Home शहरं कोल्हापूर कोल्हापूर, औरंगाबादेत उपचारावेळी दोघांचा मृत्यू

कोल्हापूर, औरंगाबादेत उपचारावेळी दोघांचा मृत्यू


कोल्हापूर: आणि औरंगाबादमध्ये दोघाजणांचा मृत्यू झाला आहे. करोनामुळे दगावलेले हे दोघेही पुरुष आहेत. त्यापैकी कोल्हापूर येथील व्यक्तीचा रिपोर्ट निगेटिव्ह आला असून येथील व्यक्ती करोनाबाधित असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. या दोघांवरही गेल्या चार दिवसांपासून रुग्णालयात उपचार सुरू होते.

कोल्हापूरच्या सीपीआरमधील विशेष करोना कक्षात ४५ वर्षीय व्यक्तीचा रविवारी रात्री मृत्यू झाला. हा रुग्ण वळीवडे (ता. करवीर) येथील आहे. तो यकृताच्या विकाराने त्रस्त होता. त्याला शुक्रवारी उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले होते. या व्यक्तीचा स्वॅब तपासणीचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे त्याला करोनाची लागण नसल्याचं स्पष्ट झालं आहे.

तर औरंगाबादच्या देवळाई परिसरातील ५५ वर्षीय करोनाबाधित पुरुष रुग्णाचा उपचारादरम्यान घाटीमध्ये मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यातील करोनाबाधितांच्या मृत्युची संख्या दहा झाली आहे. दरम्यान, राज्यात काल ६७८ नव्या करोनाबाधितांची नोंद झाल्याने राज्यातील करोनाबाधितांची संख्या १२ हजार ९७४ झाली आहे. राज्यात आतापर्यंत २११५ रुग्णांना डिस्चार्ज देण्याता आला असून एकूण १० हजार ३११ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.



Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Aditya Roy Kapur: एका कॉलवर आदित्य रॉय कपूरच्या मदतीला धावून आले रामदास आणि सत्यजित पाध्ये – Aditya Roy Kapur Becomes Bollywoods First Actor Get...

मुंबई- अनुराग बसू यांनी दिग्दर्शित केलेला 'लुडो' हा चित्रपट एका ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे. अभिनेता आदित्य रॉय-कपूरनं या चित्रपटात एका शब्दभ्रमकाराची भूमिका...

सटाण्यातील व्यावसायिक माखिजा यांची आत्महत्या

म. टा. वृत्तसेवा, सटाणा सटाणा शहरातील बागलाण ब्रॅण्डी हाऊसचे संचालक (वय ६२) यांनी रविवारी सायंकाळी लोहणेर येथील पुलावरून गिरणा नदीपात्रात उडी मारून ...

व्यापारी सासूरवाडीला गेला होता, फ्लॅटवर परतल्यानंतर दृश्य बघून हादरलाच

म. टा. प्रतिनिधी, : सासूरवाडीला गेलेल्या कापड व्यवसायिकाचे घर फोडून चोराने दोन लाखांची रोकड आणि दोन तोळ्याचे दागिने लांबविल्याची घटना सोमवारी (२३ नोव्हेंबर)...

Recent Comments