Home शहरं नाशिक चक्रीवादळासाठी पालिकेची सज्जता

चक्रीवादळासाठी पालिकेची सज्जता


म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

निसर्ग चक्रीवादळाचा धोका नाशिक जिल्ह्यालाही बसणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिल्यानंतर महापालिकेचा आपत्ती व्यवस्थापन कक्ष सज्ज झाला आहे.

अग्निशामक दलासह पोलिस, होमगार्ड, स्वयंसेवकांना महापालिकेतर्फे सज्ज राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. हवामान विभागाच्या सूचनेनुसार आज, बुधवारी (दि. ३) या चक्रीवादळाचा तडाखा बसण्याची शक्‍यता आहे. त्या दृष्टीने महापालिकेने नागरिकांना दिलेल्या सूचना अग्निशामक दलाचे प्रमुख संजय बैरागी यांनी निर्गमित केल्या आहेत. वीजपुरवठा खंडित झाल्यास पॉवर बॅँक सज्ज ठेवा, घरातील दारे, खिडक्यांच्या पॅनलची तपासणी करून ठेवा, वाहने लावताना काळजी घ्या, प्राथमिक उपचारांची साधने हाताशी ठेवा, एअरकंडिशनरचे बाह्य युनिट बंद ठेवा आदी सूचना करण्यात आल्या आहेत.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Kitab-i-Nauras book: सांगीतिक मूल्यांचा ऐतिहासिक ग्रंथ – dr balasaheb labade book review on kitab-i-nauras book

डॉ. बाळासाहेब लबडे'किताबे नवरस' हा मूळ विजापूरचा सुलतान इब्राहीम आदिलशहा दुसरा याने दखनी भाषेत लिहिलेला ग्रंथ. या ग्रंथाचा डॉ. सय्यद याह्या नशीत यांनी...

Recent Comments