Home शहरं औरंगाबाद गरजू विद्यार्थ्यांना मदतीचा हात

गरजू विद्यार्थ्यांना मदतीचा हात


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सहा महिन्यांपासून शिष्यवृत्ती मिळत नसलेल्या बार्टी आणि सारथी शिष्यवृत्तीधारकांना युवा सेनेने मदत केली. विद्यापीठ परिसरात राहत असलेल्या गरजू विद्यार्थ्यांना जीवनावश्यक किटचे वाटप करण्यात आले. प्रलंबित शिष्यवृत्तीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी युवा सेना पाठपुरावा करीत आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांचे ‘लॉकडाऊन’ काळात प्रचंड हाल सुरू आहेत. घरची परिस्थिती बिकट असल्याने मदत मिळाली नाही. बरेच विद्यार्थी ‘बार्टी’ आणि ‘सारथी’ शिष्यवृत्तीधारक आहे. त्यांना गेल्या सहा महिन्यांपासून ‘स्कॉलरशिप’ मिळालेली नाही. त्यामुळे अधिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. सामाजिक संस्थांची मदतसुद्धा बंद झाली आहे. या बिकट परिस्थितीत विद्यार्थ्यांनी युवा सेनेचे शहर सचिव अक्षय खेडकर यांच्याशी संपर्क साधला होता. त्यानंतर खेडकर यांनी जेवणाचे शंभर डबे आणि जीवनावश्यक साहित्याच्या १०० किट विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिल्या. विद्यार्थ्यांशी संवाद साधून खेडकर यांनी शैक्षणिक समस्याही जाणून घेतल्या. गेल्या सहा महिन्यापासून ‘बार्टी’ आणि ‘सारथी’ शिष्यवृत्ती मिळालेली नाही. परिणामी विद्यार्थ्यांच्या आर्थिक अडचणीत भर पडली आहे. ही समस्या तात्काळ मार्गी लावण्यासाठी खेडकर यांनी पाठपुरावा सुरू केला आहे. याबाबत सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे आणि विजय वडेट्टीवार यांना निवेदन पाठवण्यात आले. पदवी आणि पदव्युत्तर अंतिम सत्राची परीक्षा, ‘ऑनलाइन’ शुल्क आणि प्रवेश प्रक्रियेचा प्रश्न सोडण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली.

मदत वाटप उपक्रमासाठी विकास थाले, वासुदेव मुळीक, अमोल पाटील, कृष्णा मोटे, सचिन सानप, सिद्धू भिगारे ,किरण मोरे, अर्चना पाटील, श्रीधर कोरडे, ज्ञानेश्वर कदम या विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.

दोन महिन्यांपासून दररोज गरजूंना जेवण आणि जीवनावश्यक किटचे वाटप सुरू आहे. विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या समस्या कळल्यानंतर तातडीने मदत केली. परीक्षा शुल्क, प्रलंबित शिष्यवृत्ती हे प्रश्नसुद्धा लवकर मार्गी लावण्यात येतील.

– अक्षय खेडकर, शहर सचिव, युवा सेनाSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

MAH MCA CET 2020: MAH MCA CET 2020 चे हॉलतिकीट जारी – mah mca cet 2020 admit card released, download here

MAH MCA CET 2020 Admit Card: राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने बुधवारी २१ ऑक्टोबर रोजी MAH MCA CET 2020 चं हॉलतिकिट म्हणजेच अॅडमिट...

love jihad: महाराष्ट्र-उत्तर प्रदेशात ‘लव्ह जिहाद’चा वाद, पण हा शब्द आला कुठून? – love jihad origin controversy explained in bareilly and after tanishq advertisement

'लव्ह जिहाद' या शब्दावरून देशात काही ठिकाणी वाद सुरू आहे. राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष रेखा शर्मा यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची...

coronavirus in maharashtra: राज्यात करोनामुक्त होणाऱ्यांच्या संख्येत वाढ; रिकव्हरी रेटही वाढला – maharashtra reports 8,142 new covid 19 cases and 23,371 discharges in the...

मुंबईः राज्यात आज १८० करोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, आज तब्बल २३ हजार ३७१ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर, राज्यातील...

Recent Comments