Home शहरं औरंगाबाद घाटीला जादा पाणी; शहागंज, सिडकोत टंचाई

घाटीला जादा पाणी; शहागंज, सिडकोत टंचाईम. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

घाटी रुग्णालयाच्या कोविड केअर सेंटरने पाणी पळवल्यामुळे सिडको-हडको आणि शहागंज परिसराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. शहागंज भागात सहाव्या ते सातव्या दिवशी पाणीपुरवठा करावा लागत असून सिडको-हडकोत वेळापत्रक बिघडले आहे. अनेक भागात रात्री उशिरा पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी नागरिक व माजी नगरसेवक करीत आहेत.

मे महिन्याच्या शेवटी व जून महिन्यात पाण्याची मागणी वाढत असल्याने जोरदार पाऊस पडेपर्यंत पालिकेला क्षमतेपेक्षा जास्त पाणीपुरवठा करावा लागतो. यंदा जायकवाडी धरणात पुरेसे पाणी असल्यामुळे शहराला उन्हाळ्यात झळ पोचली नाही. आता मात्र काही भागात पाण्याबद्दल ओरड सुरू झाली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, घाटी रुग्णालयात मल्टीस्पेशालिटी कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले आहे. या सेंटरला मुबलक पाणीपुरवठा करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आदेश आहेत. त्यानुसार, दिवसातून दोन वेळा पाणीपुरवठा केला जात आहे. घाटी रुग्णालयासाठी सुमारे अडीच लाख लिटर जास्तीचे पाणी द्यावे लागत आहे. सध्या करोनाची साथ सुरू असल्याने पालिकेला देखील त्यात तडजोड करता येत नाही. याचा परिणाम होऊन शहागंज जलकुंभात पुरेशी पातळी राखली जात नसल्याने सहाव्या किंवा सातव्या दिवशी पाणीपुरवठा केला जात आहे. सिडको-हडकोतील काही वसाहती व सेक्टर्सचे वेळापत्रक बिघडले आहे. सिडको एन पाचच्या जलकुंभावरून होणारा पुरवठा दोन ते तीन तास उशिराने होत आहे.

सिडको एन तीन, एन चार भागात रात्री बारा-एक वाजता पाणीपुरवठा होतो. पाणी पुरवठ्याचे वेळापत्रक बिघडल्यामुळे नागरिक कमालीचे त्रस्त झाले आहेत. पालिका प्रशासकांनी पाणीपुरवठ्याच्या या मुद्यावर नियंत्रण ठेवले पाहिजे.

-प्रमोद राठोड, माजी नगरसेवकSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

jameel shaikh murder: Jameel Shaikh Murder: जमील शेख हत्या: शूटर्सना ‘त्याने’ कारमधून मालेगावात सोडले आणि… – jameel shaikh death shooters went to malegaon in...

ठाणे: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राबोडी प्रभाग अध्यक्ष जमील शेख यांची गोळी झाडून हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी शाहिद लायक शेख (३१) या आरोपीला...

Recent Comments