Home देश गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत: करोनाचा समूह संसर्ग सुरू , पहिल्यांदाच एका मुख्यमंत्र्यांनी...

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत: करोनाचा समूह संसर्ग सुरू , पहिल्यांदाच एका मुख्यमंत्र्यांनी केलं मान्य – goa cm pramod sawant said corona community transmission started in state


पणजी : गोव्याचे मुख्यमंत्री आणि भाजप नेते प्रमोद सावंत यांनी राज्यात करोना व्हायरसचा समूह संसर्ग सुरू झाल्याचं मान्य केलंय. राज्याच्या प्रत्येक भागातून करोना संक्रमणाचे रुग्ण समोर येत असल्याचं त्यांनी म्हटलंय.

आरोग्य अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गोव्यात शुक्रवारी कोविड १९ संक्रमित नवीन ४४ रुग्ण आढळले आहे. यामुळे राज्यातील करोनाबाधितांचा एकूण आकडा १,०३९ वर पोहचलाय. यातील ६६७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. राज्यात आत्तापर्यंत ३७० जणांवर उपचार यशस्वी ठरलेत तर दोन जणांचा मृत्यू झाला आहे.

आपल्याला ही गोष्ट मान्य करावी लागेल की राज्यात करोनाचा समूह संसर्ग सुरू झालाय. परंतु, संक्रमणाचा ठावठिकाणी केवळ काही भागांतून लागतोय, असं मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटलंय.

वाचा :Coronavirus : आज तुमच्या राज्यात काय परिस्थिती आहे? पाहा…
वाचा :देशात पहिल्यांदाच २४ तासांत १७ हजार नवे रुग्ण

आपल्याकडे संपूर्ण गोव्यातून करोना संक्रमित रुग्ण समोर येत आहेत. सध्या, जेव्हा संपूर्ण राज्यात ट्रान्समिशन होतं तेव्हा ते एका रुग्णातून दुसऱ्या रुग्णापर्यंत फैलावत जातं. आपल्याला हा समूह संसर्ग आहे हे सांगावं लागेल. आपल्याला हे स्वीकार करावं लागेल, असंही त्यांनी काळजीच्या सुरात म्हटलं.

वाचा :गोव्यात करोनाचा पहिला बळी, ८५ वर्षीय वृद्धाचा मृत्यू
वाचा :लॉकडाऊनचं उल्लंघन, पिता-पुत्राचा कोठडीत मृत्यू; काँग्रेसकडून न्यायाची मागणी

राज्यात कठोर प्रोटोकॉल पाळण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ज्यानुसार, राज्यात प्रवेश करणाऱ्या सर्व लोकांना स्वत:ची चाचणी करावी लागेल किंवा १४ दिवसांसाठी घरातून बाहेर क्वारंटीन राहावं लागेल.

गोव्यात वास्कोचं मंगोर हिल आणि सत्तारी तालुक्यातील मोर्लम गाव करोना संक्रमणामुळे सर्वात जास्त प्रभावित झाले आहेत. तर राज्यातील काही भागांना लघु संक्रमण प्रभावित क्षेत्र घोषित करण्यात आलंय.

एप्रिल महिन्यात गोवा ठरलं होतं पहिलं करोनामुक्त राज्य

उल्लेखनीय म्हणजे, एप्रिल महिन्यात गोवा हे देशातील करोनामुक्त होणारं पहिलं राज्य ठरलं होतं. गोव्यात सापडलेल्या सात रुग्णांवर उपचार यशस्वी ठरल्यानंतर मुख्यमंत्री सावंत यांनी गोवा ‘करोनामुक्त’ झाल्याचं जाहीर केलं होतं. (अधिक वाचा :गोवा ठरलं करोनाला हरवणारं देशातील पहिलं राज्य!)Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Rajesh Deshmukh: Rajesh Deshmukh: पुण्यातील सहा रुग्णालयांनी केला ‘हा’ प्रताप!; कठोर कारवाई अटळ – mahatma jyotiba phule jan arogya yojana action will be taken...

पुणे: रुग्णांना ‘ महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजना ’ अंतर्गत मिळणारे लाभ न देणाऱ्या सहा रुग्णालयांची योजनेची मान्यता रद्द करण्यात यावी, अशी शिफारस...

Bihar election: पासवान यांचे श्राद्ध; चिराग नितीशकुमारांचे पाया पडले, पण मन मोकळं केलं तेजस्वीकडे – bihar election nitish kumar chirag paswan tejaswi yadav sat...

पाटणाः विधानसभा निवडणुकीपूर्वी ( bihar election ) बिहारच्या राजकारणाचे ३ सर्वात महत्वाचे चेहरे मंगळवारी एकाच ठिकाणी दिसले. पटणातील एलजेपी कार्यालयात रामविलास पासवान यांच्या...

Recent Comments