Home ताज्या बातम्या 'गुलाम'मधील अभिनेत्यावर भाजी विकण्याची वेळ; व्हायरल व्हिडीओचं FACT CHECK actor javed hyder...

‘गुलाम’मधील अभिनेत्यावर भाजी विकण्याची वेळ; व्हायरल व्हिडीओचं FACT CHECK actor javed hyder selling vegetables due to financial crisis fact check of viral video mhpl | Viral


कोरोना लॉकडाऊनमध्ये अभिनेता जावेद हैदर (Javed Hyder) भाजी विकत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता.

मुंबई, 28 जून : कोरोना व्हायरस (Coronavirus) चे संक्रमण रोखण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अनेकांना आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. टीव्ही मालिका आणि सिनेमांचे देखील शूटिंग बंद होते असल्याने अनेक छोट्या कलाकारांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यातच अभिनेता जावेद हैदर (Javed Hyder) आर्थिक अडचणींमुळे भाजी विकत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.

जावेदने गुलाम, चांदनी बार या चित्रपटांमध्ये तर जिनी और जुजू सारख्या मालिकांमध्ये काम केले होते. अभिनेत्री डॉली बिंद्रा (Dolly Bindra)ने जावेद हैदरचा व्हिडीओ शेअर केला आहे. आता कोरोना लॉकडाऊनमध्ये तो आर्थिक अडचणीत असल्याने आता भाजी विकू लागलं, असं सांगितलं जाऊ लागलं.

मात्र खुद्द जावेदनं आता याबाबत खुलासा केला आहे. हैदरनं आपल्याला कोणत्याही प्रकारची आर्थिक समस्या नाही. तर लोकांना प्रोत्साहित करण्यासाठी आपण भाजी विकतानाचा हा व्हिडीओ बनवल्याचं त्यानं स्पष्ट केलं आहे.

हे वाचा – सुशांत सिंह राजपूतला ‘शुद्ध देसी रोमान्स’साठी मिळाले होते 30 लाख

एका वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत जावेद म्हणाला, “मी भाजी विकत नाही आहे. मी व्यवसायाने एक अभिनेता आहे आणि लॉकडाऊनमुळे मी सध्या काहीच करू शकत नाही. अभिनेता म्हणून स्वत:ला व्यस्त ठेवण्यासाठी मी अॅपवर माझे म्युझिकल व्हिडीओ बनवणं सुरू केलं आहे. माझी मुलगी हा अॅप वापरते आणि तिने मला व्हिडीओ बनवण्यास प्रोत्साहित केलं”

हे वाचा – आलिया आणि महेश भट्ट सोशल मीडियावर ट्रोल, ‘सडक 2’ पोस्टर लाँचनंतर नेटकरी संतापले

“मी काही चांगल्या मेसेजसह व्हिडीओही बनवले. एक दिवस एका भाजी विक्रेत्याची परवानगी घेऊन मी त्याच्या जागी भाजी विकताना माझा व्हिडीओ बनवला. हा व्हिडीओ खूप व्हायरल झाला. देवाच्या कृपेनं अजूनतरी मला आर्थिक अडचण आली नाही. मात्र भविष्यात असं झालं आणि भाजी विकायची वेळ आली तरी मी मला त्याची लाज वाटणार नाही. कारण कोणतंही काम छोटं नसतं. कारण कोणतंही काम छोटं नाही हेच या व्हिडीओतून सांगण्याचा प्रयत्न मी केला”, असं जावेदनं सांगितलं.

संपादन – प्रिया लाड

First Published: Jun 30, 2020 06:43 PM IST

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

punjab government: पंजाबचे बंड – punjab state government challenge central government over farm laws

केंद्र सरकारच्या शेतीविषयक तीन नव्या कायद्यांना रस्त्यावर होत असलेला विरोध आता विधिमंडळापर्यंत पोहोचला असून, पंजाबमधूनच त्याची सुरुवात झाली आहे. पंजाब विधानसभेने केंद्राच्या तिन्ही...

Eknath Khadse: खडसेंसाठी राष्ट्रवादीच्या एकाचे मंत्रिपद जाणार – one ncp minister will has resign from his post for eknath khadse

एकनाथ खडसे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात शुक्रवारी प्रवेश करणार असल्याच्या पार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका मंत्र्याला राजीनामा द्यायला लावला जाणार असल्याच्या बातम्याही चर्चिल्या...

BSNL festive offer: BSNL युजर्ससाठी फेस्टिव सीजनमध्ये ऑफर्स, या रिचार्जवर बंपर फायदे – festive offer: bsnl extends validity of rs 1999, rs 699, rs...

नवी दिल्लीः बीएसएनएल कंपनीने फेस्टिवल सीजनमध्ये आपल्या ग्राहकांना बंपर ऑफर देत आहे. बीएसएनएल मध्ये अनेक प्रिपेड व्हाऊचर्स (PVs) आणि स्पेशल टॅरिफ व्हाउचर्स (STVs)...

Recent Comments