Home ताज्या बातम्या कोरोना लॉकडाऊनचा परिणाम; माणसंच नाही तर माशांनाही आलं डिप्रेशन | Coronavirus-latest-news

कोरोना लॉकडाऊनचा परिणाम; माणसंच नाही तर माशांनाही आलं डिप्रेशन | Coronavirus-latest-news


ऑस्ट्रेलियातील मत्स्यालयात (Australian Aquarium) माणसं न दिसल्यानं माशांच्या (Fish) वर्तणुकीत बदल दिसून आलेत.

कॅनबेरा, 17 मे : कोरोनाव्हायरसपासून (coronavirus) बचावासाठी लॉकडाऊन (lockdown) लागू करण्यात आला आहे. मात्र या लॉकडाऊनमध्ये अनेकांना डिप्रेशन आलं आहे. मात्र फक्त माणसंच नव्हे तर माशांनाही या समस्येचा सामना करावा लागतो आहे. लॉकडाऊनमध्ये जसं तुमच्यापासून दूर असलेल्या जवळच्या व्यक्ती, मित्रमैत्रिणींची आठवण तुम्हाला येते आहे, तशी या माशांनाही त्यांच्याभोवती नेहमी असणाऱ्या माणसांची आठवण येते आहे.  अशी अवस्था झाली आहे ती ऑस्ट्रेलियाच्या मत्सालयातील माशांची.

ऑस्ट्रेलियातील (Australia) प्रसिद्ध मत्यालय (Aquarium) मार्चपासून बंद आहे. माणसं नसल्यानं अनेक मासे निरुत्साही झालेत. त्यापैकी काही तर टँकच्या एका अंधाऱ्या कोपऱ्यात लपून बसलेत. तज्ज्ञांच्या मते, माशांमध्ये ही डिप्रेशनची लक्षणं दिसून आलीत.

हे वाचा – Breaking कोरोनाला रोखण्यासाठी केंद्राचा मोठा निर्णय; देशभरात 31 मेपर्यंत लॉकडाऊन

तज्ज्ञांच्या मते, हे प्राणी टँकबाहेर पाहू शकत होते, माणसांना पाहत होते आणि अचानक माणसं दिसत नाही, त्यामुळे त्यांच्यावर परिणाम होतो आहे. माणसांमध्ये या माशांमध्येही सेरोटोनिन आणि डोपामाइनमध्ये बदल दिसून आलेत. ज्यामुळे या माशांना डिप्रेशन आलं आहे.

मत्यालय व्यवस्थापकांनी आता या मत्सालयात एक पाणबुड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे; जेणेकरून ते माशांसोबत पोहोतील, त्यांना कंपनी देतील.

हे वाचा – ‘या’ देशात नागरिकांना दररोज 90 किलो मलत्याग करण्याचे आदेश

याआधी जपानच्या प्राणीसंग्रहायलयातही माणसं येत नसल्यानं प्राण्यांमध्ये स्ट्रेस दिसून आला होता. तिथले प्राणी विचित्र वागू लागले होते. त्यानंतर प्राणीसंग्रहालयाच्या प्रशासनानं या प्राण्यांना व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून भेट करून दिली. यासाठी तीन दिवसांचं face-showing fetsival आयोजित करण्यात आलं होतं.

संकलन, संपादन

Tags:

First Published: May 17, 2020 07:17 PM ISTSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

US Inauguration Day 2021 Live Update: Joe Biden and Harris Inauguration Day Live बायडन होणार अमेरिकेचे ४६ वे राष्ट्राध्यक्ष – US Presidential Elections Joe...

वॉशिंग्टन: अमेरिकेच्या इतिहासातील एका नव्या पर्वाला सुरुवात होत असून आज, बुधवारी अमेरिकेचे ४६वे अध्यक्ष म्हणून जो बायडेन, तर उपाध्यक्षपदासाठी कमला हॅरिस पद आणि...

Mumbai Indians: IPL 2021: मुंबई इंडियन्सने या अनुभवी खेळाडूला दाखवला बाहेरचा रस्ता; जाणून घ्या संपूर्ण यादी – ipl 2021 mumbai indians released lasith malinga...

नवी दिल्ली: IPL 2021 आयपीएलचे सर्वाधिक विजेतेपद मिळवणारे तसेच विद्यमान विजेते मुंबई इंडियन्स (mumbai indians) संघाने या वर्षी होणाऱ्या आयपीएलसाठी रिटेन आणि रिलीझ...

रिया चक्रवर्ती: वांद्र्यात फुलं विकत घेताना दिसली रिया चक्रवर्ती, यूझर म्हणाले- ‘सुशांतच्या वाढदिवसाचा ड्रामा सुरू झाला’ – rhea chakraborty requested to not follow her

मुंबई- सुशांतसिंह राजपूत याच्या निधनानंतर बर्‍याच आरोपांमुळे चर्चेत असलेली अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिचा एक व्हिडिओ समोर आला आहे. यात ती वांद्रे येथे सर्वसामान्यांप्रमाणे...

Recent Comments