Home शहरं नाशिक खासगी हॉस्पिटल्समध्ये ‘बाजार’

खासगी हॉस्पिटल्समध्ये ‘बाजार’म. टा. खास प्रतिनिधी,

शहरातील बड्या कॉर्पोरेट हॉस्पिटल्समध्ये होणाऱ्या रुग्णांच्या आर्थिक लुटीविरोधात आता शिवसेना मैदानात उतरली आहे. करोना संकटात शहरातील बडी कॉर्पोरेट हॉस्पिटल्स महापालिका प्रशासनाला मदत करण्याऐवजी करोनाबाधित रुग्णांची आर्थिक लूट करीत असल्याचा हल्लाबोल महापालिकेचे विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी केला आहे.

खासगी हॉस्पिटल्सनी मांडलेल्या करोनाच्या बाजारात महापालिका यंत्रणादेखील सहभागी असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. बड्या हॉस्पिटल्सकडून होणाऱ्या लुटीबाबत शिवसेनेने दोन तक्रारीच आयुक्तांकडे सादर केल्या असून, करोनासंदर्भात तातडीने पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावण्याची मागणी केली आहे. शहरातील करोनाची स्थिती आणि रुग्णालयांकडून होत असलेल्या लुटीबाबत शिवसेनेकडून बोरस्ते यांनी आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्याकडे लिखित स्वरुपात जाब विचारला आहे. शहरात करोनाचे रुग्ण वाढत असताना महापालिका यंत्रणा बेफिकीर असल्याचे चित्र आहे. महापालिकेकडून बेडअभावी सर्वसामान्य रुग्णांना घरीच क्वारंटाइन करण्याचा सल्ला दिला जात असून, गोरगरिबांची उपचारांसाठी हेळसांड केली जात आहे, तर दुसरीकडे शहरातील उच्चभ्रू आणि श्रीमंत व्यक्तींच्या सेवेसासाठी महापालिका प्रशासन काम करतेय की काय, अशी परिस्थिती शहरात पाहावयास मिळत आहे. महापालिकेची रुग्णालये फुल्ल झाल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांसोबत उच्चभ्रूंना महापालिकेच्या डॉक्टरांकडूनच नागरिकांना खासगी रुग्णालयांमध्ये दाखल होण्याचा सल्ला दिला जात आहे. विशेष म्हणजे या हॉस्पिटल्सकडून रुग्णांची अक्षरश: लूट केली जात असताना प्रशासन मात्र धृतराष्ट्राच्या भूमिकेत दिसत आहे. खासगी हॉस्पिटल्सबाबत शासनाने दर नियमावली (दररोज चार हजार ते नऊ हजार रुपये) ठरवून दिली असतानाही शहरातील बड्या कॉर्पोरेट हॉस्पिटल्सकडून १२ ते १६ लाखांपर्यंत बिलांची आकारणी केली जात असल्याचा आरोप बोरस्तेंनी केला आहे. याबाबतच्या दोन रुग्णांच्या तक्रारी त्यांनी पुराव्यानिशी आयुक्तांकडे सादर केल्या आहेत.

भरारी पथकांवरही बोट

महापालिकेने वाढीव बिल आकारणीसंदर्भात बड्या हॉस्पिटल्सवर कारवाई करण्यासाठी सहा विभागांत सहा भरारी पथके तयार केली आहेत. परंतु, ही भरारी पथके नेमकी काय करतात याचा अद्यापही शोध लागलेला नाही. या पथकांनीच या हॉस्पिटल्ससोबत हातमिळवणी केली की काय, अशी सध्या स्थिती निर्माण झाली आहे. खासगी हॉस्पिटल्सकडून अवाच्या सव्वा बिल आकारून करोनाचा बाजार मांडला जात असतानाही महापालिकेची यंत्रणा मात्र या हॉस्पिटल्सच्या पूरक काम करीत आहे. यामुळे राज्य शासनाचीदेखील बदनामी होत असल्याने शिवसेनेचा संयम सुटण्याची वेळ आली, असा इशारा त्यांनी पत्रात दिला आहे. बड्या हॉस्पिटल्सची तातडीने तपासणी करून त्यांची कारवाई करावी, अन्यथा शिवसेना स्टाइल उत्तर दिले जाईल, असा इशाराही बोरस्तेंनी दिला आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

devendra fadnavis covid positive: देवेंद्र फडणवीस यांना करोनाची लागण; राऊत म्हणाले… – sanjay raut wishes devendra fadnavis for speedy recovery

मुंबईः राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना करोनाची लागण झाली आहे. संजय राऊत यांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी 'फडणवीस लवकर बरे होवोत यासाठी...

coronavirus in Nashik: coronavirus – दसऱ्याच्या पूर्वसंध्येला ६२८ करोनामुक्त – nashik reported 270 new corona cases and 5 death cases in yesterday

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिकविजयादशमी अर्थात दसऱ्याच्या पूर्वसंध्येला जिल्ह्यात अवघ्या २७० संशयित रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत, तर त्याहून सुमारे अडीच पट म्हणजेच...

Recent Comments