Home ताज्या बातम्या गर्भवती महिलेला कोरोना, मग बाळाचं काय होईल? जन्म होताच डॉक्टरही झाले चकीत!...

गर्भवती महिलेला कोरोना, मग बाळाचं काय होईल? जन्म होताच डॉक्टरही झाले चकीत! | News


जिल्हा रुग्णालयाला काळजी होती की, आईला जर कोरोनाची लागण असेल तर हे बाळ निगेटिव्ह असेल की पॉझिटिव्ह?

औरंगाबाद, 20 एप्रिल : अवघ्या जगात कोरोना व्हायरसमुळे हाहाकार उडाला आहे. या व्हायरसने माणसांपासून ते प्राण्यांपर्यंत सर्वांनाच विळखा घातला आहे. जगभरात कोरोनावर मात करण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. पण, औरंगाबाद शहरामध्ये एक नवजात बाळाने कोरोनाला हरवून जगात पाऊल ठेवले आहे.

औरंगाबादमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढतच आहे. त्यामुळे औरंगाबाद हे रेड झोनमध्ये आले आहे. पण, या चिंतातूर वातावरणात औरंगाबादमध्ये एक दिलासादायक घटना घडली आहे. एका गर्भवती महिलेला कोरोनाची लागण झाली. या महिलीची प्रसूतीजवळ आल्यामुळे डॉक्टरांना चिंता होती की, या बाळाला ही कोरोनाची लागण तर झाली नाही  ना? जिल्हा रुग्णालयाला काळजी होती की, आईला जर कोरोनाची लागण असेल तर हे बाळ निगेटिव्ह असेल की पॉझिटिव्ह?

हेही वाचा – वडिलांच्या अंत्यदर्शनाला न जाता योगी आदित्यनाथ लढताहेत कोरोनाशी लढाई

अखेर, या महिलेनं आज बाळाला जन्म दिला. आश्चर्याची बाब म्हणजे, या नवजात बाळाला कोरोनाची लागण झाली नाही.  पॉझिटिव्ह महिलेचे बाळ कोरोना निगेटिव्ह असल्याने जिल्हा रुग्णालयात एकच आनंदाचे वातावरण पसरले.  या नवजात बाळाच्या तीन चाचण्याही करण्यात आल्याआणि सुदैवाने हे बाळ पूर्णपणे कोरोना निगेटिव्ह असल्याचे स्पष्ट झालं.  रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी या रिपोर्टबद्दल समाधान करत आनंद साजरा केला.

खबरदारी म्हणून आता या बाळाला मात्र, आईपासून दूर ठेवावे लागले आहे. मात्र, बाळाला दूध आईचेच देण्यात येत आहे. कारण, नवजात बाळाला आईचेच दूध दिले जात असते. आईच्या दुधामुळे बाळाची प्रतिकार शक्ती वाढत असते. त्यामुळे डॉक्टरांनी या बाळाला आईचे दूध देण्याचा निर्णय घेतला.

हेही वाचा – राज्यात हवामानाचा पुन्हा यू-टर्न, ‘या’ भागांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा

आईपासून दूर ठेवलेल्या या नवजात बाळाची आई आता डॉक्टर आणि येथील नर्स झाल्या आहेत. जन्मताच आई पासून दूर ठेवण्यात आलेल्या बाळाची जिल्हा रुग्णालयातील नर्स स्वतःच्या बाळाप्रमाणेच काळजी घेत आहेत.

संपादन – सचिन साळवे

Tags:

First Published: Apr 20, 2020 05:10 PM ISTSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

violence at red fort in delhi: tractor rally violence : लाल किल्ल्यावर झेंडा लावणारा तरुण तरण तारणचा, तीन मुलींसह आई-वडील बेपत्ता – violence at...

भिखविंड (तरण तारण) : दिल्लीत शेतकरी ट्रॅक्टर परेड दरम्यान लाल किल्ल्यावर झेंडा ( violence at red fort ) लावणारा जुगराज सिंग हा तरुण...

Recent Comments