Home ताज्या बातम्या गर्लफ्रेंडला पहिल्यांदाच भेटण्यासाठी 2000 किमीचा विमान प्रवास केला, पण थेट तुरुंगात पोहोचला...

गर्लफ्रेंडला पहिल्यांदाच भेटण्यासाठी 2000 किमीचा विमान प्रवास केला, पण थेट तुरुंगात पोहोचला | National


तिचा वाढदिवस म्हणून तो भेटवस्तू घेऊन बेंगळुरूहून विमानाने 2000 किमीचा प्रवास करुन लखनऊमध्ये आला होता. सलमानकडे बेंगळुरूचं 11 जानेवारीचं परतीचं तिकीट आणि थोडे पैसे होते.

लखनऊ, 13 जानेवारी : सध्या माध्यमांची पोहोच वाढल्यामुळे आपल्या मानसिकतेवर आणि वागण्यावर परिणाम झाला आहे. गुन्ह्यांच्या बातम्या, त्यावर आधारित कार्यक्रम यांना जबरदस्त टीआरपी मिळतोय आणि लोक त्या दृष्टीने विचारही करायला लागले आहेत. अनेकदा आपल्याला ऑनलाईन घोटाळ्यांपासून सावध रहायला सांगितलं जातं. सोशल नेटवर्किंग साईट्सवरून फसवणुकीचे अनेक प्रकार घडतात. त्यामुळे लोक जपून राहतात. पण कधीकधी याचा फटका दुसऱ्याला बसतो. लखनऊमध्ये अशीच एक घटना घडली.

लखनऊमध्ये राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीचा ऑनलाईन मित्र असल्याचं सांगत सलमान नावाचा तरुण तिच्या वाढदिवसासाठी लखनऊला आला. त्याने येताना चॉकलेट्स, टेडीबेअर अशा भेटवस्तूही आणल्या होत्या. तो बसने त्या मुलीच्या घरी लखिमपूर खिरीला पोहोचला आणि तिच्या घरच्यांनी त्याला घरात घेतलं नाही. त्यानी ऑनलाईन मैत्रीबद्दल सांगितलं पण त्या मुलीच्या कुटुंबियांनी त्याला थेट पोलिसांच्या ताब्यात दिलं.

(वाचा – WhatsApp च्या नव्या पॉलिसीमुळे तुमच्या प्रायव्हसीला धोका? वाचा हे FACTS)

सलमान हा मूळचा उत्तर प्रदेशातल्या देवरियाचा राहणारा असून सध्या बेंगळुरूमध्ये मेकॅनिक म्हणून काम करतो. त्याची आणि या मुलीची सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन मैत्री झाली होती. तिचा वाढदिवस म्हणून तो भेटवस्तू घेऊन बेंगळुरूहून विमानाने 2000 किमीचा प्रवास करुन लखनऊमध्ये आला होता, अशी माहिती पोलिसांनी दिली.

लखनऊमधील कोलवाली पोलीस स्टेशनचे प्रमुख सुनील कुमार सिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील मुलीच्या कुटंबियांनी त्या तरुणाविरुद्ध प्राथमिक माहिती अहवाल (FIR) दाखल करण्यास नकार दिला. त्याला रविवारी रात्री तुरुंगात ठेवून सोमवारी सब-डिव्हिजनल मॅजिस्ट्रेटच्या कोर्टात सादर करण्यात आलं. वैयक्तिक बाँड घेऊन त्या तरुणाला सोमवारी तुरुंगातून सोडण्यात आलं.

(वाचा – सिंहाशी मस्ती करणाऱ्या व्यक्तीवर, सिंहीणीने अचानक केला हल्ला आणि..;व्हिडिओ VIRAL)

आपली त्या मुलीशी ऑनलाईन मैत्री झाली होती, असं सलमानने पोलिसांना सांगितलं. सलमानकडे बेंगळुरूचं 11 जानेवारीचं परतीचं तिकीट आणि थोडे पैसे होते. मुलीच्या कुटंबियांनी त्या दोघांना भेटू दिलं नाही आणि त्या मुलाला सक्त ताकीदही दिली. सिंग म्हणाले, आम्ही त्या तरुणाला सीआरपीसीच्या 105 व्या कलामाअंतर्गत (दखलपात्र गुन्ह्यापासून परावृत्त करण्यासाठी) अटक केली. त्यानंतर बाँड घेऊन त्याला सोडण्यात आलं.


Published by:
Karishma Bhurke


First published:
January 13, 2021, 9:14 PM ISTSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments