Home ताज्या बातम्या चक्रीवादळाचा धोका टळला आणि कोरोनाविषयीही मुंबईतून पहिल्यांदाच आली दिलासादायी बातमी nisarga cyclone...

चक्रीवादळाचा धोका टळला आणि कोरोनाविषयीही मुंबईतून पहिल्यांदाच आली दिलासादायी बातमी nisarga cyclone go away from mumbai and coronavirus new cases decreased in mumbai mhpl | News


मुंबईकरांसाठी एकाच वेळी दोन आनंदाच्या बातम्या आहेत.

मुंबई, 03 जून : कोरोनाव्हायरस (coronavirus) आणि त्यात निसर्ग चक्रीवादळाचं (nisarga cyclone) संकट. मुंबईकर (mumbai) आपला जीव मुठीत घेऊनच घरात बसले होते. इतके दिवस कोरोनाशी दोनहात करणारे मुंबईकर चक्रीवादळाचाही सामना करण्यासाठी तयार झाले. मात्र सुदैवानं चक्रीवादळाचं संकट टळलं आणि सोबतच कोरोनाबाबतही दिलासादायक बातमी आली. मुंबईतील कोरोनाव्हायरसच्या नवीन प्रकरणांचं प्रमाण आता कमी झालं आहे.

मुंबईतील दैनंदिन रुग्णवाढीचा दर आता कमी झाला आहे, असं मुंबई महापालिकेच्या आकडेवारीतून दिसून येतं आहे.

आठवडाभरापूर्वी म्हणजे 27 मे रोजी जारी केलेल्या आकडेवारीनुसार मुंबईत नवीन कोरोना रुग्णवाढीचा दैनंदिन सरासरी दर 5.17% होता. जो 2 जूनला 3.64% झाला आहे. याचा अर्थ मुंबईत दररोज नवीन रुग्ण आढळण्याचं प्रमाण आता कमी झालं आहे.

हे वाचा – मूकबधीर महिलेला घरचा पत्ताही सांगता येईना, मग पालकमंत्र्यांनी असा लावला शोध

महाराष्ट्रामध्ये मुंबई कोरोनामुळे सर्वात जास्त प्रभावित आहे. मुंबईत सर्वाधिक रुग्ण आहेत आहेत. 2 जूनपर्यंत मुंबईत कोरोनाव्हायरसच्या एकूण 41,986 रुग्णांची नोंद आहे. त्यापैकी 22,514 सक्रिय रुग्ण आहेत. 17,187 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

महाराष्ट्रातील रिकव्हरी रेटही वाढला

राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार, राज्यामध्ये कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. मार्चच्या तुलनेत मेमध्ये सुमारे साडेतीन पटीने जास्त रुग्ण बरे झालेत. रुग्ण बरे होण्याचा दर 43.35% एवढे झाले आहे. गेल्या तीन महिन्यांची आकडेवारी पाहता मेमध्ये सर्वाधिक रुग्ण बरे झालेले दिसून येत आहेत. यासोबतच राज्यातील रुग्ण दुपटीचा कालावधी 11 वरून 17.5℅ दिवसांवर गेला आहे.

संपादन – प्रिया लाड

हे वाचा – तब्बल 2 महिन्यांनंतर घरी आली कोरोना योद्धा आई; मुलींनी काय केलं पाहा VIDEO

First Published: Jun 3, 2020 06:59 PM ISTSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

madhurta deshmukh: घरबसल्या गोष्टी ऐका आजी-आजोबांकडून – storyteller madhurata deshmukh is present stories for children under spin a yarn india using youtube and facebook

हर्षल मळेकर, मुंबईआजी-आजोबांच्या कुशीत शिरुन कोल्होबा, कावळा, सिंह-उंदिर यांच्या तसेच राम-कृष्णाच्या, बिरबलाच्या गोष्टी ऐकत झोपी जायचे हे भाग्य विभक्त कुटुंब पद्धतीमुळे हल्ली फार...

Nitin Bhalerao Martyr: छत्तीसगडमधील नक्षली हल्ल्यात नाशिकचे जवान नितीन भालेराव यांना वीरमरण – assistant commandant of crpf nitin bhalerao martyred, 9 injured in naxal...

नाशिक: छत्तीसगडमध्ये सुकमा येथे नक्षलवाद्यांनी घडवून आलेल्या स्फोटात सीआरपीएफचे जवान नितीन भालेराव शहीद झाले आहेत. या स्फोटात एका अधिकाऱ्यासह ९ जवान जखमी झाले...

Recent Comments