Home शहरं नाशिक खतांच्या पुरवठ्यासाठीधावली लाल परी

खतांच्या पुरवठ्यासाठीधावली लाल परी


म. टा. वृत्तसेवा, मनमाडलॉकडाउनमुळे नांदगाव व मनमाड येथे रेल्वे माल धक्क्यावर रासायनिक खतांचे रॅक येत असल्याने नाशिक येथून खतांची वाहतूक करण्यासाठी आमदार सुहास कांदे यांच्या प्रयत्नांमुळे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस उपलब्ध करून देण्यात आल्या.पेरणीसाठी शेतक्यांना खतांची आवश्यकता आहे. मात्र पुरवठा कमी असल्याने चढ्या दराने विक्री होण्याची शक्यता असल्याने नांदगाव येथील रासायनिक खत विक्रेते नुतन कासलीवाल यांनी शिवसेनाचे तालुका प्रमुख किरण देवरे यांच्याशी चर्चा केली. देवरे यांनी आमदार सुहार कांदे यांना याबाबत कळविले. कांदे यांनी नांदगाव आगाराचे व्यवस्थापक गावित यांच्याशी चर्चा करून नांदगांव येथील खत विक्रेत्यांना खत वाहतूक करण्यासाठी बस उपलब्ध करून देण्याबाबत सूचना केल्या. त्यानुसार बुधवारी नांदगांव येथे बसमधून खते आणण्यात आली.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments