Home शहरं मुंबई घरकामगार: नियम धाब्यावर बसवत घरकामगारांना काम देण्यास मनाई - coronavirus prohibition of...

घरकामगार: नियम धाब्यावर बसवत घरकामगारांना काम देण्यास मनाई – coronavirus prohibition of hiring domestic workers


म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई

राज्य सरकारने गृहनिर्माण संस्थांच्या आवारात घरकामगार व वाहनचालकांना प्रवेश प्रतिबंधित केलेला नाही, असे जाहीर केल्यानंतरही घरकाम करणाऱ्या महिला, ड्रायव्हर, सफाई कामगार यांना कामावर न घेण्याचे प्रकार सुरूच आहेत. झोपडपट्टी परिसरात करोनाचे रुग्ण आढळल्याच्या पार्श्वभूमीवर गोरेगाव पश्चिम येथील काही सोसायट्यांमध्ये असे प्रकार घडत असल्याची तक्रार करण्यात आली आहे.

गोरेगाव पश्चिम येथील लक्ष्मीनगर, आझादनगर, भगतसिंग नगर, लालमाती या झोपडपट्ट्यातील असंख्य महिला या भागातील इमारतींमध्ये घरकाम करण्यासाठी जातात. मात्र झोपडपट्टी परिसरात करोनाचे रुग्ण वाढत असल्याच्या वावड्या उठवण्यात आल्यानंतर, त्यांना तसेच वाहनचालक, सोसायट्यांमध्ये साफसफाई करणारे कामगार यांना कामावर घेतले जात नसल्याच्या तक्रारी करण्यात आल्या आहेत. सेजल पार्क, महात्मा गांधी रोड परिसर, वसंत गॅलॅक्सी यासह विविध सोसायट्यांमध्ये महिला कामगार व इतरांना मनाई करण्यात येत असल्याची माहिती येथील शिवसेनेचे माजी नगरसेवक दिलीप शिंदे यांनी दिली.

लॉकडाउनमुळे आधीच तब्बल तीन महिने या घरकामगार महिलांना रोजगार नसल्याने त्यांच्या घरातील चुली थंडावल्या आहेत. लॉकडाउन काही प्रमाणात शिथील झाल्यानंतर महिलांनी पुन्हा कामावर जाण्यास सुरुवात केली, मात्र आता सोसायट्यांच्या आवारातही घेतले जात नाही. अनेक इमारतींमध्ये घरमालक तयार आहेत, पण सोसायट्यांचे पदाधिकारी विरोध करत असल्याचे शिंदे यांनी सांगितले. कुठल्याही कामगाराचा रोजगार नाकारता येणार नाही, असे सरकारने स्पष्ट केल्यानंतरही सोसायट्या आडमुठेपणा करणार असतील, तर शिवसेनेशी गाठ आहे, असा इशारा शिंदे यांनी दिला आहे.

सरकारचे आदेश काय आहेत?

गृहनिर्माण संस्थांच्या आवारात घरकामगार व वाहनचालकांना प्रवेश नाकारता येणार नाही. मात्र काही गृहनिर्माण संस्था या कामगारांना प्रवेश प्रतिबंधित करत आहेत. तसेच गृहनिर्माण संस्थांचे पदाधिकारी संस्थांच्या स्तरावर सरकारच्या निर्देशांच्या विपरीत नियमावली तयार करत असल्याच्या सभासदांच्या तक्रारी येत आहेत. कामगारांना प्रवेश देण्यासंदर्भात सरकारने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे, सरकारच्या नियमांच्या विपरीत गृहनिर्माण संस्थांनी नियम तयार करू नयेत, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

msedcl bill recovery latest news: MSEDCL Bill Recovery: लॉकडाऊन काळातील सहानुभूती संपली!; वीज ग्राहकांना महावितरण देणार ‘शॉक’ – msedcl will cut off power supply...

मुंबई:वीजबिल वसुलीची मोहीम राबवून थकबाकी वसूल करण्याचे व थकबाकीदार ग्राहकांचा वीज पुरवठा त्वरित खंडित करण्याचे आदेश महावितरणने सर्व क्षेत्रीय कार्यालयास आज दिले आहेत....

Recent Comments