Home संपादकीय चंबळेतील सूसर

चंबळेतील सूसर


अतुल धामनकर
चंबळ नदीत एका मोटरबोटमध्ये बसून मी वेगानं पुढं चाललो होतो. या स्वच्छ पाण्याच्या नदीलाच शासनाने चंबळ वन्यजीव अभयारण्यात परावर्तीत केलं आहे. सुमारे ४०० किलोमीटर लांबीच्या या नदीच्या दोन्ही काठांवरील जवळपास तीनशे-चारशे मीटर अंतराचा या अभयारण्यात समावेश आहे. सकाळच्या थंडगार वाऱ्यात नदीतून जाताना चेहऱ्याला सुया टोचाव्यात तसा गार वारा टोचत होता. माझी नजर नदीच्या दोन्ही काठांवरून भिरभिरत होती. या नदीतील एका दुर्मिळ सरपटणाऱ्या जीवाला शोधण्यासाठी आतूर होती.

या क्वचित दिसणाऱ्या सरपटणाऱ्या प्राण्याचं नाव आहे सुसर. लांबच लांब निमुळतं तोंड असलेल्या; मगरीचाच एक प्रकार असलेल्या सुसरीला इंग्रजीत किंवा लाँग स्नाउटेड क्रोकोडाइल असं नाव आहे. घडियाल हे इंग्रजीतही असलेलं नाव मुळात हिंदीतलं आहे. नर सुसरीच्या लांब नाकाच्या टोकावर गोलाकार घडा; म्हणजे मडक्यासारखा भाग असतो. त्यामुळेच या जीवाला हे नाव पडलं असावं. मादीला मात्र हा घडा नसतो. आजवर सापडलेली सर्वात मोठी ६.७५ मीटर लांबीची होती. याची लांबी पंचवीस फुटांपेक्षाही जास्त वाढू शकते, असं मानलं जातं.

पूर्वी देशातील बहुतेक नद्यांमध्ये सुसरींचा वास होता. पण ब्रिटिश काळात झालेली अतोनात शिकार आणि अंड्यांच्या चोरीमुळे त्यांची संख्या झपाट्यानं कमी झाली. सध्या सुसरी केवळ रामगंगा, ब्रह्मपुत्रा, चंबळ, गंगा, महानदी या नद्यांमध्ये; तेही थोड्याच जागी आढळतात. वेगानं प्रदूषित होणाऱ्या नद्यांचं पाणी स्वच्छ राखलं नाही, तर सुसरींचं भवितव्य फारच धोक्यात येण्याची शक्यता आहे.

जास्तीत जास्त मासेच खाणाऱ्या सुसरी कधी कधी बेडूक, लहान पक्षी, कासवं, लहान सस्तन प्राणी पण खातात. क्वचित मृत जनावरांचं मांस खाताना पाहिलं गेलंय. भोजनाचं ‘ग्राइंडिंग’ करण्यासाठी सुसरी दगडंही खातात. या दगडांमुळे त्यांच्या पोटात मांस नीट बारीक होऊन पचनास सुलभ होतं. साधारणत: हिवाळ्यात मिलन घडतं आणि उन्हाळ्यात मादी काठावरच्या वाळूत खड्डा खणून घरटं तयार करते. त्यात ती सुमारे चाळीस अंडी घालते. सुमारे ७२ ते ९२ दिवसांनी अंड्यांतून फुटभर लांबीची पिल्लं जन्माला येतात. आई त्या पिल्लांना आपल्या पाठीवर, डोक्यावर बसवून पाण्यात नेते आणि त्याचं संरक्षण करते.

आमच्या नावेनं एक मोठं वळण घेतलं आणि पाण्याच्या मधल्या बेटावर बसलेले काळपट पाठीचे, पांढऱ्या पोटाचे पक्षी आपले लांब, टोकदार पंख उघडून संथपणे उडाले. चंबळ अभयारण्याचे आणखी एक आकर्षण असणारे हे दुर्मिळ ‘इंडियन स्किमर’ नावाचे पक्षी होते. या पाखरांचा थवा मी तृप्त नजरेनं पाहतच राहिलो. तेवढ्यात सोबतचा गार्ड ओरडला, ‘घडियाल! घडीयाल सर!’ मी चटकन त्या बेटाकडे पाहिलं. बेटाच्या मागच्या बाजूला चार मध्यमसर आकाराच्या सुसरी तोंड वर करून बसल्या होत्या. नुकतंच ऊन निघाल्यानं त्या ‘बास्किंग’ करीत; म्हणजे ऊन खात बसल्या होत्या. सरपटणाऱ्या प्रत्येक जीवाला सस्तन प्राण्यांसारखी त्यांच्या खाण्यातून ऊर्जा मिळत नाही. त्यांना ही ऊर्जा मिळते सूर्याच्या उष्णतेतून.

बोटमननं बोटचं इंजिन बंद केलं. बोटीची थरथर थांबल्यानं मला सुसरींचे चांगले फोटो टिपता येत होते. मी एका मध्यमसर आकाराच्या सुसरीवर कॅमेरा फोकस केला आणि चमकलो. या सुसरीच्या निमुळत्या तोंडात मासे धरण्याचं नॉयलॉनचं जाळं गुंतलं होतं. तिच्यासाठी हे जाळं मरणाचं जाळं बनलं होतं. तोंड उघडता न येण्यानं हिला पुढे शिकार करणं अशक्य होणार होतं. या नदी आणि त्यातील नैसर्गिक साधनांवर मानवाच्या अति‌क्रमणाचा हा आणखी एक दृश्य विपरीत परिणाम होता. या सुसरींसाठी चंबळ नदीला अभयारण्य बनवूनदेखील त्यांना अगणित धोक्यांना तोंड द्यावंच लागत होतं. परत गेल्यावर या सुसरीची कल्पना मी वनविभागाला लगेच दिली.

सुसरीच्या या जगात इतरही अनेक भागीदार आपलं जीवन जगत आहेत. निमुळत्या तोंडाची दुर्मिळ ‘गंगेतील डॉल्फिन’ मी याच नदीत पाहिली. इथे कासवं आहेत. काळ्या पोटाचे टर्न आणि स्किमर आहेत. हजारो मैलांवरून स्थलांतरित करून येणारे पक्षीही आहेत. पण त्यासाठी सुसरी जगणं गरजेचं आहे. चंबळेचं इथल्या जिवांच्या जगण्यात महत्त्वाचं स्थान आहे. या नदीचंही संरक्षण करणं गरजेचं आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

proposal to allow corporate house to set up banks: कॉर्पोरेट्सचा बँकिंग प्रवेश – rajiv madhav joshi article on proposal to allow corporate houses to...

राजीव माधव जोशी आपली बँकिंग सिस्टीम सक्षम व्हावी म्हणून अलीकडेच सादर केलेल्या अहवालानुसार पतसंस्था व बिगर बँकिंग कंपन्यांना नवीन बँक स्थापन करण्याची मुभा...

trp case: टीआरपीप्रकरणी मीडिया ट्रायल नको – bombay high court has directed news channel should not media trial in trp case

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई'टीआरपी घोटाळ्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी न्यायालयात आरोपपत्र दाखल केलेले असताना, या खटल्यावर प्रभाव टाकणारे मीडिया ट्रायल वाहिन्यांकडून होऊ नये. त्यादृष्टीने...

Sourav Ganguly Announced 5 T 20 Match – करोना काळात हा संघ येणार भारत दौऱ्यावर; BCCIकडून घोषणा

नवी दिल्ली: भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरून परतल्यानंतर इंग्लंडविरुद्ध कसोटी,वनडे आणि टी-२० मालिका खेळणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुलीने...

Recent Comments