Home शहरं अहमदनगर खासगी वाहनांची वर्दळ वाढली

खासगी वाहनांची वर्दळ वाढली


एकाच गाडीवर दोघांचा प्रवास

नगर : लॉकडाउनमध्ये काही प्रमाणात शिथिलता देण्यात आल्याने सोमवारी घराबाहेर पडलेल्यांची संख्या अचानक वाढली. शहरात काही ठिकाणी पुन्हा वाहतूक कोंडीही झाली. खासगी वाहन रस्त्यावर आणण्यास बंदी असतानाही ही समस्या निर्माण झाली आहे.

सोमवारपासून लॉकडाउनचा तिसरा टप्पा सुरू झाला असला तरी या लॉकडाउनमध्ये काही प्रमाणात शिथिलता देण्यात आली आहे. त्यामुळे आता घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांची संख्या वाढू लागली आहे. मुळात अत्‍यावश्‍यक सेवांकरीता ज्या वाहनांना परवानगी देण्यात येत आहे, त्यामध्ये चारचाकी वाहनांमध्‍ये केवळ वाहनचालक व इतर दोन व्‍यक्‍ती यांना व दुचाकी वाहनावर केवळ वाहनचालक यांनाच परवानगी आहे. तर, टॅक्सी, रिक्षा, सायकल रिक्षा, खासगी दुचाकी, खासगी कार यांना लॉकडाउन काळात कोणत्याही प्रकारे वाहतुकीची परवानगी देण्यात आली नाही. जिल्हा प्रशासनाकडे काढलेल्या आदेशामध्ये तसे स्पष्ट करण्यात आले आहे. जीवनावश्यक वस्तूंची खरेदीसाठी लोकांनी पायीच जाणे अभिप्रेत असल्याचे आदेशात म्हटले आहे. मात्र, त्यानंतरही सर्रास नागरिक खासगी दुचाकी, कार घेऊन घराबाहेर पडू लागले आहेत.

सोमवारी सकाळी वाहन घेऊन घराबाहेर पडणाऱ्यांची संख्या मोठी होती. किराणा, भाजीपाला खरेदीसाठीही काहीजण वाहनांचा वापर करीत होते. अनेकजण तर गाडीवर बसूनच भाजीपाला खरेदी करताना दिसत होते. त्यामुळेही वाहतुकीला अडथळा निर्माण होऊन वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत होती. तर, काहीजण ऑफिसला जाण्याच्या निमित्ताने खासगी वाहन घेऊन घराबाहेर पडले होते. त्यामुळे नियमांचे देखील नागरिकांकडून उल्लंघन होत असल्याचे चित्र दिसत होते.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

jalgaon breaking news: Jalgaon: रात्र झाली तरी आई व दोन मुलं शेतातून परतली नाहीत; शोध घेत असतानाच… – mother and two children found dead...

हायलाइट्स:जळगावात एका विहिरीत आई व दोन मुलांचे मृतदेह आढळले.भडगावमधील कनाशी गावातील घटनेचे गूढ अद्याप कायम.आत्महत्या की घातपात, पोलीस घेत आहेत शोध.जळगाव:जळगाव जिल्ह्यातील भडगाव...

करोनाने पुन्हा घेतली उसळी

म. टा. खास प्रतिनिधी, जिल्ह्यात करोनाने पुन्हा उसळी घेतली असून, मंगळवारी ४२४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यामुळे काही दिवसांपासून दोनशे ते तीनशेपर्यंतच सीमित...

Recent Comments