Home ताज्या बातम्या गर्भवती हत्तीणीच्या मृत्यूच्या तपासाला वेग; एक व्यक्ती पोलिसांच्या ताब्यात | National

गर्भवती हत्तीणीच्या मृत्यूच्या तपासाला वेग; एक व्यक्ती पोलिसांच्या ताब्यात | National


माणुसकीला काळीमा फासणारी घटना केरळमध्ये घडली होती. एका मुक्या जीवाला त्यांनी अननसातून फटाके खाऊ घातले होते. यात तिचा व तिच्या पोटातील निरागस जीवाचा मृत्यू झाला

नवी दिल्ली, 4 जून : केरळ (Keral) मध्ये गर्भवती हत्तीणीला फटाक्यांनी भरलेलं अननस खाऊ घातल्याने तिचा अत्यंत दुर्देवी पद्धतीने मृत्यू झाला आहे. माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या अत्यंत क्रुर कृत्याचा निषेध केला जात आहे. सोशल मीडियावरही यावरुन बराच विरोध सुरू आहे. हत्तीणीच्या हत्येच्या आरोपींना अटक करून त्यांना लवकरात लवकर शिक्षा करण्याची मागणी लोक करत आहेत.

दरम्यान, गुरुवारी मानकरगड वन पथकाने एका व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. या व्यक्तीची चौकशी केली जात आहे. ही व्यक्ती कोण आहे याबद्दल अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. मुख्य वन्यजीव वॉर्डन म्हणाले की, प्राथमिक पोस्टमॉर्टम अहवालानुसार फटाक्यांमुळे हत्तीणीच्या तोंडाला जखम झाल्याचे दिसून आले. “आता हे कसले स्फोटक आहे, ते अननस, फळांनी किंवा इतर कोणत्या प्रकारे लपटून दिले गेले होते, ही संपूर्ण माहिती पोस्टमार्टम रिपोर्टनंतरच समोर येईल.

केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी गुरुवारी सांगितले की, केरळमधील मल्लापुरममध्ये हत्तीणीच्या हत्येबद्दल केंद्र सरकार गंभीर आहे. आम्ही योग्य चौकशी करुन दोषींना पकडण्यात कोणतीही कसर सोडणार नाही. हत्तींणीला फटाके खाऊन मारणे ही भारतीय संस्कृती नाही. ज्यांनी अननसात स्फोटके ठेवून हत्तीणीला खायला दिले होते, त्यांना पकडण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू करण्यात आला आहे.

हे वाचा-नोकरी जाण्याचं टेन्शन आता विसरा, लॉकडाऊनमध्ये हे काम करून लाखो कमवा

महाराष्ट्राच्या लॉकडाऊन नियमावलीत पुन्हा बदल; असे आहेत नवे नियम

First Published: Jun 4, 2020 04:48 PM ISTSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Road Accidents in India: हा तर निव्वळ आत्मघात – road accidents after lockdown in india

करोनामुळे देशभरात वाहतूक मंदावली होती आणि त्यामुळे अपघात व अपघाती मृत्यूंची संख्याही कमी झाली होती. मात्र, आता टाळेबंदी संपल्यानंतर पुन्हा रस्तेअपघातांचे प्रमाण करोनापूर्व...

burglary cases in mumbai: मुंबईत वाढल्या घरफोड्या – burglary cases have increased in mumbai after lockdown

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई करोना संकटामुळे लावण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे नियंत्रणात असलेल्या मुंबईतील चोऱ्या आणि घरफोड्या पुन्हा एकदा वाढू लागल्या आहेत. लॉकडाउन असल्याने...

Recent Comments