Home देश गरीब कल्याण रोजगार योजना: 'माझ्याबद्दल तक्रार नाही?', लॉकडाऊनमध्ये स्थलांतरीत महिलेला पंतप्रधानांचा प्रश्न...

गरीब कल्याण रोजगार योजना: ‘माझ्याबद्दल तक्रार नाही?’, लॉकडाऊनमध्ये स्थलांतरीत महिलेला पंतप्रधानांचा प्रश्न – pm modi launches garib kalyan rojgar abhiyan from village of bihar khagaria district


नवी दिल्ली :पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (शनिवारी) गरीब कल्याण रोजगार योजनेचा शुभारंभ केला. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून नरेंद्र मोदी या सोहळ्यात सहभागी झाले होते. यावेळी पंतप्रधानांनी या योजनेचा लाभ घेणार असणाऱ्या काही नागरिकांशीही संवाद साधला. यावेळी, पंतप्रधानांनी एका महिलेला ‘माझ्यासाठी तुमच्याकडे काही तक्रार नाही का?’ असा प्रश्न मोठ्या आपुलकीनं विचारला.

५० कोटींच्या गरीब कल्याण रोजगार योजनेद्वारे करोना लॉकडाऊन दरम्यान आपापल्या गावी परतलेल्या स्थलांतरीत मजुरांना त्यांच्याच गावी रोजगार देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. या कार्यक्रमासाठी बिहार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, झारखंड आणि ओडिशा या पाच राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित होते. याशिवाय योजनेशी संबंधित मंत्रालयांचे केंद्रीय मंत्रीही या सोहळ्यात सहभागी झाले. बिहारमधून मुख्यमंत्री नितीश कुमार आणि उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी हेदेखील या कार्यक्रमात उपस्थित होते.

लॉकडाऊन दरम्यान बिहारमध्ये परतल्यानंतर वेगवेगळ्या जिल्ह्यांतील मजुरांशी मी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. या कामगारांना कामासाठी पुन्हा संबंधित राज्यांत परत जाण्याची इच्छा नसल्याचं त्यांच्याशी बोलून मला जाणवलं, असं यावेळी पंतप्रधानांशी संवाद साधताना बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी म्हटलं.

वाचा :भारत चीन तणाव : अल्पसूचनेत हवाई हल्ल्यासाठी भारताची लढाऊ विमाने सज्ज!
वाचा :पाकिस्तानचं कारस्थान उघड, हत्यारांची वाहतूक करणारा ड्रोन पाडला
बिहारच्या नागरिकांसोबत संवाद

खगडिया जिल्ह्याच्या अधिकाऱ्यांनी पंतप्रधान मोदींचं स्वागत केलं. बेलदौर भागातील तेलिहार गावाच्या सरपंचांनी लॉकडाऊन दरम्यान करण्यात आलेल्या व्यवस्थेसाठी पंतप्रधानांचे आभार मानले. या गावात लॉकडाऊन दरम्यान ४७५ लोक परतल्याचंही सरपंचांनी सांगितलं.

या गावातल्या सीता नावाच्या एका महिलेशीही पंतप्रधानांनी संवाद साधला. लॉकडाऊनपूर्वी सीता आपल्या पतीसोबत दिल्लीत राहत होती. काम बंद झाल्यानंतर तिचं संपूर्ण कुटुंब गावात परतलं होतं. पंतप्रधानांनी सीताला ‘कुठपर्यंत शिक्षण घेतलं?’ असा प्रश्न विचारला यावर तिनं ‘इंटरपर्यंत’ असं उत्तर दिलं. यावर ‘माझ्यासाठी तुमच्याकडे काही तक्रार नाही का?’ असा प्रश्न पंतप्रधानांनी सीताला विचारला. यानंतर सीतानं तक्रार नाही पण आपली इच्छा व्यक्त केली. आपल्याला मधमाशी पालनाचा व्यवसाय करण्याची इच्छा असल्याचं तिनं सांगितलं.

बिहार रेजिमेंटचं कौतुक

गेल्या सोमवारी मध्यरात्री चिनी सैनिकांच्या विश्वासघातकी हल्ल्यात प्राण गमावणाऱ्या जवानांमधील बहुतांश जवान हे ‘बिहार रेजिमेंट’चे होते. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींनी बिहारच्या जनतेशी बोलताना आपल्याला या जवानांचा अभिमान असल्याचं म्हटलं. ‘हा पराक्रम बिहार रेजिमेंटचा आहे. प्रत्येक बिहारीला याचा अभिमान असायला हवा. ज्यांनी सर्वोच्च बलिदान दिलं त्यांच्याप्रती मी श्रद्धासुमन अर्पित करतो. या जवानांच्या कुटुंबाला सांगू इच्छितो की देश तुमच्यासोबत आहे. देश सेनेसोबत उभा आहे’, असं यावेळी पंतप्रधानांनी म्हटलं.

वाचा :वार्तांकनासाठी पत्रकारावर FIR; ‘एडिटर्स गिल्ड’ची नाराजी
वाचा :एक इंच जमीनही बळकावण्याची हिंमत करू नका, PM मोदींचा चीनला इशाराSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments