊन उद्योग धंदे सुरू केले पाहिजे’, असंही उदयनराजे म्हणाले.

आजोबांच्या मृतदेहाशेजारी बसलेल्या नातवाचे दहशतवाद्यांपासून जवानांनी वाचवले प्राण

दरम्यान, भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर उदयनराजेंनीही आपल्या नेहमीच्या तिरकस शैलीत यावर प्रतिक्रिया दिली. ‘भाजप नेते गोपीचंद पडळकर हे मला विचारून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल बोलले नाहीत. माझं मत मी परखडपणे मांडत असतो. पवार आणि पडळकर त्यांचं ते बघून घेतील,’ अशी खोचक प्रतिक्रिया खासदार उदयनराजे भोसले यांनी दिली.

 संपादन – सचिन साळवे

Tags:

First Published: Jul 1, 2020 01:51 PM IST

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Road Accidents in India: हा तर निव्वळ आत्मघात – road accidents after lockdown in india

करोनामुळे देशभरात वाहतूक मंदावली होती आणि त्यामुळे अपघात व अपघाती मृत्यूंची संख्याही कमी झाली होती. मात्र, आता टाळेबंदी संपल्यानंतर पुन्हा रस्तेअपघातांचे प्रमाण करोनापूर्व...

burglary cases in mumbai: मुंबईत वाढल्या घरफोड्या – burglary cases have increased in mumbai after lockdown

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई करोना संकटामुळे लावण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे नियंत्रणात असलेल्या मुंबईतील चोऱ्या आणि घरफोड्या पुन्हा एकदा वाढू लागल्या आहेत. लॉकडाउन असल्याने...

Recent Comments