अनेक खासगी रुग्णालयांकडून अतिरिक्त पैसे आकारल्याच्या तक्रारी वारंवार समोर येत आहेत
मुंबई, 2 जुलै : मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अशा परिस्थितीत पालिकेकडून रुग्णालयातील खाटांची संख्याही वाढविण्यात आली आहे. मात्र अनेक खासगी रुग्णालयांत रुग्णांची लूट सुरू असल्याच्या बातम्या वारंवार समोर येत आहेत. त्यात पालिकेने आता यावर कारवाईचा बडगा उगारला आहे.
Brihanmumbai Municipal Corporation has registered an FIR against Nanavati Hospital over alleged overcharging for COVID19 treatment of a patient.
मुंबईतील नामांकिंत नानावटी रुग्णालयावर पालिकेने कोरोना रुग्णाकडून अतिरिक्त पैसे आकारल्याअंतर्गत एफआयआर दाखल केला आहे. मुंबईतील विलेपार्लेतील नानावटी रुग्णालयाविरोधात सांताक्रुझ पोलिसांनी एफआयआर दाखल करुन घेतले आहे. कोरोना रुग्णाकडून अतिरिक्त पैसे आकारल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आला आहे. मिररने यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केले आहे.
We are awaiting the copy of the complaint to scrutinise the bill and will fully cooperate with the authorities concerned to redress the issue: Nanavati Hospital, Mumbai, Maharashtra
वरिष्ठ पोलीस इन्स्पेक्टर श्रीराम कोरोगावार यांनी सांगितले की 1 जुलै रोजी रामचंद्र कोब्रेकर (Assistant Auditor at the BMCs K-West Ward) यांनी नानावटी विरोधात एफआयआर दाखल केली आहे. रुग्णालयाकडून पीपीई किट्स, औषधं आणि कोरोना चाचणीसाठी अतिरिक्त पैसे आकारले जात होते, असे सांगितले जात आहे. रुग्णालयाकडून याबाबतचा तपास सुरू आहे. त्यांच्याकडून माहिती आल्यानंतर बातमी अपडेट केली जाईल.
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईकरोनाप्रतिबंधक लसीकरण मोहिमेसाठीचे कोविन अॅप मुंबईतील काही लसीकरण केंद्रांमध्ये शुक्रवारी सुरळीत सुरू झाले असले, तरीही अद्याप ग्रामीण भागामध्ये ते...